- मराठी बातम्या
- राष्ट्रीय
- 6 कोटी मृतांचे आधार ‘जिवंत’, बनावट खाती आणि योजनेतील अनियमिततेचा धोका, UIDAI ने एक सर्वेक्षण सुरू केले आहे.
मुकेश कौसिका | नवी दिल्ली1 तासापूर्वी
- लिंक कॉपी करा
देशातील प्रत्येक नागरिकाला १२ अंकी आधार क्रमांक जारी करून १५ वर्षे झाली आहेत. या कालावधीत १४२ कोटींहून अधिक आधार कार्ड जारी करण्यात आले होते. परंतु ८ कोटींपेक्षा जास्त कार्ड धारकांचा मृत्यू होऊनही आतापर्यंत प्रत्यक्षात फक्त १.८३ कोटी कार्ड निष्क्रिय केल्याचे दिसून आले. यावरून सुमारे ६ कोटी मृतांचे आधार क्रमांक अजूनही सक्रिय आहेत हे स्पष्ट होते. यामुळे बँक फसवणूक, बनावट खाती आणि सरकारी योजनांच्या लाभांमधील अनियमितता होऊ शकते, अशी चिंता व्यक्त होत आहे.
आधार प्राधिकरणाला आतापर्यंत रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाकडून १.५५ मृत लोकांचा डेटा प्राप्त झाला आहे. नोव्हेंबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ दरम्यान यादीत ३८ लाख मृत व्यक्तींचा समावेश करण्यात आला. त्यापैकी १.१७ कोटी व्यक्तींची ओळख पटवण्यात आली आहे. त्यांचे आधार कार्ड निष्क्रिय करण्यात आले आहेत. डिसेंबरपर्यंत ही संख्या २ काेटीपर्यंत पोहोचेल असा प्राधिकरणाचा अंदाज आहे.
मृत्यू नोंदणी अजूनही खूपच सामान्य
भुवनेश कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी, यूआयडीएआय : २०१६ पासून सुमारे ८ कोटी आधार धारकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. परंतु नागरी नोंदणी प्रणालीतून केवळ २५ राज्यांतील डेटा उपलब्ध होतो. उर्वरित राज्यांमधून डेटा गोळा करण्याचे काम सुरू आहे.
आधार प्रमाणीकरण मोबाइल ओटीपीद्वारे केल्या जाणाऱ्या ठिकाणी गैरवापर होण्याची जोखीम असते. अशाप्रकारे सक्रिय आधारचा वापर खाती उघडण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. नागरी नोंदणी प्रणालीकडून मिळालेली माहिती आधार डेटाबेसशी जुळवली जाते. ९०% नाव आणि १००% लिंग जुळणे आवश्यक आहे. मृत्यूच्या सूचनेनंतर कार्ड बायोमेट्रिकसाठी वापरले गेले नाही याचीही तपासणी केली जाते. त्यानंतरच कार्ड निष्क्रिय केले जाते.
१०० पेक्षा जास्त वयाचे ७४ हजार आधार महाराष्ट्रात
- यूआयडीऐआय माहिती भांडारात ८.३० लाख आधार धारकांचे वय १०० वर्षांपेक्षा जास्त नाेंदवले.
- सर्वाधिक महाराष्ट्र राज्यात ७४,०००, उत्तर प्रदेशात ६७,०००, आंध्र प्रदेशात ६४,००० आणि तेलंगणामध्ये ६२,००० कार्ड धारकांचा समावेश आहे.
- आतापर्यंत केवळ ३,०८६ प्रकरणांचीच पुष्टी केली. यापैकी ६२९ जिवंत, ७८३ मृत व १,६७४ जणांची माहिती मिळाली नाही.
बँका व रेशन प्रणालीतूनही अनियमिततेचे संकेत
- एसबीआयच्या २२ कोटी आधार-जोडलेल्या खात्यांपैकी ८ लाख मृत व्यक्तींची खाती बंद
- पीएनबीच्या १४ कोटी खात्यांपैकी ४ लाख मृत्यूंची पडताळणी झाली.
- सार्वजनिक वितरण प्रणालीतील ८० कोटी रेशन कार्डांपैकी ४.५ लाख मृत व्यक्तींचे कार्ड सक्रिय.
- दोन कोटी पेन्शनधारकांपैकी २२ लाख लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली. विमा कंपन्यांकडे ५ लाख मृत व्यक्तींची माहिती आहे.
मृत्यू सूचना पोर्टल सुरू, आतापर्यंत केवळ ३ हजार नोंदी
यूआयडीएआयने ४ महिन्यांपूर्वी संकेतस्थळावर ‘मृत्यू सूचना पोर्टल’ सुरू केले, जेणेकरून कुटुंबीय मृत व्यक्तीचे आधार कार्ड ऑनलाइन निष्क्रिय करू शकतील. आतापर्यंत केवळ ३,००० लोकांनीच ही माहिती नोंदवली, पैकी फक्त ५०० प्रकरणांमध्येच पुष्टी आणि त्यांचे कार्ड निष्क्रिय केले.
सुमारे ४८ लाख नावांचे जुळणे अजून झालेले नाही. यापैकी ४–५% नोंदी प्रादेशिक भाषेत नोंदवलेल्या माहितीमुळे जुळू शकल्या नाहीत. या प्रक्रियेत ८० अशी प्रकरणे समोर आली, ज्यात मृत घोषित केलेले लोक नंतर जिवंत आढळले. आता या प्रकरणांची चौकशी सुरू आहे.





















