Homeमहाराष्ट्रNagpur Winter Session Update; Opposition Demands Extension, CM Fadnavis Points to Covid-Era...

Nagpur Winter Session Update; Opposition Demands Extension, CM Fadnavis Points to Covid-Era Short Sessions | हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा: विरोधकांची आग्रही मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांनी दाखवले कोरोना काळातील अधिवेशनांकडे बोट – Maharashtra News

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. या अधिवेशनाचे अवघ्या आठवड्याभरातच सूप वाजणार आहे. त्यामुळे विरोधकांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात केवळ 3-4 दिवसांचे अधिवेशन व्हायच

.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. हे अधिवेशन 14 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अल्प अधिवेशनावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी कामकाजाला सुरुवात होताच हा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्राचे एकत्रिकरण झाल्यानंतर नागपुरात किमान 2 महिन्यांचे अधिवेशन व्हावे असे निश्चित करण्यात आले. आमचे मित्र विरोधी पक्षात असताना एक महिना अधिवेशन चालायचे. ठीक आहे. पण आज सरकार घाईघाईने पुरवणी मागण्या मांडत आहे. सरकारला एवढी घाई का आहे? असे ते म्हणाले.

संशयाचे वातावरण निर्माण करू नका – भास्कर जाधव

पटोलेंनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनीही अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. हिवाळी अधिवेशन हे विदर्भाचे असल्याने ते विदर्भ करारानुसार व्हावे अशी भूमिका नाना पटोले यांनी घेतली आहे. त्यावर तुम्ही निर्णय देणार, हे ठीक आहे. पण तुम्ही असा संदेश पाठवला की, आम्ही तिथे या गोष्टींना परवानगी दिली होती. आम्ही तिथे आमचे मत मांडले होते. आम्ही 8 ते 19 डिसेंबरपर्यंत अधिवेशन व्हावे असा आग्रह धरला होता. अधिवेशनाचा कालावधी एखाद्या आठवड्याने वाढवण्याची आमची मागणी होती. निर्णय झाला ठीक आहे, पण तुम्ही आमच्याविषयी संशयाचे वातावरण निर्माण करू नका, असे भास्कर जाधव म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे कोरोना काळातील अधिवेशनांकडे बोट

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही नेत्यांच्या मागणीला उत्तर दिले. ते म्हणाले, नाना पटोले यापूर्वी पीठासीन अधिकारी होते. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपण पुरवणी मागण्या सादर करतो, जी विधेयके पारित करायची आहेत त्याची ओळख पहिल्या दिवशी करून दिली जाते हे त्यांना ठावूक असावे. विशेषतः अध्यादेश पहिल्या दिवशी दाखवण्याचा नियम आहे. मागील 25-30 वर्षांतील अधिवेशनांच्या पहिल्या दिवसाची माहिती काढली तर यापेक्षा वेगळा अजेंडा दिसणार नाही. अधिवेशन अधिकाधिक दिवसांपर्यंत चालावे अशी आमचीही भावना आहे.

मागील 25 वर्षांत नागपूरमध्ये सर्वाधिक काळ अधिवेशन हे मी मुख्यमंत्री असतानाच चालले. ते पुढेही चालेल. पण आता आचारसंहिता सुरू आहे. पुढे कधीही आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे पहिला आठवा व आणखी 2 दिवस एवढे अधिवेशन चालवण्याचे आपण निश्चित केले. आता अधिवेशनाचे उर्वरित दिवस पुढच्या वर्षीच्या अधिवेशनात समायोजित करून टाकू. पण मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे. नाना पटोले यांचा अधिवेशनासाठी कितीही आग्रह धरला तरी ते अध्यक्ष असताना विधिमंडळाची मुंबईतील अधिवेशनेही 3 व 5 दिवसांची झाली होती. इतर राज्यांत अधिवेशने सुरुळीत सुरू होती. तिथे कोरोना नव्हता का? बाकी राज्यांत 15-20 दिवस अधिवेशने चालायची. पण महाराष्ट्रात केवळ 3-4 दिवस कामकाज चालायचे, असे मुख्यमंत्री म्हणाले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!