Homeमहाराष्ट्रBawankule: Congress Weak Due to Internal Rift, Workers Joining BJP | काँग्रेसमध्ये...

Bawankule: Congress Weak Due to Internal Rift, Workers Joining BJP | काँग्रेसमध्ये असमन्वय, कार्यकर्त्यांची नाराजी; त्यामुळेच रोज भाजपमध्ये प्रवेश वाढतो: उबाठाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही- चंद्रशेखर बावनकुळे – Nagpur News

काँग्रेसमध्ये कुणीही- कुणाला सहन करायला तयार नाही.त्यामुळे काँग्रेस पक्ष रोज कमजोर होत आहे, त्यांचे कार्यकर्ते रोज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. नेत्यांमध्ये समन्वय दिसून येत नाही. असमन्वय असल्याने नेत्यांना कार्यकर्त्यांना सांभाळायला कुणी तयार नाही. त्

.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उबाठाच्या मुखपत्रात काय लिहून येते ते गांभीर्याने घेण्याची काही गरज नाही. अस्वस्थ लोक तिथे लिहितात त्यामुळे त्यांची काही काळजी करण्याचे काम नाही.

कलोतींकडून मोठ्या अपेक्षा

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू जे बिनविरोध निवडून आले आहेत. ते सृजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यामधील चांगले नेतृत्व आहे. तिथल्या संपूर्ण जनतेने त्यांच्या निवडीला मान्यता दिली आहे.आता आल्हाद कलोती यांच्याकडून अपेक्षा आहे तिथे आम्ही पर्यटनाचा एक प्रकल्प करतो आहे त्यांनी तिथे मोठे डेव्हलपमेंट करावी अशी आम्हाला अपेक्षा आहे. म्हणून जनतेने त्यांना अविरोध निवडून दिले आहे.

महायुतीत मनभेद होऊ देणार नाही

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जनतेला भाजप आणि महायुतीवर विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे विकासाचा विषय घेऊन काम करत आहे. डबल इंजिन सरकारला जनतेची गरज आहे, जनता आमच्या मागे उभी आहे.मोदी-देवेंद्र फडणवीस हेच विकास करु शकतात ही जनतेची भावना आहे, म्हणून महायुतीचे उमेदवार विजयी होत आहे. 51 टक्के मते आम्हाला मिळणार आहे. काही ठिकाणी महायुती नाही तिथे आम्ही एकटे लढू पण महायुतीमध्ये मत अन् मनभेद होणार नाही यांची काळजी घेऊ.

रुग्णांसाठी काम करणाऱ्यांना जागा देणार

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कॅन्सर ग्रस्त रुग्णांसाठी काम करणाऱ्यांना महसूलच्या जागा देण्याचा आमचा विचार आहे. रुग्णांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मजबूती मिळाली तर त्या अधिक रुग्णांसाठी त्या काम करू शकतील. रुग्ण सेवा आरोग्य सेवा हे सरकारचे ब्रीद आहे म्हणूनच आम्ही जागा देण्याचा निर्णय केला आहे.

सर्व ठिकाणी प्रचाराला जाणार

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसने जर मनसेसोबत युती केली असती तर बिहारमधील मतदारांनी काँग्रेसला मतदान केले नसते, म्हणून मनसेच्या मुद्द्यावर काँग्रेसने मनसे नको अशी भूमिका घेतली, हे सर्व जाणीवपूर्वक घेतली. उद्धव ठाकरे-राज ठाकरे युतीच्या चर्चा सुरू असल्याने काँग्रेसला पर्याय नसल्याने ते सोयीचे वक्तव्य करत आहेत. आम्ही पक्षाच्या प्रचारासाठी अनेक ठिकाणी प्रवास करणार आहोत. आमचे सर्व पदाधिकारी आणि स्टार प्रचारक नगर पालिकेच्या प्रचाराला जाणार आहोत.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!