Homeमहाराष्ट्रगुंगीचे औषध पाजून महिलेकडून अत्याचाराचा प्रयत्न: खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत...

गुंगीचे औषध पाजून महिलेकडून अत्याचाराचा प्रयत्न: खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी, विवाहित तरुणाचा आरोप

पुणे शहरातील कोथरूड भागात एका महिलेने गुंगीचे औषध पाजून एका विवाहित तरुणावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप समोर आला आहे. महिलेने तरुणाची खासगी छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत एका तरुणाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेली महिला ४२ वर्षांची असून, ती कोथरूड भागात राहते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला स्वतःला वकील असल्याचे सांगत होती आणि उच्च न्यायालयात कार्यरत असल्याचे भासवत होती. तक्रारदार तरुण विवाहित असून, तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचा रहिवासी आहे.

तक्रारदार तरुण कुटुंबीयांसोबत देवदर्शनासाठी गेला असताना त्याची आरोपी महिलेशी ओळख झाली होती. महिलेने ओळख वाढवून तरुणाला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिने गुंगीचे औषध पाजून तरुणावर अत्याचाराचा प्रयत्न केला, असा आरोप तरुणाने केला आहे. तसेच, महिलेने तरुणाची खासगी छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितली.

त्यानंतर सातत्याने महिला तक्रारदार यांच्याकडे पैशांची मागणी करत त्रास देत होती.अखेर महिलेच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणाने अखेर कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या महिलेविरुद्ध यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत का, तसेच तिने अशाच पद्धतीने आणखी काही जणांची फसवणूक केली आहे का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास कोथरूड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक करिश्मा शेख करत आहेत.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!