Homeमहाराष्ट्रAmbadas Danve Backs Uddhav; Speaks on Jadhav Entry & Mango Row |...

Ambadas Danve Backs Uddhav; Speaks on Jadhav Entry & Mango Row | माझ्यात अन् खैरेंमध्ये वाद नाही: मी काहीही मनाने करत नाही; उद्धव ठाकरेंचा आदेश अंतिम, हर्षवर्धन जाधवांच्या प्रवेशाच्या चर्चेवर अंबादास दानवेंनी मांडली भूमिका – Chhatrapati Sambhajinagar News

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काल मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

.

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जाधव यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाला विरोध दर्शवला असताना, दानवे यांनी स्पष्ट केले की, खैरे आणि माझ्यात काहीही वाद नाही. त्यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु खैरे यांच्या मतापेक्षा उद्धव ठाकरेंचा विचार माझ्यासाठी महत्त्वाचा आहे.

‘ठाकरेंच्या आदेशाचे पालन हेच माझे काम

हर्षवर्धन जाधव यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाबद्दलच्या चर्चांवर बोलताना अंबादास दानवे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी माझ्या मनाने काहीही गोष्ट करत नाही. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाने काम करतो. पक्षात कुणाला घ्यायचे आणि नाही, हा निर्णय मी घेऊ शकत नाही. उद्धव ठाकरेंच्या आदेशाची अंमलबजावणी करणे माझे काम आहे आणि मी तेवढेच काम करतो, असे म्हणत त्यांनी जाधव यांच्या संभाव्य प्रवेशाचा निर्णय पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या हातात असल्याचे संकेत दिले.

..तर आवाज उठवावा लागेल

मतचोरी ही देशभरातील सर्वात मोठी चोरी आहे. मी टाकलेले मतच जर चोरी होत असेल निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाला मदत होत असेल तर आवाज उठवावा लागेल. कुणीही पुढाकार घेतला तरी त्यामध्ये सर्वांनी सहभागी होणं गरजेचे आहे.

हापूस आंबा हा आपला हे सांगण्याची गरज नाही

अंबादास दानवे म्हणाले की, हापूस आंबा हा आपला आहे हे सांगण्याची गरज नाही. जगभरात त्याला मागणी आहे. हापूस आंबा महाराष्ट्रासह देशाची शान आहे. गुजरातचा हापूस हे काही तरी नवीन सुरू होत आहे. मुख्यमंत्री असताना पालकमंत्र्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. पण शिष्टाचाराचे पालन होत नाही हे छत्रपती संभाजीनगरात दिसून येत आहे.

भगवा शौर्य दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने महाआरती

भगवा शौर्य दिनानिमित्त शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज 6 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडी परिसरातील दुपारी हनुमान मंदिर येथे भजन व महाआरती करण्यात आली. राम मंदिर निर्माण आंदोलनातील शहिदांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली.

भगव्या शौर्याचा जागर- खैरे

भगवा शौर्याचा जागर, श्रीराम भक्तीचा गौरव आणि हिंदुत्वाचा अभिमान ज्वलंत करण्यासाठी तसेच राम मंदिर निर्माण आंदोलनातील शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी या आरतीचे आयोजन करण्यात आल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले.

भगवा शौर्य दिन- दानवे

भगवा शौर्य दिन हा आपला अभिमानाचा दिवस असून शिवचरित्र, हिंदू संस्कृती आणि महाराष्ट्राच्या परंपरांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. समाजातील ऐक्य, बंधुता आणि शिवसेनेच्या विचारांची जपणूक हीच खरी सेवा असल्याचे शिवसेना नेते अंबादास दानवे म्हणाले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!