Homeमहाराष्ट्रHidayat Patel Congress Leader Critically Injured Fatal Attack Akola | अकोल्यात काँग्रेसच्या...

Hidayat Patel Congress Leader Critically Injured Fatal Attack Akola | अकोल्यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला: धारदार शस्त्राने वार, पोटात आणि मानेवर खोलवर जखमा; प्रकृती चिंताजनक – Akola News

अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर आज अकोट तालुक्यातील माहोळ गावात अज्ञातांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पटेल गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक

.

मिळालेल्या माहितीनुसार, हिदायत पटेल हे आज माहोळ गावात असताना काही हल्लेखोरांनी त्यांना घेरले आणि धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर खोलवर जखमा झाल्या आहेत. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी पळापळ झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पटेल यांना तातडीने अकोट येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, अतिरक्तस्राव आणि जखमांचे गांभीर्य लक्षात घेता, प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने अकोला येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

अकोल्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त

हिदायत पटेल यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच अकोला आणि अकोटमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर गर्दी केली. कार्यकर्त्यांमधील संताप पाहता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी अकोला शहरासह माहोळ गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. हा हल्ला कोणी आणि का केला, याचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच गुन्हेगारांना अटक केली जाईल,” असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हल्ल्यामागे राजकीय वैमनस्याची किनार?

राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजत असतानाच हा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अकोट नगरपालिकेच्या काँग्रेस नगराध्यक्ष उमेदवार अलका बोडके यांनी हिदायत पटेल यांच्यावर पक्षाविरोधी भूमिका घेतल्याचा जाहीर आरोप केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर, हा हल्ला राजकीय वादातूनच झाला असावा, असा कयास पोलिसांनी वर्तवला आहे.

कोण आहेत हिदायत पटेल?

हिदायत पटेल हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते. त्यांनी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचा एक आक्रमक आणि महत्त्वाचा चेहरा म्हणून हिदायत पटेल यांची ओळख आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!