Homeमहाराष्ट्रClose aides of three MLAs in the fray | तीन आमदारांचे निकटवर्तीय...

Close aides of three MLAs in the fray | तीन आमदारांचे निकटवर्तीय निवडणुकीच्या रिंगणात: महायुती सर्व ठिकाणी, मविआ नऊ ठिकाणी स्वतंत्र लढणार – Amravati News

अमरावती जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचे चित्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत तीन आमदारांचे निकटवर्तीय नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरले आहेत. महायुतीमधील सर्व घटक पक्ष स्वतंत्रपणे निव

.

दर्यापूरमध्ये अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी भारसाकळे, धामणगाव रेल्वे येथे भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी अर्चना रोठे आणि अंजनगाव सुर्जी येथे शिवसेना (उबाठा) आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी मंगळवारी (१८ नोव्हेंबर) करण्यात आली. यावेळी अनेक अर्ज रद्द करण्यात आले. राजकीय पक्षांनी अनेकांना उमेदवारीचे आश्वासन दिले होते, परंतु ऐनवेळी केवळ एकाच उमेदवाराला ‘एबी’ फॉर्म दिल्याने, पक्षाच्या नावाचा उल्लेख असूनही ‘एबी’ फॉर्म जोडला नसल्यामुळे अनेक अर्ज बाद झाले.

जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि २ नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदासाठी एकूण १२७ जणांनी दावेदारी केली होती. तर, सर्व नगरपालिकांमधून निवडल्या जाणाऱ्या २७८ नगरसेवक पदांसाठी १,८२१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.

सुरुवातीला महाविकास आघाडी आणि महायुती एकत्र लढण्याची चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात महायुतीमधील प्रत्येक पक्ष सर्व ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे.

महाविकास आघाडीमध्ये तीन ठिकाणी समन्वय साधला गेला आहे. मोर्शी, वरुड आणि शेंदुरजनाघाट या तीन ठिकाणी त्यांनी युती कायम ठेवली आहे. मोर्शीत काँग्रेसच्या उमेदवाराला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. शेंदुरजनाघाट येथे शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने समर्थन दिले आहे, तर वरुडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला काँग्रेस आणि शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.

उर्वरित नऊ ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. इतर ठिकाणांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला मदत करण्याचे ठरवले आहे. तसेच, १२ पैकी पाच ठिकाणी शिवसेनेने मैत्रीपूर्ण लढत कायम ठेवली आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!