Homeमहाराष्ट्रशिवसेनेचे वाघ अजून जीवंत आहेत: विजयी दिवसाचा सोहळा शिवतीर्थावर व्हावा, अशी आमची...

शिवसेनेचे वाघ अजून जीवंत आहेत: विजयी दिवसाचा सोहळा शिवतीर्थावर व्हावा, अशी आमची इच्छा- संजय राऊत

महाराष्ट्र (मुंबई) : महाराष्ट्र आणि शिवसेना, शिवसेनेचे वाघ अजून जीवंत आहेत, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे. तसेच 5 तारखेला ठाकरे बंधू एकत्र येतील असेही त्यांनी सांगितले आहे.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र आणि शिवसेना, शिवसेनेचे वाघ अजून जीवंत आहेत. बघा नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. या तिघांनी महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना सांगितले की आहोत आम्ही अजून, टायगर अभि जिंदा हें. 5 तारखेला मराठी विजय दिवस जो आहे त्याला आम्ही त्यांनाही बोलवणार आहोत. त्यांनी बघावे की मराठी एकजुटीने कसा विजय मिळवला.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, शत्रूला कधीही प्रिय म्हटले पाहिजे. शिवसेनाप्रमुखांनी सांगितले आहे की शत्रू हा तोलामोलाचा असला पाहिजे. आपण त्यांना दाखवून दिले आहे की महाराष्ट्राची एकजूट काय आहे. पापाचा द्वेष करा पाप्याचा करू नका, असा एक इंग्रजीत सुविचार आहे. संघर्ष करायला उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील, आम्हाला आवडते संघर्ष करायला. माझी राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. शिवतीर्थ येथे विजयी मेळावा व्हावा अशी आम्ही विनंती अर्ज देखील दिला आहे. त्याला अजून परवानगी देण्यात आलेली नाही सरकारकडून. त्यावर राज ठाकरे यांनी एका सभागृहाचा पर्याय सुचवला आहे. 5 जुलै रोजी 12 च्या सुमारास कार्यक्रम सुरू होईल. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील.

संजय राऊत म्हणाले, या लढ्यात जे सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी असेल, कॉंग्रेस असेल, डावे पक्ष असतील या सगळ्यांना आम्ही आमंत्रित करू. कारण महाराष्ट्राची एकजूट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ही राजकीय पक्षाच्या पलीकडे असते. हे आम्हाला दिल्लीला दाखवून द्यायचे आहे की जेव्हा जेव्हा दिल्लीने अघोरी कायद्यांच्या आधारे किंवा सत्तेच्या आधारे हल्ले केले तेव्हा हा महाराष्ट्र अधिक ताकदीने उभा राहिला. हेच आम्हाला मोदी आणि शहा यांना दाखवून द्यायचे आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

मेंटल हेल्थ- पती खूप पझेसिव्ह:प्रत्येक सेकंदाला विचारतो– ‘कुठे आहेस’; खूप श्वास गुदमरतो, वाटते हे...

0
प्रश्न– माझा पार्टनर (पती) माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खूप पझेसिव्ह (अधिकार गाजवणारा) देखील आहे. प्रत्येक वेळी त्याला हे जाणून घ्यायचे असते...

जनाब उद्धव ठाकरे रामरक्षा नव्हे, पक्षरक्षा करत आहेत:रामरक्षा आंदोलनावरून नवनीत राणांची टीका, 18 जुलैला...

0
अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी पेटीत झालेल्या कथित चोरीच्या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता नागपुरात १८ जुलै रोजी 'रामरक्षा...

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

पंतप्रधानांच्या चंदीगड दौऱ्याचे मोमेंट्स:मोदींच्या स्टेजवर काँग्रेस खासदार; उद्घाटन शिलालेखावर मुख्यमंत्री मान यांचे नाव; मुलाच्या...

0
हरियाणातील जिंद येथे देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी चंदीगड आणि पंजाब दौऱ्यावर पोहोचले. चंदीगडमध्ये पंतप्रधानांनी 4700 कोटी रुपयांच्या...
spot_img

मेंटल हेल्थ- पती खूप पझेसिव्ह:प्रत्येक सेकंदाला विचारतो– ‘कुठे आहेस’; खूप श्वास गुदमरतो, वाटते हे...

0
प्रश्न– माझा पार्टनर (पती) माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खूप पझेसिव्ह (अधिकार गाजवणारा) देखील आहे. प्रत्येक वेळी त्याला हे जाणून घ्यायचे असते...

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

चायना मूनशॉट AI किमी K3 लाँच

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराचीनी कंपनी मूनशॉट एआयने (AI ने) आपले नवीन एआय मॉडेल किमी K3 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे...

देशात लवकरच प्लास्टिक नोटा चलनात येतील, आरबीआयIने निविदा जारी केली:₹10 आणि ₹20 च्या नोटांपासून...

0
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच देशात प्लास्टिक म्हणजेच पॉलिमरपासून बनवलेल्या नोटांचा पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशात नवीन पिढीचे चलन...
error: Content is protected !!