Homeमहाराष्ट्रmumbai elphinstone bridge dispute | मुंबईतील एल्फिन्स्टन पूल पाडकामाला स्थानिकांचा विरोध: 'पूल...

mumbai elphinstone bridge dispute | मुंबईतील एल्फिन्स्टन पूल पाडकामाला स्थानिकांचा विरोध: ‘पूल बंद’चा बोर्डही काढून टाकला, पोलिस घटनास्थळी दाखल – Mumbai News

मुंबई येथील 125 वर्ष जुना एल्फिन्स्टन ब्रिज आज दिनांक 25 एप्रिल पासून बंद करण्यात येणार होता. परंतु येथील स्थानिक नागरिकांनी याला विरोध करत हा ब्रिज पुन्हा सुरू केला आहे. येथील स्थानिक नागरिकांची पुनर्वसन याच भागात केले जावे अशी मागणी केली होती. त्या

?

यावेळी स्थानिकांनी जोरदार घोषणाबाजी करत काम बंद पाडले. इथे असलेला ‘पूल बंद’चा फलक या आंदोलकांनी काढून टाकला. एल्फिन्स्टन जवळ राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आधी सोडवला गेला पाहिजे. तसेच पूर्व पश्चिम जाण्यासाठी पादचारी पुलाचे काम आधी पूर्ण करा मगच हा पूल पूर्णतः बंद करा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. हा रस्ता बंद केल्यास आंदोलन अधिक तीव्र करु असा इशारा स्थानिकांकडून देण्यात येत आहे. या ठिकाणी पिढ्यानपिढ्या अनेक कुटुंब राहतात. त्यांचे पुनर्वसन न करताच हा पूल पाडण्यात येत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

परेल व प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूर्व – पश्चिमेला जोडणारा एलफिन्स्टन ब्रिज तोडून त्याठिकाणी नवीन ब्रिज तसेच शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्‌डाणपुलाचे काम मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. या कामासाठी एलफिन्स्टन ब्रिजमार्गे जाणारी वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. रहिवाशी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक विभागाने नागरिकांकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार बुधवारी वाहतूक विभागाने अधिसूचना जारी करत एलफिन्स्टन ब्रिज बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु नागरिकांनी यास विरोध करत ब्रिज सुरू केला आहे.

दरम्यान, परेल व प्रभादेवी परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णालयात जाण्या व येण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत दोन रुग्णवाहिकांची सोय करण्यात आलेली आहे. एक रुग्णवाहिका प्रभादेवी रेल्वे स्थानक पश्चिम रेल्वे पादचारी पूल येथे व दुसरी रूग्णवाहिका परेल रेल्वे स्थानक पूर्व येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच या रुग्णवाहिकेसोबत रुग्णांकरिता व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

आईच्या लिव्ह-इन-पार्टनरची मुलाने केली हत्या:मृतक ओरडत राहिला- मी काहीही केले नाही, गुजरातच्या राजकोटमधील घटना

0
गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील जेतपूर शहरात आईच्या 12 वर्षे जुन्या लिव्ह-इन रिलेशनशिपमुळे संतप्त झालेल्या मुलाने भर रस्त्यात चाकूने सपासप वार करून एका व्यक्तीची हत्या...

पहिल्यांदाच कॅमेऱ्यावर बनावट नोटांची टोळी:1 लाखाच्या बदल्यात 10 लाखांच्या नोटा; दावा- ATM ही पकडू...

0
पहिल्यांदा कॅमेऱ्यावर पाहा तुमच्या पर्सपर्यंत बनावट नोटा पोहोचवणाऱ्या टोळीचे चेहरे! इंस्टाग्रामवरील एका रीलमधून सुरू झालेली तपासणी बनावट नोटांच्या त्या सिंडिकेटपर्यंत पोहोचली, जे रील्समध्ये...

कल्याण मारहाण प्रकरणी विरोधक आक्रमक:गुंडांची चड्डी-बनियानवर धिंड काढा, राऊतांचा संताप; हे सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभते...

0
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये काल (मंगळवारी) एका महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना थेट मारहाण आणि धक्काबुक्की केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता....

10 जुलै रोजी योगिनी एकादशी:दशमी तिथीच्या संध्याकाळी करा भगवान विष्णूची पूजा, एकादशीला दान-पुण्य करा

0
शुक्रवार, 10 जुलै रोजी निज ज्येष्ठ कृष्ण पक्षाची एकादशी आहे, याला योगिनी एकादशी म्हणतात. हे व्रत भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्याच्या इच्छेने केले...
spot_img

वेस्ट इंडीजने मालिका जिंकली:श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना ड्रॉ, 4 वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका...

0
वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात नॉर्थ साउंड येथे खेळला गेलेला दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना अनिर्णित राहिला. यासोबतच वेस्ट इंडिजने दोन सामन्यांची कसोटी...

प्रभसिमरन सिंगला संधी; संजू सॅमसन नाबाद

0
क्रीडा डेस्क42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करासंजू सॅमसनला भारतीय संघातून वगळण्यात आलेले नाही. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने 2028 टी-20 विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे....

पावसाळ्यात वाढतात कीटक आणि झुरळे:10 खबरदारी घेतल्यास कीटक येणार नाहीत, तज्ञांकडून जाणून घ्या पळवून...

0
उन्हाळ्यानंतर पावसाळा दिलासा घेऊन येतो, पण या ऋतूत आर्द्रता आणि ओलसरपणा वाढतो आणि जागोजागी पाणी साचते. कीटकांच्या वाढीसाठी या परिस्थिती अनुकूल आहेत. यामुळेच...

कृती सेननने ‘मिमी’ चित्रपटाच्या वेळी एग्स फ्रीज केले:म्हणाली- लग्न किंवा मुले स्वतःच्या इच्छेने व्हायला...

0
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने खुलासा केला आहे की, तिने तिच्या 'मिमी' चित्रपटाच्या तयारीदरम्यान तिची अंडी (एग्स) फ्रीज केली होती. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या...
error: Content is protected !!