नगरपालिका निवडणुकीसाठीचे निरीक्षक प्रमोद गायकवाड यानी आज, मंगळवार, २५ नोव्हेंबरला येथे भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी निवडणूकविषयक कामकाजांची पाहणी केली. मतदान केंद्र, मतमोजणी स्थळ, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर तसेच सध्या सुरु असलेल्या निवडणूकविषय
.
आगामी २ डिसेंबर रोजी चांदूरबाजार नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने चांदूर बाजारचे निवडणूक निरीक्षक प्रमोद गायकवाड यांनी आज, मंगळवारी येथे भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आयोजित दुसऱ्या प्रशिक्षण शिबिरालाही उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी टाऊन हॉलला मतदान यत्रांची तपासणी केली. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन त्यांना योग्य त्या सूचनाही दिल्या.
यावेळी त्यांनी निवडणूक प्रक्रिया अचूक पार पाडण्याचे निर्देशही दिले. निवडणूक निरीक्षकांनी आचारसंहिता भंग, कायदा व सुव्यवस्था याबाबत ठाणेदार अशोक जाधव यांच्याकडूनही माहिती घेतली. त्यानंतर निवडणूक निरीक्षकांनी चांदुर बाजार नगर परिषद येथे भेट देऊन प्रचार कार्यालय परवानगी, वाहन परवानगी, बॅनर-पोस्टर परवानगी याबाबत संबंधित यंत्रणेकडून माहिती घेऊन चर्चा केली. तेथे उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आगामी होणारी निवडणूक भयमुक्त, निष्पक्ष व पारदर्शक पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सोनल सूर्यवंशी व सहायक निवडणूक अधिकारी गीता ठाकरेसुद्धा उपस्थित होत्या.






















