Homeमहाराष्ट्रPune Anjali Damania Political Attack Update; Ajit Pawar Resignation Demand Over Mundhwa...

Pune Anjali Damania Political Attack Update; Ajit Pawar Resignation Demand Over Mundhwa Land Case | जनाची नव्हे मनाची लाज असेल तर राजीनामा द्या: अंजली दमानियांचा अजित पवारांवर घणाघात; मुंढवाची जमीन पाहण्यास प्रशासनाची मनाई – Pune News

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनाची लाज असेल तर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी केली. दमानिया यांच्या या मागणीमुळे पुण्यातील मुंढवा भूखंड

.

अंजली दमानिया आज मुंढवा येथील जमीन पाहण्यासाठी गेल्या होत्या. पण प्रशासनाने त्यांना परवानगी नाकारली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, मुंढवा येथील जमिनीची माहिती घेण्यासाठी मी आले होते. पण आत गेटमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांनी मला तिथे जाण्याची परवानगी नाकारली. मी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधला. त्यांनी माझ्याशी अर्वाच्य भाषेत परवानगी नाकारली. त्यामुळे त्यांनी कुणाच्यातरी दबावाखाली ही परवानगी नाकारल्याचा संशय आहे. पण मी या सर्व गोष्टींचा किस पाडणार आहे. मी आज या प्रकरणाची सर्व माहिती घेऊन उद्या पत्रकारांना देईन.

सेल डीड रद्द करणारे अजित पवार कोण?

अजित पवार यांनी यापूर्वीच मुंढवा भूखंड खरेदी विक्रीचा व्यवहार रद्द करण्यात आल्याचा दावा केला आहे. अंजली दमानिया यांनी त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्या म्हणाल्या, अजित पवार हा व्यवहार रद्द करणारे कोण आहेत? मुळात उपमुख्यमंत्री हे पदच घटनाबाह्य आहे. हे पदच अस्तित्वात आहेत. ते अर्थमंत्री आहेत. अर्थ मंत्रालयाच्या नियम पु्स्तिकेनुसार त्यांना आपल्या खात्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत पडू शकत नाहीत. कोणताही व्यवहार हा त्याच्या कायद्याने रद्द होतो. 5 कायदे सेल डीड रद्द करण्याची परवानगी देतात त्याच्या सेक्शन प्रमाणे सेक्शन 16 ऑफ स्पेसिफिक रिलिफ अॅक्टनुसार जर दोन व्यक्तींनी फ्रॉड केला असेल तर त्यांना व्यवहार रद्द करण्याचा कोणताही अधिकार नाही.

कोर्टाशिवाय कुणीही व्यवहार रद्द करू शकत नाही

त्या म्हणाल्या, आत्ताच्या घडीला सुरुवातीला सांगितले गेले गेले की, 21 कोटी घेऊन हा व्यवहार रद्द होणार. त्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, हा आम्हाला पैसे नकोत. आम्हाला तो व्यवहार रद्द करून हवा. त्याच्यापुढे ते म्हणतात, 21 कोटी नव्हे 42 कोटी घेऊन हा व्यवहार रद्द होणार. पण लिगली हा व्यवहार ना अजित पवार रद्द करू शकतात ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रद्द करू शकतात ना पंतप्रधान नरेंद्र मोदी रद्द करू शकतात. कुणाकडेही ते अधिकार नाहीत.

कारण, यात फ्रॉड झाला आहे. त्यामुळे यात सिव्हिल कोर्ट यातील गैरव्यवहार तपासत नाही तोपर्यंत हा व्यवहार कुणीही रद्दबातल करू शकत नाही. सरकारने यासंबंधी एखादी कारवाई केली तर मी त्याला हायकोर्टात आव्हान देईन, असे दमानिया म्हणाल्या.

जनाची नव्हे मनाची लाज असेल तर राजीनामा द्यावा अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, मला आत्ता बऱ्याच ठिकाणावरून बरीच माहिती गोळा करायची आहे. त्यामुळे मी आता कुठे जात आहे व कुणाला भेटणार आहे हे मी काही सांगू शकत नाही. उद्या पत्रकार परिषदेत या सर्व गोष्टी सांगेन. कोणत्याही माणसाला ज्याला जनाची नाही मनाची लाज असेल असा माणूस तत्काळ राजीनामा देतो. अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यात मी आरोप केले होते तेव्हा त्यांनी सायंकाळी 5 वा. अचानक राजीनामा दिला होता.

पण आता तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत. पुण्याचे पालकमंत्री आहेत. असे असताना सरकारने पुण्याच्या अधिकाऱ्यांचा भरणा असलेली एक चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीकडून निष्पक्ष चौकशीची कशी अपेक्षा ठेवावी हा प्रश्न आहे. त्यामुळे अजित पवारांनी मनाची लाज असेल तर तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे दमानिया म्हणाल्या.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

28 नोव्हेंबरचे टॅरो राशिभविष्य: कुंभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या पदोन्नतीला मंजुरी मिळेल, कन्या राशीच्या लोकांसाठी...

0
11 तासांपूर्वीकॉपी लिंकशनिवार, 28 नोव्हेंबर रोजी कुंभ राशीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना रखडलेल्या बढती आणि थकीत भत्त्यांना मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मकर राशीच्या ज्या...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना उच्च पद मिळण्याचे योग, तर कन्या राशीच्या लोकांना प्रमोशन...

0
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना उच्च पद किंवा मोठी प्रशासकीय जबाबदारी मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. सरकारी कंत्राटे आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित...

एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! – श्री. शॉन क्लार्क

0
‘कॉप-३१’ जागतिक हवामान परिषदेत भारतीय शिष्टमंडळातर्फे भारताचा आध्यात्मिक संशोधन दृष्टिकोन सादर ‘पर्यावरण जाणीव चळवळ’ : एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! - श्री. शॉन...

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!