Homeमहाराष्ट्रराज्यात रस्ते अपघातांचा थरार: चालकाचा स्वतःच्याच गाडीखाली चिरडून दुर्दैवी अंत, घटनेने अमरावती...

राज्यात रस्ते अपघातांचा थरार: चालकाचा स्वतःच्याच गाडीखाली चिरडून दुर्दैवी अंत, घटनेने अमरावती हादरले – Amravati News

राज्यात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या भीषण अपघातांनी अमरावती आणि नाशिक जिल्हा हादरला आहे. अमरावतीच्या चिखलदरा घाटात गाडी वाचवण्याच्या नादात चालकाचा स्वतःच्याच गाडीखाली चिरडून मृत्यू झाला, तर इकडे सिन्नरजवळ समृद्धी महामार्गावर टायर फुटल्याने झाले.

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा घाटात एक मनाला चटका लावणारी घटना घडली. पर्यटकांनी भरलेली एक ट्रॅव्हलर बस घाटातून जात असताना, एका प्रवाशाला मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागल्याने गाडी एका उतारावर थांबवण्यात आली. सर्व प्रवासी खाली उतरले असतानाच, उतारावर उभी असलेली बस अचानक दरीच्या दिशेने सरकू लागली. हे पाहताच, बस दरीत कोसळू नये यासाठी चालकाने जिवाची बाजी लावत गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेगात असलेल्या बसखाली चालकच चिरडला गेला आणि त्याचा जागीच दुर्दैवी अंत झाला. त्याला मदत करण्यासाठी धावलेले इतर दोन प्रवासीही यात जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये प्रचंड घबराट पसरली.

लग्नासाठी आले, पण काळाने गाठले

दुसरी घटना सिन्नर तालुक्यातील पाटोळे शिवारात समृद्धी महामार्गावर घडली. कल्याणवरून सिन्नर तालुक्यातील फर्दापूर येथे लग्नासाठी आलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला. दोन खाजगी बस आणि एका ‘किया करेन्स’ कारमधून हे वऱ्हाड प्रवास करत होते. कारमध्ये 3 प्रौढ आणि 8 लहान मुले असे एकूण 11 जण होते. गाडी वेगात असताना अचानक टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार उलटून एका ट्रकला जाऊन धडकली.

या भीषण अपघातात एक पुरुष आणि एक महिला यांचा मृत्यू झाला असून, 9 जण जखमी आहेत. विशेष म्हणजे जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश अधिक असल्याने वातावरण शोकाकुल झाले आहे.

दुपारी 1 वाजता हा अपघात घडला, मात्र अपघातग्रस्त वाहनांच्या ताफ्यातील खाजगी बस तब्बल 4 वाजेपर्यंत घटनास्थळी किंवा रुग्णालयात पोहोचू शकल्या नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. जखमींवर सिन्नर आणि नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सिन्नर पोलिस करत आहेत.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!