पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएच्या पथकाने मार्केटयार्ड येथील सियाचे वडील प्रवीण गोयल यांच्या मालकीच्या पेढीवर धडक कारवाई केली. या कारवाईत विनापरवाना व्यवसाय आणि भेसळीच्या संशयावरून तब्बल 8 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, हे दुकान तात्काळ बंद करण्याचे कडक आदेश प्रशासनाने दिले आहेत. 4 हजारांहून अधिक किलोचा संशयास्पद माल जप्त एफडीएच्या पथकाने मार्केटयार्डमधील प्रवीण गोयल यांच्या ‘मेसर्स बी. जी. गोयल अँड कंपनी’ या पेढीवर अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान तब्बल ४,१७२ किलोचा संशयास्पद आणि आरोग्यास हानिकारक असणारा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. याची बाजारातील किंमत सुमारे ८ लाख १४ हजार ६३० रुपये इतकी आहे. जप्त केलेल्या साठ्यामध्ये ५९८ किलो ‘संत’ ब्रँडची हळद पावडर, १,२५८ किलो ‘साधू’ ब्रँड हळद पावडर, ५३८ किलो ‘ग्रीन लीफ’ तीळ आणि १,७७८ किलो ‘मधुर’ सोया मिनी चंक्स यांचा समावेश आहे. पुढील विश्लेषणासाठी या सर्व अन्नपदार्थांचे नमुने एफडीएने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. विनापरवाना व्यवसाय अन् नियमांचे गंभीर उल्लंघन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, प्रवीण गोयल यांची ही पेढी कोणताही वैध अन्न परवाना किंवा अधिकृत नोंदणी नसताना पूर्णपणे बेकायदेशीरपणे चालवली जात होती. तसेच, दुकानातून जप्त करण्यात आलेल्या साहित्यावर अन्नपदार्थांच्या लेबलिंगच्या नियमांचेही अत्यंत गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. हा सर्व जप्त केलेला साठा अतिशय निकृष्ट दर्जाचा आणि नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक असण्याची दाट शक्यता एफडीएने वर्तवली आहे. खुनाच्या घटनेनंतर कुटुंबाला दुसरा मोठा धक्का काही दिवसांपूर्वीच, म्हणजेच १८ जून २०२६ रोजी लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवाल याला दरीत ढकलून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली असून ते सध्या कारागृहात आहेत. या खुनाच्या घटनेची चर्चा आणि संताप ताजा असतानाच, आता सियाच्या वडिलांच्या बेकायदेशीर व्यवसायावर एफडीएने हा कायदेशीर हातोडा चालवल्याने व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही धडक कारवाई एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागाचे सहआयुक्त (अन्न) डी. डब्ल्यू. भोगवडे आणि सहायक आयुक्त निलेश खोसे यांच्या नेतृत्वात, अन्न सुरक्षा अधिकारी के. एल. सोनकांबळे आणि प्रतीक जाधव यांच्या पथकाने केली. संबंधित बातमी वाचा.. केतन अग्रवाल हत्या प्रकरण: दोषींना कठोर शिक्षा द्या, प्रकरणाचा निकाल लवकर लावा, केतनच्या आईची पंतप्रधान मोदींकडे न्यायासाठी आर्त हाक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्याय मिळावा, दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि प्रकरणाचा निकाल विलंब न लावता लावावा, अशी मागणी केतनची आई राखी अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे. मुलाच्या हत्येनंतर कुटुंबाला झालेल्या त्रासाची व्यथा त्यांनी पत्रातून मांडली आहे. सविस्तर वाचा..
Source link
सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर FDA ची कारवाई:8 लाखांचा संशयास्पद माल जप्त; सिया केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...
बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...
सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























