Homeमहाराष्ट्रअजित पवार किंवा भाजपामुळे छगन भुजबळ यांना मंत्रीपदाची पद मिळते

अजित पवार किंवा भाजपामुळे छगन भुजबळ यांना मंत्रीपदाची पद मिळते

मुंबई : महायुती सरकारच्या स्थापनेवेळी मंत्रिपद नाकारल्याने नाराज झालेल्या छगन भुजबळ यांनी थेट पक्षाध्यक्ष अजित पवारांवरच आरोप केले होते. नेतृत्वाला आव्हान देत वेगळी भूमिका मांडली होती. त्याच भुजबळांना अजितदादांनी झाले गेले विसरून लगेचच मंत्रिपद भाजपच्या दबावामुळे दिले का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वााखाली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळांना संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे भुजबळ संतप्त झाले होते. त्यांनी थेट अजित पवारांनाच लक्ष्य केले. ‘आपला मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही. त्याआधी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा अजित पवारांच्या पत्नीला संधी देण्यात आली. नंतरही मला डावलण्यात आले. मी काही यांच्या हातचे खेळणे नाही’, अशा शब्दांत भुजबळांनी आपल्या संतापाला वाट करून दिली होती.

नागपूर अधिवेशन अर्धवट सोडून ते परतले होते. पक्षाच्या शिर्डी येथील अधिवेशनाला थोडा वेळ उपस्थित राहिले, पण त्यांनी पक्षात एकाधिकारशाही वाढल्याचा मुद्दा मांडत पक्षाध्यक्ष अजित पवारांनाच पुन्हा लक्ष्य केले होते. गेले काही दिवस भुजबळ पक्षात फारसे सक्रिय नव्हते. दर मंगळवारी पक्षाच्या नेत्यांची बैठक अजित पवारांच्या निवासस्थानी होती. त्यालाही भुजबळ गेले दोन महिने फिरकत नसत. त्याच वेळी भुजबळांच्या फेऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वाढल्या होत्या. त्यामुळे भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली.

अजित पवार आणि भुजबळांमधील दुरावा कमी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनीच पुढाकार घेतल्याचे सांगण्यात येते. अजित पवारांनाच लक्ष्य करणाऱ्या भुजबळांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश झाला. भुजबळांना पुन्हा मंत्रिपद हे मुख्यमंत्री फडणवीस की अजित पवारांमुळे मिळाले, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मंत्रिपद महायुतीला फायदेशीर

– आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादीसाठी ओबीसी मते महत्त्वाची आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीकडे प्रभावी ओबीसी चेहरा नव्हता. केवळ मराठा समाजाचा पक्ष म्हणून प्रतिमा तयार होऊ नये, अशी खबरदारी अजित पवार घेत असतात. हे लक्षात घेऊनच भुजबळांचा समावेश झाला आहे.

ही क्विझ एआय-व्युत्पन्न आहे आणि केवळ एड्यूटेनमेंटच्या उद्देशाने आहे.

– मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या वातावरणात फडणवीस व अजित पवारांनी तेव्हा भुजबळांना मुक्त वाव दिला होता. ओबीसी मतांसाठी भुजबळांचे मंत्रिपद महायुतीलाही फायदेशीर ठरणारे आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा उफाळून आल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी भुजबळ हे भाजपला अधिक सोयीचे ठरणार आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सगळ्यांच्या ‘हो ला हो’ करतो:मी सगळ्यांना खूश करतो, माझे स्वतःचे असे व्यक्तिमत्व नाही, मला...

0
प्रश्न– मी २७ वर्षांचा आहे आणि गेल्या काही काळापासून एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात येत आहे. जेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत असतो, तेव्हा एका...

कॉमेडियन म्हणाला- डॉक्टर बनून महिलांचे अवयव बघेन:पोलिसवाला बनायचं नाही, बाबू गप्पीने पोस्ट केला आक्षेपार्ह...

0
प्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर बाबू गप्पी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यामध्ये ते महिलांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलत...

ई-रिक्षाला रस्त्यात थांबवणारे मोबाईल ॲप बॅन:चीनी कंपनीच्या ॲपचा गैरवापर होत होता, ब्लूटूथद्वारे कनेक्ट होत...

0
दिल्लीतील ई-रिक्षा चालकांना सध्या एका विचित्र समस्येचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर चालत असताना अचानक ई-रिक्षा बंद पडतात आणि पुन्हा सुरू होत नाहीत....

थायलंडमध्ये मुलाने 10 बौद्ध भिक्षूंना चिरडले, व्हिडिओ:परवानगीशिवाय पिकअप ट्रक चालवत होता; पोलिसांनी अजून गुन्हा...

0
थायलंडमधील मुकदाहन शहरात गुरुवारी एका मुलाने पिकअप ट्रकने बौद्ध भिक्षूंच्या मिरवणुकीला चिरडले. ज्यात किमान 10 भिक्षूंचा मृत्यू झाला आणि 5 गंभीर जखमी झाले...
spot_img

सगळ्यांच्या ‘हो ला हो’ करतो:मी सगळ्यांना खूश करतो, माझे स्वतःचे असे व्यक्तिमत्व नाही, मला...

0
प्रश्न– मी २७ वर्षांचा आहे आणि गेल्या काही काळापासून एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात येत आहे. जेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत असतो, तेव्हा एका...

कॉमेडियन म्हणाला- डॉक्टर बनून महिलांचे अवयव बघेन:पोलिसवाला बनायचं नाही, बाबू गप्पीने पोस्ट केला आक्षेपार्ह...

0
प्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर बाबू गप्पी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यामध्ये ते महिलांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलत...

ई-रिक्षाला रस्त्यात थांबवणारे मोबाईल ॲप बॅन:चीनी कंपनीच्या ॲपचा गैरवापर होत होता, ब्लूटूथद्वारे कनेक्ट होत...

0
दिल्लीतील ई-रिक्षा चालकांना सध्या एका विचित्र समस्येचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर चालत असताना अचानक ई-रिक्षा बंद पडतात आणि पुन्हा सुरू होत नाहीत....

सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ | सोने रु. 1.46 लाख, चांदी रु. 2.33 लाख

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआज 3 जुलै रोजी सोने-चांदीच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार,...
error: Content is protected !!