Homeमहाराष्ट्रBarshi Farmer Bitter Gourd Grape Trellis Farming Six Lakh Income PHOTOS, VIDEOS...

Barshi Farmer Bitter Gourd Grape Trellis Farming Six Lakh Income PHOTOS, VIDEOS | प्रगतिशील शेतकरी: द्राक्षाच्या मांडवावर कारल्याची बाग, दीड एकरात महिना सहा लाखांचे उत्पन्न, कळंबवाडीच्या शेतकऱ्याचा प्रयोग – Solapur News

शेती हा जुगार बनत चालल्याची भावना बळावत आहे. पण येणाऱ्या संकटातून मार्ग काढत शेतीला नफ्यात आणणारेही काही निवडक लोक असतात. त्यापैकी एक सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कळंबवाडीचे शेतकरी दीपक जाधव. ५ किमीवरून पाइपलाइनद्वारे शेतात पाणी आणून त्याचे

.

दीपक जाधव यांच्याकडे एकूण २५ एकर शेती आहे. एकच पीक घेण्याऐवजी ते पिकांसंदर्भात विविध प्रयोग करत असतात. सध्या त्यांनी २ एकरवर कारल्याची बाग लावली आहे. अतिवृष्टीमुळे यातील अर्धा एकर क्षेत्रावरील बागेचे नुकसान झाले, पण उर्वरित दीड एकरात योग्य पाण्याचे नियोजन करून भरघोस उत्पादन घेणे सुरू आहे.

द्राक्ष बागेचे नुकसान झाल्यामुळे लावले कारले

दीपक यांच्याकडे एकूण पंचवीस एकर शेती आहे. यात ४ एकरवर कांदा, १ एकरवर दोडका, दीड एकरवर कारले व इतर उर्वरित क्षेत्रावर गहू, ज्वारीचे पिक घेतले जाते. द्राक्ष बागेचे नुकसान झाल्यानंतर त्यांनी मांडव काढून टाकण्याऐवजी त्यावर आधी दोडके, भोपळा घेतला व त्यानंतर कारले लावले. हिवाळ्यात कारल्यावर किडीचा प्रार्दूभाव होऊन पिकाचे मोठे नुकसान होते. पण त्यांनी सुक्ष्म नियोजन करून स्वत:कडे असलेल्या गायींचे १० ट्रेलर शेणखत शेतात टाकले. ड्रीपद्वारे २४ तासांत ८ लिटर पाणी दिले. पाणी नेमक्या प्रमाणात मिळाल्याने चार एकर क्षेत्रावर जितके उत्पादन निघते तेवढेच उत्पादन अवघ्या दीड एकरात निघत आहे.

खर्च-उत्पन्नाचे गणित असे

जाधव यांनी सुरुवातीला २ एकर मांडवावर कारल्याची बाग लावली. पण अतिवृष्टीमुळे अर्धा एकर बागेचे नुकसान झाले. आधीचाच मांडव व ड्रीप असल्याने नव्याने ते टाकण्याची आवश्यकता भासली नाही. याचे तीन लाख वाचले. ६ हजारांना एक याप्रमाणे ६० हजारांचे १० ट्रेलर शेणखत त्यांनी टाकले. साडेसात हजारांचे मल्चिंग पेपर व किरकोळ खर्च असे एकूण ८० ते ८५ हजारांचा खर्च आला. लागवडीनंतर अडीच महिन्यांनी कारले तोडणीला येतात. सध्या दिवसाआड १५ किलोच्या ३० बॅगांत कारल्याचे ४५० ते ५०० किलो उत्पादन निघत असून याचे ३० हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. महिन्याला हे उत्पादन साडेचार ते पाच लाखांपर्यंत जाते. इतर कारल्याच्या तुलनेत किलोमागे १० रुपये अधिक म्हणजे ६० रुपयांचा दर मिळत असल्याचे जाधव यांनी “दिव्य मराठी’ला सांगितले.

(प्रगतिशील शेतकऱ्याकडून जाणून घ्या अधिक माहिती. संपर्कासाठी मोबाइल क्रमांक – ७७७५९०७९८५)



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

28 नोव्हेंबरचे टॅरो राशिभविष्य: कुंभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या पदोन्नतीला मंजुरी मिळेल, कन्या राशीच्या लोकांसाठी...

0
11 तासांपूर्वीकॉपी लिंकशनिवार, 28 नोव्हेंबर रोजी कुंभ राशीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना रखडलेल्या बढती आणि थकीत भत्त्यांना मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मकर राशीच्या ज्या...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना उच्च पद मिळण्याचे योग, तर कन्या राशीच्या लोकांना प्रमोशन...

0
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना उच्च पद किंवा मोठी प्रशासकीय जबाबदारी मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. सरकारी कंत्राटे आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित...

एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! – श्री. शॉन क्लार्क

0
‘कॉप-३१’ जागतिक हवामान परिषदेत भारतीय शिष्टमंडळातर्फे भारताचा आध्यात्मिक संशोधन दृष्टिकोन सादर ‘पर्यावरण जाणीव चळवळ’ : एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! - श्री. शॉन...

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!