Homeमहाराष्ट्रChhatrapati Sambhajinagar water arteries strengthened; Hydro test of new water pipeline successful,...

Chhatrapati Sambhajinagar water arteries strengthened; Hydro test of new water pipeline successful, 1220 mm main water pipeline withstands 16 kg high pressure | छत्रपती संभाजीनगरच्या पाण्याच्या धमन्या मजबूत: नवीन जलवाहिनीची हायड्रो टेस्ट यशस्वी, 1220 मिमीच्या मुख्य जलवाहिनीने 16 किलो उच्च दाब केला सहन – Chhatrapati Sambhajinagar News

शहरासाठी सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील सर्वात महत्त्वाच्या टप्प्याला बुधवारी (११ डिसेंबर) मोठे यश मिळाले आहे. नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रातून एक्स्प्रेस लाइनने शहरात पाणी आणणाऱ्या १२२० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची हायड्रो टेस्टिंग पूर

.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्र) चे मुख्य व्यवस्थापक महेंद्र गुगलोथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षत्रवाडी ते गोकुळ स्वीटपर्यंतच्या ५०० मीटर लांबीच्या महत्त्वाच्या भागाची हायड्रो टेस्ट १६ किलो उच्च दाबावर घेण्यात आली. नियमित पाणीपुरवठ्यात या लाइनवर केवळ ८ ते ९ किलो दाब येणार असताना, त्याच्या दुपटीपेक्षा जास्त दाब देऊन घेतलेली ही चाचणी निर्णायक ठरली आहे.

अल्ट्रा व्हायलेट टेस्ट यशस्वी झाल्यानंतर हाड्रो टेस्ट चाचणीपूर्वी अल्ट्रा व्हायलेट स्कॅनिंग करून पाइपची आंतरिक तपासणी करण्यात आली. कोणताही दोष न आढळल्याने हायड्रो चाचणी घेण्यात आली. शहराला भविष्यात दीर्घकाळ स्थिर, उच्च-दाबाचा पाणीपुरवठा देण्यासाठी ही टेस्ट अत्यंत महत्त्वाची होती. १६ किलो दाब सहन करून लाइन उत्तीर्ण झाली म्हणजे प्रत्यक्ष पुरवठ्यात तांत्रिक त्रुटींची शक्यता नगण्य आहे, असे गुगलोथ यांनी सांगितले.

ही चाचणी इतकी महत्त्वाची का

शहरात २०० एमएलडी वाढीव पाणी आणण्याच्या संपूर्ण योजनेचा कणा म्हणजे ही १२२० मिमी लाइन. • पुढील २–३ दशके या लाइनवर उच्च दाबाचा भार येणार आहे. • एकदा पाणीपुरवठा सुरू झाल्यावर गळती किंवा फुटीमुळे मोठे नुकसान व शहरात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. • टेस्ट यशस्वी झाल्याने पुढील कार्यवाही जोडण्या, फ्लशिंग, लाइन चार्जिंग निर्धास्तपणे करता येणार आहे.

हायड्रो टेस्टिंग म्हणजे काय?

• पाइपमध्ये पाणी भरून त्यावर नियमित दबावापेक्षा दीडपट अधिक दाब दिला जातो. • लाइनमध्ये गळती, सूक्ष्म क्रॅक किंवा जोडांमध्ये कमजोरपणा आहे का, हे तपासले जाते.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!