मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ई-केवायसी करण्याची दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत निर्धारित अंतिम मुदत वाढवून आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. अलीकडील नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच काही महिलांच्या पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे संबंधित आधार क्रमांकावर ओटीपी प्राप्त होणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत अपूर्ण ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देणे आवश्यक आहे. तसेच, ज्या पात्र महिलांच्या पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत अशांनी स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणे आवश्यक राहील. या अनुषंगाने पात्र महिलांना न्याय मिळावा आणि कोणतीही पात्र महिला तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे योजनेपासून वंचित राहू नये, ही शासनाची भूमिका आहे. याकरिता माननीय मुख्यमंत्री व दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या हिताचे भान राखत ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच विस्तारित कालावधीत लाभार्थींनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही मंत्री तटकरे यांनी केले आहे.
Source link
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला मुदतवाढ:ई-केवायसीची अंतिम तारीख आता 31 डिसेंबर, महिलांना दिलासा
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
28 नोव्हेंबरचे टॅरो राशिभविष्य: कुंभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या पदोन्नतीला मंजुरी मिळेल, कन्या राशीच्या लोकांसाठी...
11 तासांपूर्वीकॉपी लिंकशनिवार, 28 नोव्हेंबर रोजी कुंभ राशीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना रखडलेल्या बढती आणि थकीत भत्त्यांना मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मकर राशीच्या ज्या...
बुधवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना उच्च पद मिळण्याचे योग, तर कन्या राशीच्या लोकांना प्रमोशन...
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना उच्च पद किंवा मोठी प्रशासकीय जबाबदारी मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. सरकारी कंत्राटे आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित...
एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! – श्री. शॉन क्लार्क
‘कॉप-३१’ जागतिक हवामान परिषदेत भारतीय शिष्टमंडळातर्फे भारताचा आध्यात्मिक संशोधन दृष्टिकोन सादर ‘पर्यावरण जाणीव चळवळ’ : एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! - श्री. शॉन...
सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...
सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...
दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
























