Homeमहाराष्ट्रSatej Patil Slams Supplementary Demands: 'Surgical Strike on Budget'; Maharashtra Debt Rises...

Satej Patil Slams Supplementary Demands: ‘Surgical Strike on Budget’; Maharashtra Debt Rises to ₹9.32 Lakh Cr | काँग्रेस आमदार सतेज पाटलांचे वर्मावर बोट: पुरवणी मागण्या बजेटवरील सर्जिकल स्ट्राइक; शिस्त-प्राधान्यक्रम सर्वच काढले – Nagpur News

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारने राज्याच्या अर्थिक बजेटमध्ये मंजूर झालेल्या पुरवणी मागण्यावर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी सरकारला धारेवर धरले. राज्याचे एकूण कर्ज 9,32,000 कोटी वाढून प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर 82 हजारांचे कर्ज वाढले आह

.

या संदर्भात विधान परिषदेमध्ये चर्चा सुरु असताना आमदार सतेज पाटील यांनी पुरवणी मागणी ही आकस्मिक निधीसाठी असताना निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन केलेली पुर्वनियोजित उधळपट्टी असल्याचा आरोप केला आहे. ती राज्याच्या आर्थिक स्थैर्यावर घाला घालणारी, आणि काही मोजक्यात लोकांचे हित जपणारी आहे. सरकारने आर्थिक शिस्त कुठे? प्राधान्यक्रम कुठे? आणि जनतेचे हित कुठे? याचे उत्तर दिले पाहीजे, अशी मागणी देखील त्यांनी केली.

नेमके काय म्हणाले सतेज पाटील

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आज सरकारने राज्याच्या अर्थिक बजेटमध्ये मंजूर झालेल्या पुरवणी मागण्यावर विस्तृत मत मांडले. राज्य सरकारने आणलेल्या पुरवणी मागण्या या आर्थिक गरजेपेक्षा निवडणूकपूर्व राजकीय स्वार्थाने प्रेरित असल्याचे सरकारला जाणवून दिले. 7.5 लाख कोटींचे बजेट आता 8 लाख 90 हजार कोटींवर पोहोचले आहे. त्यामूळे मुळ अर्थसंकल्प तब्बल 17. 53 % ने फुगवला आहे. राज्याचे एकूण कर्ज 9,32,000 कोटी वाढून प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर 82 हजारांचे कर्ज वाढले आहे. ही वाढ म्हणजे आर्थिक शिस्तीचा भंग आणि सरकारकडे कोणतीही दूरदृष्टी नसल्याचं द्योतक आहे.

पुरवणी मागण्या या आकस्मिक खर्चासाठी असतात; पण ‘लाडकी बहीण’, नगरविकास प्रकल्प, कर्जफेड यांसारख्या पूर्वनियोजित बाबींवर पुरवणी मागण्या आणणे म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी आहे! 87 % निधी फक्त 11 विभागांना देण्यात आला असून कृषी, पशुसंवर्धन, ग्रामीण विकास यांसारख्या मूलभूत क्षेत्रांसाठी तुटपुंज्या तरतुदी केल्या आहेत.

2025 च्या पहिल्या 3 महिन्यातच राज्यात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील 269 फक्त मराठवाड्यातील आहेत.राज्यातील पीक विमा योजना बंद केल्या आणि कृषी समृद्धी चालू केली गेली मात्र वित्त खातं त्याला न्याय देत नाही. कृषी खात्याला फक्त 616 कोटी निधी दिला असून त्यातील तब्बल 222 कोटी गोशाळांना वितरित केला आहे. शेतकऱ्यांची 12,500 कोटींचे प्रलंबित देयके असताना केवळ 616 कोटी रुपयांची तरतूद ही शेतकऱ्यांचा अपमान आहे.

आज महाराष्ट्रात दररोज 6 खून आणि 23 बलात्कार होत असताना गृहविभाग काय करत आहे ? पुण्यात कोयता गँग सक्रिय आहेत. राज्यातील महिला आणि मुली अत्याचाराला बळी पडत आहेत. संतोष देशमुख प्रकरण असेल, डॉ. संपदा मुंडे प्रकरण असेल अशा घटनांमुळे महाराष्ट्राच्या कायदा सुवव्यवस्थेवर डाग पडला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामुळे तर सध्या अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत. या विभागाची राज्यात 40 हजार कोटींची देयके प्रलंबित असल्याने काँट्रॅक्टरच्या आत्महत्या वाढत आहेत. भ्रष्टाचारामुळे राज्यातील रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून अपघात वाढले आहेत. राज्याच्या विकासवाहिन्या म्हणवणारे महामार्ग सध्या खड्डे आणि वाहतुक कोंडीने जाम झाले आहेत. पुरवणी मागणी ही आकस्मिक निधीसाठी असताना निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन केलेली पुर्वनियोजित उधळपट्टी आहे. ती राज्याच्या आर्थिक स्थैर्यावर घाला घालणारी, आणि काही मोजक्यात लोकांचे हित जपणारी आहे. सरकारने आर्थिक शिस्त कुठे? प्राधान्यक्रम कुठे? आणि जनतेचे हित कुठे? याचे उत्तर दिले पाहीजे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!