Homeमहाराष्ट्रDharashiv Farmers Lathi Charge Wind Power Project; Raju Shetty, Kailas Patil Condemn...

Dharashiv Farmers Lathi Charge Wind Power Project; Raju Shetty, Kailas Patil Condemn | पवनचक्कीच्या वादात शेतकऱ्याला पोलिसांकडून मारहाण: देवाभाऊंचे पोलिस गुंडांची भूमिका पार पडत असतील तर न्याय मागायचा कुणाकडे? – राजू शेट्टींचा सवाल – Maharashtra News

धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की प्रकल्पाशी संबंधित जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादात शेतकऱ्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील आणि स्वाभिमानी शेतक

?

शेतकऱ्यांनी पवनचक्की प्रकल्पासाठी सुरू असलेल्या कामाला विरोध करत काम अडवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच पवनचक्की व विद्युत लाइनसाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला द्या अन्यथा काम थांबवा अशी भूमिका घेतली होती. मात्र, पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. पोलिस कोणासाठी काम करतात? सर्वसामान्य जनतेसाठी की पवनचक्की माफियांसाठी? असा सवाल कैलास पाटील यांनी उपस्थित केला आहे. तर राजू शेट्टी यांनीही सोशल मीडियावर या मारहाणीचा व्हिडिओ पोस्ट करत संताप व्यक्त केला.

राजू शेट्टी यांची पोस्ट काय?

अंबानींचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी देवाभाऊ (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) तुमचे पोलिसच जर गुंडांची भूमिका पार पडत असतील तर शेतकऱ्याने न्याय मागायचा कुणाकडे? असा सवाल राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुय्कातील तांदळवाडी येथील गणेश शेरकर या शेतकऱ्याच्या जमिनीवर रिलायन्स रिन्यू पॅावर एनर्जीच्या टॅावर आणि वीजेची लाइन उभारण्याचे काम चालू आहे. शेरकर यांच्या क्षेत्रातून टॅावर व लाईन जात असल्याने त्याचा मोबदला रिलायन्स कंपनी देणार होती. अखेर मोबदला न देता टॅावर उभे केले. मात्र सदर टॅावरवर लाईन (वीजेच्या तारा) टाकण्यास शेतकऱ्याने विरोध केला. यावेळी संबधित कंपनीने पोलिसांना पाचारण केले.

सदर शेतकऱ्यास मोबदला न देता कंपनीने दडपशाहीने कामास सुरुवात केली. शेतकऱ्याने काम अडवल्याने पोलिस उपविभागीय अधिकारी राठोड याने सदर शेतकऱ्यावर लाठीचार्ज केला. यामध्ये गणेश शेरकर, अजय चोरघोडे, राजू कवडे यांना पोलिसांनी मारहाण केली. त्या सर्वांना रात्री दीड वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात ठेवलं त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. यादरम्यान कंपनीने उभारलेल्या टॅावरवर वीजेच्या तारा जोडण्यात आल्या. रात्री उशिरा या शेतकऱ्यांना सोडण्यात आले. अजूनही या कंपनीने संबधित शेतकऱ्यास पैसे दिलेले नाहीत.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर FDA ची कारवाई:8 लाखांचा संशयास्पद माल जप्त; सिया केतन अग्रवाल...

0
पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त...

ममता म्हणाल्या- भाजपला वाटते मला हार्ट अटॅक यावा:मी तोपर्यंत जिवंत राहीन, जोपर्यंत त्यांचा अंत...

0
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप वाटते की मला हृदयविकाराचा झटका यावा, पण मी ते संपेपर्यंत जिवंत राहीन. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...

15 जुलैचे राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांना मुलाखतीत यश मिळेल, मकर राशीच्या लोकांना थांबलेले पैसे मिळण्याची...

0
बुधवार, 15 जुलै रोजी कर्क राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या लोकांना थांबलेले पेमेंट मिळू शकते. मिथुन राशीच्या...

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...
spot_img

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...
error: Content is protected !!