Homeमहाराष्ट्रMaharashtra Local Elections Postponed Revised Schedule Court Appeal | नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांबाबत मोठी...

Maharashtra Local Elections Postponed Revised Schedule Court Appeal | नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांबाबत मोठी अपडेट: काही ठिकाणच्या निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर करण्याचे आयोगाचे आदेश – Maharashtra News

राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमात मोठा बदल करण्यात आला आहे. नामनिर्देशनपत्र रद्द/स्वीकृतीवरील निर्णयाविरोधातील अपिलांचा निकाल उशिरा लागल्याने, तसेच काही प्रकरणांत निकाल न मिळताच निवडणूक चिन्ह वाट

.

निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, छाननी प्रक्रियेत बाद ठरलेल्या किंवा व्यथित झालेल्या उमेदवारांना जिल्हा न्यायालयात अपील करण्याची मुदत होती. नियमानुसार, या अपीलांवरील निकाल 22 नोव्हेंबर 2025 पर्यंत लागणे अपेक्षित होते. जेणेकरून, न्यायालयाचा निकाल आल्यानंतर संबंधित उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी (नियम 17 (1) (ब) नुसार) तीन दिवसांचा वैधानिक कालावधी मिळेल आणि त्यानंतर 26 नोव्हेंबरला चिन्ह वाटप करता येईल.

मात्र, अनेक ठिकाणी जिल्हा न्यायालयाचे निकाल 23 नोव्हेंबर किंवा त्यानंतर आले. असे असतानाही काही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांना माघारीसाठी आवश्यक वेळ न देताच 26 नोव्हेंबरला घाईघाईने चिन्ह वाटप केल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे. ही कार्यवाही नियमबाह्य ठरत असल्याने आयोगाने हा कठोर निर्णय घेतला आहे.

कुठल्या निवडणुका स्थगित होणार?

आयोगाच्या आदेशानुसार खालील दोन प्रकारच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

1. सदस्य पद: ज्या वॉर्डमध्ये किंवा जागेसाठी अपील दाखल होते आणि त्याचा निकाल २३ नोव्हेंबर 2025 किंवा त्यानंतर आला आहे, फक्त त्या विशिष्ट जागेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.

2. अध्यक्षपद: जर अपीलाचा विषय अध्यक्षपदाशी संबंधित असेल आणि तिथे उशिरा निकाल लागला असेल, तर त्या संपूर्ण नगरपरिषद किंवा नगरपंचायतीची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे आदेश

राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की, आपल्या जिल्ह्यातील अशा प्रकरणांची तातडीने माहिती संकलित करावी. ज्या ठिकाणी २३ नोव्हेंबरनंतर न्यायालयाचे आदेश आले आहेत, तिथली निवडणूक प्रक्रिया थांबवून नव्याने सुधारित कार्यक्रम राबवावा. यासाठी आयोगाने सुधारित वेळापत्रक (परिशिष्ट-1) जारी केले असून जिल्हाधिकाऱ्यांनी अशा जागांची यादी आयोगाला विनाविलंब सादर करायची आहे.

नवीन कार्यक्रम जाहीर करण्याचे आयोगाचे आदेश

दरम्यान, न्यायालयीन अपिलांमुळे किंवा नामनिर्देशन प्रक्रियेत आलेल्या तांत्रिक अडथळ्यांमुळे प्रभावित झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी सुधारित सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2025 जारी करण्यात आला आहे.

सुधारित कार्यक्रम कसा असणार?

  • संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी 4 डिसेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जारी करावयाचा आहे.
  • उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे मागे घेण्यासाठी 10 डिसेंबरपर्यंत (दुपारी 03.00 वाजेपर्यंत) मुदत दिली आहे
  • त्यानंतर 11 डिसेंबर रोजी आवश्यकतेनुसार निवडणूक चिन्हांचे वाटप करून अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.
  • आवश्यकता भासल्यास मतदानाची तारीख 20 डिसेंबर अशी निश्चित करण्यात आली असून मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल.
  • मतमोजणीची प्रक्रिया 21 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता सुरू होणार.
  • निकाल 23 डिसेंबर 2025 पूर्वी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
  • हा संपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्र नगरपरिषदा व नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियमातील कलम 19 नुसार जाहीर करण्यात आला आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!