महाराष्ट्रातील लोकांच्या आरोग्याची काळजी आता एआयच्या माध्यमातून घेतली जाईल. धाराशिव जिल्ह्यात प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर एआयने आरोग्य तपासणी आता संपूर्ण महाराष्ट्रात केली जाईल. जिल्ह्यात एआयने केलेल्या तपासणीत १०१० महिलांमध्ये वेळेत गर्भाशया
.
गर्भाशयाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी अँड्रॉइड फोनमध्ये उपलब्ध PREP QR नावाचे ॲप वापरले जाते. जळजळ, थकवा, लघवीतून रक्त यांसारखी लक्षणे असलेल्या महिलांचे नमुने स्वॅबने घेतले जातात. स्वॅब काचेच्या पट्टीवर ठेवून ॲपच्या माध्यमातून स्कॅन केले जाते. रंगातील बदल आणि पीएच पातळीचे एआयद्वारे विश्लेषण करून संसर्गाची शक्यता सांगितली जाते.
हिमोग्लोबिनची तपासणी
यासाठी Hemo QR ॲप उपलब्ध करून दिले आहे. महिलेच्या बोटातून रक्ताचा थेंब काढला जातो. तो पट्टीवर ठेवून मोबाइलने स्कॅन केला जातो. रक्ताच्या रंग व घनतेच्या आधारावर एआय एचबी पातळी मोजतो. यातूनच महिला ॲनिमियाग्रस्त आहे-नाही कळते.
जळजळ, लघवीतून रक्त या लक्षणांची तपासणी
धाराशिव जिल्हा आरोग्य विभागाने हे तंत्रज्ञान राज्यात पहिल्यांदा लागू केले आहे. दोन्ही प्रकारच्या तपासणीत जवळपास ८०% अचूकता आहे. यामुळे विभागाला वेळेवर उपचार करण्यात मोठी मदत मिळाली आहे. आता हे मॉडेल राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्येही स्वीकारला जात आहे.’
– डॉ. एस. एल. हरिदास, जिल्हा आरोग्य अधिकारी, धाराशिव






















