Homeमहाराष्ट्रProf Gautampurtra Kamble Social Democracy Fraternity Constitution Day Laxmikant Deshmukh Dr Ambedkar...

Prof Gautampurtra Kamble Social Democracy Fraternity Constitution Day Laxmikant Deshmukh Dr Ambedkar | सामाजिक विषमता लोकशाहीसाठी धोक्याची घंटा: प्रा. गौतमपुत्र कांबळे यांचे संविधान दिनी प्रतिपादन, म्हणाले – लोकशाहीत बंधुत्व अपरिहार्य – Pune News

राजकीय लोकशाही टिकवण्यासाठी सामाजिक लोकशाही आणि बंधुता महत्त्वाची आहे, कारण लोकशाहीत बंधुत्व अपरिहार्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. गौतमपुत्र कांबळे यांनी केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित संविधान दिनानिमित्त एस.एम. जोशी फाउंडेशन

.

प्रा. कांबळे म्हणाले की, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यांचे नाते एकमेकांशी सुसंगत आहे. आपल्या समाजात गरीब-श्रीमंत अशी विषमता दिसून येते, जी आपल्या अज्ञान आणि उच्च सहनशीलतेमुळे आपण सहन करतो. भौतिक गोष्टी बाजूला ठेवून मनुष्य समान आहे हे तत्व स्वीकारून समाजात समानता आणणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी ‘संविधानाच्या परिप्रेक्षात भारतीय लोकशाहीची वाटचाल – नेहरू ते मोदी’ या विषयावर, तर माजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘बी.एन. रावना संविधानाचे शिल्पकारत्व देण्याचा प्रयत्न’ या विषयावर व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त अन्वर राजन यांच्यासह उद्घाटक ॲड. अभय छाजेड उपस्थित होते.

प्रा. कांबळे यांनी पुढे सांगितले की, आपल्या आजूबाजूला वाईट गोष्टी घडत असताना आपण नेमके काय करतो, असा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. भय, श्रद्धा, स्वार्थ आणि अज्ञान ही वाईटाची चार प्रमुख अंगे आहेत. केवळ बौद्धिक चर्चा करून कृती न केल्यास त्या चर्चांना अर्थ नाही, त्यामुळे प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे. देशात मोठ्या प्रमाणात असलेली सामाजिक विषमता बदलण्याची गरज आहे.

ठराविक जात आणि धर्म आधारित प्राबल्य हे समूह हुकूमशाहीकडे वाटचाल करणारे आहे. ज्यांनी जात आणि धर्म विचारांची चौकट मोडून वाटचाल केली, ते महापुरुष झाले. जाती नष्ट करण्यासाठी जातीची बंधने मोडली पाहिजेत आणि यासाठी जातिनिर्मूलन कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. प्रचलित निवडणूक पद्धत बदलण्याची गरज असून, मताला महत्त्व नसल्याबाबत गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. लोकशाहीचे चार खांब आज जाती, धर्म आणि भ्रष्टाचार यांनी पोखरले आहेत, त्यामुळे पाचवा खांब म्हणून ‘सेक्युलरिझम’ (धर्मनिरपेक्षता) निर्माण झाला पाहिजे, कारण तोच समाजाचा डोलारा पेलू शकतो. अनुदानित शाळांमध्ये कोणतेही धर्म आधारित शिक्षण दिले जाऊ नये, कारण ते सर्व समाजाच्या विरोधात आहे.

राव यांना संविधान शिल्पकार म्हणणे चुकीचे

लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, मसुदा समितीचे सहा सदस्य होते आणि त्याचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते.डॉ.आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार असून सल्लागार बी.एन.राव यांचे नाव त्याकाळी निर्माते म्हणून कोणी घेतले नसल्याचे दिसून येते आणि ते प्रशासकीय सेवक होते. १३ विविध कमिट्यांचे अहवाल एकत्र करून त्यांनी संविधानाचा कच्चा मसुदा तयार केला. त्यात चार महिने आवश्यक ते बदल डॉ.आंबेडकर यांनी अभ्यासपूर्ण केले आणि त्यानंतर पुढे आवश्यक ते मोठे २० बदल करून अंतिम ड्राफ्ट काम केले. सहा महिने काम केल्यावर राव यांची संयुक्त राष्ट्रसंघात बदली झाली पुढे संविधान निर्मितीचे काम दीड ते दोन वर्ष सुरू होते त्यामुळे राव यांना संविधान शिल्पकार म्हणणे चुकीचे आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!