बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या अनुषंगाने उमेदवारी माघार घेण्याच्या मुदतीत म्हणजेच २ जानेवारी रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण ४५३ नामनिर्देशन पत्रे माघार घेण्यात आली आहे. तर, १ हजार ७२९ उमेदवार न
.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या कार्यक्रमानुसार, २३ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ पर्यंत एकूण ११ हजार ३९१ नामनिर्देशनपत्रांचे वितरण झाले.
नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याच्या अंतिम दिवसापर्यंत म्हणजेच ३० डिसेंबर २०२५ रोजी एकूण २ हजार ५१६ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले.
या २ हजार ५१६ नामनिर्देशनपत्रांची ३१ डिसेंबर २०२५ रोजी छाननी करण्यात आली. १६४ नामनिर्देशन पत्रे छाननीत अवैध ठरली. तर उर्वरित २ हजार १८५ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली.
नामनिर्देशन अर्थात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत होती. या कालावधीत ४५३ नामनिर्देशन पत्रे मागे घेण्यात आली. माघारीअंती स्पष्ट झालेल्या चित्रानुसार, १ हजार ७२९ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.
आता ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून उमेदवारांना निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येणार आहे. चिन्ह वाटप पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लढविणा-या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
निवडणूक निर्णय कार्यालय / माघार घेतलेल्या नामनिर्देशन पत्रांची संख्या / निवडणूक लढविणा-या उमेदवारांची संख्या याची माहिती पुढीलप्रमाणे –
1) A + B + B विभाग (D
2) C+D विभाग (RO 22) – 05/44
3) एफ दक्षिण विभाग (RO 21) – 21/50
4) जी दक्षिण विभाग (RO 20) – 14/51
5) जी उत्तर विभाग (RO 19) – 18/109
6) F उत्तर विभाग (RO 18) – 25/93
7) एल विभाग (RO 17) – 20/76
8) एल विभाग (RO 16) – 24/74
9) M पूर्व विभाग (RO 15) – 41/121
10) M पूर्व + M पश्चिम (RO 14) – 44/97
11) N विभाग (RO 13) – 34/88
12) एस डिपार्टमेंट (RO 12) – 15/70
13) टी विभाग (RO 11) – 24/79
14) H पूर्व विभाग (RO 10) – 25/87
15) के पूर्व + एच पश्चिम विभाग (RO 9) – 12/58
16) पश्चिम विभाग + पूर्व (RO 8) – 18/82
17) पश्चिम विभाग (RO 7) – 18/104
18) पी दक्षिण विभाग (RO 6) – 14/56
19) पी पूर्व विभाग (RO 5) – 21/81
20) पी उत्तर विभाग (RO 4) – 11/60
21) आर दक्षिण विभाग (RO 3) – 10/83
22) आर केंद्रीय विभाग (RO 2) – 07/35
23) आर उत्तर विभाग (RO 1) – 13/39
एकूण – ४५३/ १७२९






















