Homeमहाराष्ट्रA village in Amravati will be a 'Model Solar Village', deadline to...

A village in Amravati will be a ‘Model Solar Village’, deadline to submit proposals is June 16 | सौर ऊर्जा प्रकल्पासाठी स्पर्धा: अमरावतीत एक गाव होणार ‘मॉडेल सोलर व्हिलेज’, 16 जूनपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत – Amravati News

वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्णता आणण्यासाठी जिल्ह्यातील एक गाव ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ म्हणून तयार केले जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ५ हजारहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या ‘पी. एम. सूर्यघर मोफत वीज’ योजन

?

सदर योजनेसाठीचे प्रस्ताव महाऊर्जाच्या विभागीय कार्यालयात स्वीकारले जातील. दरम्यान प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय निवड समिती पात्र गावांची अंतिमत: घोषणा करणार आहे. या घोषणेनंतर सर्व गावांना आपापसात स्पर्धा करावी लागेल. त्यासाठी कमाल ६ महिन्यांचा अवधी दिला जाणार आहे. स्पर्धा काळात जास्तीत जास्त अपारंपरिक ऊर्जा साधने किंवा सौर उपकरणे आस्थापित (इन्स्टॉल) करणे गरजेचे आहे.

सौर उपकरणांमध्ये पी.एम.सुर्यघर योजनेंतर्गत जास्तीत जास्त घरांवर सोलर रुफ टॉप प्रकल्प उभारणी करणे तसेच पी.एम. कुसुम योजनेंतर्गत जास्तीत जास्त सौर पंप अथवा इतर विकेंद्रीत अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प आस्थापित करणे गरजेचे आहे. अशाप्रकारे गावात सर्व अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पांची क्षमता दहा मेगा वॅटपर्यंत असणे अपेक्षित आहे. याकरीता सी.एस.आर.निधी, विभाग किंवा जिल्हास्तरीय निधी व इतर उपलब्ध असलेल्या निधीचा वापर करण्याची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय अग्रणी बँकेमार्फत वैयक्तिक लाभार्थ्याला सौर प्रकल्प उभारणीकरीता बँकेच्या पात्रता निकषानुसार कर्ज उपलब्ध होऊ शकेल.

पारंपरिक वीजेचे उत्पादन दिवसेंदिवस मर्यादित होत चालल्याने कोळसा आणि पाण्यापासून तयार होणाऱ्या वीज वापराला मर्यादा आल्या आहेत. परिणामी अपारंपरिक वीजेचा वापर वाढावा, यासाठी शासनाकडून प्रयत्न चालविले जात आहे. सदर स्पर्धा हा त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे.

दरम्यान गावाची निवड करण्यासाठी गठित समितीमध्ये जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) प्रकल्प अधिकारी प्रिती देशमुख व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) बाळासाहेब बायस यांचा समावेश आहे. याशिवाय महाउर्जा चे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन:वारकरी, शेकऱ्यांना सुखी ठेव; देवेंद्र फडणवीसांचे विठुराया चरणी...

0
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीमध्ये सहभागी होणे अतिशय सुंदर अनुभूती आहे; महाराष्ट्राच्या या...

अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या एका तरुणाला गुगलने अटक केली:कानपूर पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला, अल्पवयीन बहिणींच्या...

0
कानपूर पोलिसांनी शुक्रवारी बाल लैंगिक शोषण प्रकरणी एका तरुणाला अटक केली. आरोपी तरुण आपल्या बहिणींसोबत आणि जवळपास राहणाऱ्या इतर मुलींसोबतच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ...

10 जुलैचे राशिभविष्य:मीन राशीच्या लोकांना भागीदारीच्या व्यवसायात चांगला नफा, वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा

0
शुक्रवार, 10 जुलै रोजी वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांची नवीन कामे सुरू करण्याची इच्छा पूर्ण होऊ...

विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी पोहोचली प्रियंका चोप्रा:पती निक जोनासला व्हिडिओ कॉलवर लाइव्ह टूर दाखवला, सामन्यादरम्यान...

0
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. ती महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पहिल्या रांगेत बसलेली दिसली, जिथे कोको...
spot_img

विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी पोहोचली प्रियंका चोप्रा:पती निक जोनासला व्हिडिओ कॉलवर लाइव्ह टूर दाखवला, सामन्यादरम्यान...

0
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. ती महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पहिल्या रांगेत बसलेली दिसली, जिथे कोको...

लग्नानंतर नोकरी सोडली:आता फक्त एक पत्नी अन् आई म्हणून जगतेय, सगळ्यांना आनंदी करण्याच्या प्रयत्नात...

0
प्रश्न– मी 34 वर्षांची महिला आहे. लग्नानंतर मी माझी नोकरी सोडली होती, कारण कुटुंबाची जबाबदारी वाढली होती. गेल्या काही वर्षांपासून माझी ओळख फक्त...

फाटलेल्या बुटांच्या व्हायरल व्हिडिओवर सनी देओलची फिरकी:कार्यक्रमात म्हणाले- कोणीही बुटाचा फोटो घेऊ नये, धर्मेंद्र...

0
बॉलिवूड अभिनेता सनी देओल गुरुवारी आपल्या 'इक्का' चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या कार्यक्रमात पोहोचले. यावेळी त्यांनी त्यांच्या अलीकडील 'बुटाच्या वादा' वर विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली. खरं...

बीएसएनएल सॅटेलाइट फोन भारतात लाँच

0
नवी दिल्ली9 तासांपूर्वीलिंक कॉपी करासरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने भारतात नवीन सॅटेलाइट फोन लॉन्च केला आहे. याची किंमत करांसहित 1,34,166 रुपये ठेवण्यात आली...
error: Content is protected !!