Homeमहाराष्ट्रMP Padole's scathing attack on the administration! | खासदार पडोळेंची प्रशासनाला झणझणीत...

MP Padole’s scathing attack on the administration! | खासदार पडोळेंची प्रशासनाला झणझणीत झडती!: गोसेखुर्द प्रकल्पबाधितांच्या मागण्यांवर बैठक, मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी वेळ मागितला – Nagpur News

गोसेखुर्द प्रकल्पबाधितांचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून मार्गी लागलेले नाहीत… शेकडो कुटुंबं उध्वस्त झाली, पुनर्वसनाच्या नावाखाली फसवणूक झाली… गोसेखुर्द प्रकल्पबाधितांचे प्रश्‍न सोडवण्यात प्रशासन व शासन गंभीर नसल्याची खरमरीत टीका खासदार डॉ. प्रश

?

पुनर्वसनाच्या नावाखाली वर्षानुवर्षे चाललेली फसवणूक थकित मुआवजे, स्थानांतरण न झालेली गावे, रोजगाराच्या अपूर्ण आश्वासनांपासून ते विस्थापितांना मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवणाऱ्या प्रणालीवर खासदार डॉक्टर पडोळेंनी थेट सवाल केले. त्यांनी प्रशासनाकडून मिळालेल्या रिकाम्या आश्वासनांवर जोरदार ताशेरे ओढले आणि प्रकल्पग्रस्तांना मिळणाऱ्या अन्यायाविरुद्ध खंबीर भूमिका घेतली.

खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून प्रकल्प बाधित आणि सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत तातडीने बैठक घेण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी स्वतः मुख्यमंत्री यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी वेळही मागितलेली आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. यावेळी खासदार डॉक्टर पडोळे स्पष्ट शब्दांत सांगितले की, मुख्यमंत्री यांच्याकडून वेळ मिळाला नाही किंवा ठोस निर्णय न झाल्यास आम्ही आंदोलनाशिवाय राहणार नाही. कारण यापूर्वी अंभोरा ब्रिजवर केलेल्या आंदोलना दरम्यान प्रशासनाकडून बैठकीच्या प्रस्ताव दिला गेला होता. हा बैठकीचा प्रस्ताव आंदोलनकर्त्यांनी मोठ्या दिलाने मान्य केला आणि 5 जून रोजी आढावा बैठक झाली. परंतु या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांना आणि प्रश्नांना समर्पक अशी उत्तर मिळाले नाही त्यामुळे सर्वांचा हिरमोड झालेला आहे.

खासदारांनी म्हटले आहे की गरज पडली तर मागण्या पूर्ण होईपर्यंत रस्त्यावर उतरायचीही तयारी ठेवली आहे. हा लढा केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवला जाईल. हे आंदोलकांचे नाही, तर जनतेच्या आत्मसन्मानाचे आंदोलन असेल.

या बैठकीला जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, पुनर्वसन अधिकारी, वीज वितरण, कृषी, जलसंपदा, पाटबंधारे, महसूल इत्यादी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अनेक विषयांवर चर्चा होऊन बहुतांश मुद्द्यांवर प्रथम राज्य सरकारला पाठविले आहे किंवा या प्रकरणांमध्ये राज्य सरकारच काय तो निर्णय घेऊ शकते अशा प्रकारची उत्तरे देण्यात आली. अंमलबजावणी करण्यासाठी आश्वासना वगळता दुसरे काहीही हाती लागले नाही. यामुळे खासदार पडोळेंनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर पुन्हा वेळकाढूपणा आणि आश्वासनांचे खेळ सुरूच राहिले, तर यंदा तीव्र आंदोलन केले जाईल.

प्रकल्पबाधितांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलनाचीही तयारी आमची आहे. या लढ्यात मी आणि माझी संपूर्ण टीम त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी आहे, असेही ते म्हणाले.

प्रेम वणवे जि.प.सदस्य, राम बांते, भाऊ कातोरे, रेखा रेहपाडे सरपंच, प्रमिला शहारे, दिलीप मडामे, अजय रेहपाडे, सेवक शेंडे, यशवंत टीचकुले, धनंजय मुटकीरवार, मंजुषा गजबिये, भूषण डहारे, नितीन धानोरकर, मोठया संख्येने उपस्थित होते.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बंकीपूर पोटनिवडणूक: नामांकनानंतर भाजपने उमेदवार बदलला गडबड

0
मराठी बातम्याराष्ट्रीयबंकीपूर पोटनिवडणूक: नामांकनानंतर भाजपने उमेदवार बदलला गडबड | नितीन नवीन आसनपाटणा10 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या राज्यसभेवर जाण्यामुळे रिक्त...

तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन:वारकरी, शेकऱ्यांना सुखी ठेव; देवेंद्र फडणवीसांचे विठुराया चरणी...

0
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीमध्ये सहभागी होणे अतिशय सुंदर अनुभूती आहे; महाराष्ट्राच्या या...

अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या एका तरुणाला गुगलने अटक केली:कानपूर पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला, अल्पवयीन बहिणींच्या...

0
कानपूर पोलिसांनी शुक्रवारी बाल लैंगिक शोषण प्रकरणी एका तरुणाला अटक केली. आरोपी तरुण आपल्या बहिणींसोबत आणि जवळपास राहणाऱ्या इतर मुलींसोबतच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ...

10 जुलैचे राशिभविष्य:मीन राशीच्या लोकांना भागीदारीच्या व्यवसायात चांगला नफा, वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा

0
शुक्रवार, 10 जुलै रोजी वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांची नवीन कामे सुरू करण्याची इच्छा पूर्ण होऊ...
spot_img

विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी पोहोचली प्रियंका चोप्रा:पती निक जोनासला व्हिडिओ कॉलवर लाइव्ह टूर दाखवला, सामन्यादरम्यान...

0
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. ती महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पहिल्या रांगेत बसलेली दिसली, जिथे कोको...

लग्नानंतर नोकरी सोडली:आता फक्त एक पत्नी अन् आई म्हणून जगतेय, सगळ्यांना आनंदी करण्याच्या प्रयत्नात...

0
प्रश्न– मी 34 वर्षांची महिला आहे. लग्नानंतर मी माझी नोकरी सोडली होती, कारण कुटुंबाची जबाबदारी वाढली होती. गेल्या काही वर्षांपासून माझी ओळख फक्त...

फाटलेल्या बुटांच्या व्हायरल व्हिडिओवर सनी देओलची फिरकी:कार्यक्रमात म्हणाले- कोणीही बुटाचा फोटो घेऊ नये, धर्मेंद्र...

0
बॉलिवूड अभिनेता सनी देओल गुरुवारी आपल्या 'इक्का' चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या कार्यक्रमात पोहोचले. यावेळी त्यांनी त्यांच्या अलीकडील 'बुटाच्या वादा' वर विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली. खरं...

बीएसएनएल सॅटेलाइट फोन भारतात लाँच

0
नवी दिल्ली9 तासांपूर्वीलिंक कॉपी करासरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने भारतात नवीन सॅटेलाइट फोन लॉन्च केला आहे. याची किंमत करांसहित 1,34,166 रुपये ठेवण्यात आली...
error: Content is protected !!