“राज्यात सध्या भीषण दुष्काळसदृश परिस्थिती असताना आणि शेतकरी हवालदिल झाला असताना, लोकप्रतिनिधींना त्याचे गांभीर्य राहिलेले नाही. शाहरुख खानचा गालगुच्छा घेताना आमचे खासदार राज्यातील दुष्काळ विसरले आहेत,” अशा अत्यंत तिखट शब्दांत ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. “हे ‘इंडिया’ मधल्या हायप्रोफाईल लोकांचे लग्न सोहळे आहेत, आम्ही मात्र ‘भारता’मधले सामान्य लोक आहोत,” असा टोलाही त्यांनी लगावला. सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचे लग्न पार पडले. या विवाहसोहळ्यात अनेक राजकीय नेत्यांसह बॉलिवडमधील अभिनेता शाहरूख खान यानेही हजेरी लावली होती. या लग्नावरून आता लक्ष्मण हाके यांनी सुप्रिया सुळे यांच्या निशाणा साधला आहे. नेमके काय म्हणाले लक्ष्मण हाके? राज्यातील पाण्याच्या आणि शेतीच्या गंभीर परिस्थितीवर बोलताना लक्ष्मण हाके यांनी सुप्रिया सुळे यांच्या एका व्हायरल प्रसंगाचा संदर्भ देत त्यांच्यावर गंभीर आक्षेप घेतला. ते म्हणाले, “खासदार पदावर असणारी जबाबदार व्यक्ती जर दुष्काळाच्या काळात अशी वागत असेल, तर आम्ही यावर काय व्यक्त व्हावे? एकीकडे शेतकरी पाण्यासाठी आणि आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे, तर दुसरीकडे बडे नेते सेलिब्रिटींच्या गराड्यात मग्न आहेत. आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये मायबाप सरकारने शेतकऱ्यांना तातडीने आश्वस्त करावे आणि राज्यात अधिकृतपणे ‘कोरडा दुष्काळ’ घोषित करावा,” अशी मागणी त्यांनी केली. रोहित पवारांना लगावला खोचक टोला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आंदोलन करणाऱ्या आमदार रोहित पवार यांनाही लक्ष्मण हाके यांनी सोडले नाही. “राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी रोहित पवारांनी करायला हवी होती. मी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी रोहित पवारांना भेटायला जाणार होतो; पण त्यांनी अवघ्या तिसऱ्या दिवशीच आपले आंदोलन गुंडाळले,” असा खोचक टोमणा त्यांनी मारला. बोगस कुणबी प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करा लक्ष्मण हाके यांनी यावेळी मराठवाड्यातील जात प्रमाणपत्रांच्या गैरव्यवहारावर मोठा आरोप केला. ते म्हणाले, “माजलगावमधील एका नगरसेविकेचे कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केले आहे. हाच धागा पकडत हाके यांनी, राज्यात बेकायदेशीरपणे वाटप करण्यात आलेली अशी सर्व कुणबी प्रमाणपत्रे तातडीने रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली.” “महाराष्ट्रात सध्या जात प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी रेट ठरले असून यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. राज्यात ५८ लाख नोंदी मिळाल्याचा दावा करून बोगस कुणबी प्रमाणपत्रे देण्याला मोठी वाव दिली जात आहे. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही ओबीसींना सवतीच्या लेकरांसारखं का वागवत आहात?” असा उद्विग्न सवाल लक्ष्मण हाके यांनी केला. प्रसाद लाड यांच्यावर गुन्हा दाखल करा “आमदार प्रसाद लाड यांचा आरक्षणाशी काहीही संबंध नाही आणि त्यांना या विषयातील कोणतीही अक्कल किंवा ज्ञान नाही. लाड यांनी मनोज जरांगे यांच्याकडे जाऊन विनवण्या करणे हा एक मोठा विनोद आहे. लाड यांना जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांना फोन करण्याचा अधिकार कोणी दिला? ते समित्यांवर दबाव आणत आहेत. त्यामुळे बोगस प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करून आमदार प्रसाद लाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे,” अशी मागणी हाके यांनी केली. भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाची आजही गरज मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, “भुजबळ साहेब त्यांच्या पक्षात नाराज आहेत की नाहीत, हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. परंतु, ओबीसी चळवळीत त्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला आजही नितांत आवश्यकता आहे. आम्ही कुठे चुकीचे बोलत असू तर भुजबळ साहेबांनी आमचे कान धरले पाहिजेत आणि आम्हाला दिशा दाखवावी,” अशी आदरयुक्त भावना त्यांनी व्यक्त केली. ही लढाई आता केवळ रस्त्यावरची राहिलेली नसून, बोगस प्रमाणपत्रांविरोधात न्यायालयातही तितक्याच ताकदीने लढली जाईल, असा निर्धार त्यांनी शेवटी व्यक्त केला.
Source link
शाहरुख खानचा गालगुच्छा घेताना आम्ही दुष्काळ विसरलो:ते इंडियातल्या लोकांचे लग्न, आम्ही भारतातले कष्टकरी; लक्ष्मण हाकेंची सुप्रिया सुळेंवर टीका
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा!
श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
गणपतीला लाल फुल का वाहतात ?
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते?
हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले.
या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला.
सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.
निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गिक 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते.
त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा!
‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?
गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























