Homeमहाराष्ट्रKailas Gorantyal Criticize Mahayuti Government Over Ladki Bahin and Pik Vima Yojana...

Kailas Gorantyal Criticize Mahayuti Government Over Ladki Bahin and Pik Vima Yojana | ‘लाडकी बहीण’मुळे 2027 पर्यंत कोणतेही काम होणार नाही: काँग्रेस नेत्याचा दावा, पिक विमा योजनेवरूनही सरकारवर हल्लाबोल – Maharashtra News

महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडत असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच राज्यात झालेल्या पिक विमा घोटाळ्यावरून काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.

?

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना महिन्याला दीड हजार रुपयांचे मानधन दिले जाते. मात्र या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडत असल्याची चर्चा आहे. तसेच सरकार इतर योजनांचा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे वळवत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कैलास गोरंट्याल यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

नेमके काय म्हणाले कैलास गोरंट्याल?

पिक विमा योजनेबाबत कैलास गोरंट्याल म्हणाले की, पिक विमा बोगस आहे. पिक विमा योजनेमध्ये गैरप्रकार झाल्याचे मी अधिवेशनामध्ये सुद्धा बोललो होतो. ज्या माणसाला शेती नाही त्याला पैसे भेटतात आणि ज्याला खरी शेती आहे त्याला काहीच भेटत नाही. पिक विमा हे फार मोठे रॅकेट आहे. एक रुपयात पिक विमा ही तर फसवी योजना होती.

या योजना सरकारच्या अंगलट येतील

लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना कैलास गोरंट्याल यांनी मोठा दावा केला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे तर 2027 पर्यंत कोणतेही काम येणार नाही आणि होणारही नाही, असे गोरंट्याल म्हणालेत. मी पोलिस खात्यातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत बोललो, तर मला अशी शंका यायला लागली, आमचे पगार पण येतात की नाही. एसटी महामंडळाच्या लोकांचे अर्धे पगार भेटलेच नाही अशी अवस्था सध्या आहे, असेही गोरंट्याल म्हणाले. त्यामुळे या सर्व फसव्या योजना आहेत आणि यामुळे सर्व काही त्यांच्या अंगावर येणार आहे. त्यामुळे याला जबाबदार त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेच आहेत असा आरोप कैलास गोरंट्याल यांनी केला आहे.

सरकारला लॉलिपॉप दाखवून सत्तेवर आले

खोटे बोलून, लाडकी बहीण योजनेचे लॉलिपॉप दाखवून ते सत्तेवर आले, 2100 रुपये बोलले होते, परंतु पंधराशे रुपये सध्या नीट देत नाहीत. योजनेतील लाभार्थ्यांची काट छाट सुरू झालेली आहे. 2 कोटी 30 लाख महिलांनी याचा फायदा घेतला, त्यामुळे तेवढे मतदान यांना फुकट भेटले, असा टोला कैलास गोरंट्याल यांनी सरकारला लगावला आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राम मंदिर देणगी चोरी- टिन्नू यादवसह 8 आरोपींना अटक:आज न्यायालयात हजर करणार; अरविंद केजरीवाल...

0
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात, मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचे निकटवर्तीय रमाशंकर यादव उर्फ टिन्नू यांच्यासह 8 आरोपींना गुरुवारी रात्री उशिरा...

ज्येष्ठ महिन्याची अंतिम तिथी 29 जूनला:भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाचा अभिषेक करा, हनुमानजींसमोर दिवा लावून...

0
आज (26 जून) ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी तिथी आहे. या महिन्याची अंतिम तिथी म्हणजेच पौर्णिमा 29 जून रोजी आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला संत...

उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी श्रीलंकेला विजय आवश्यक:आज स्कॉटलंडविरुद्ध सामना; महिला टी-20 विश्वचषकात दोघांची पहिली लढत

0
महिला टी-20 विश्वचषकात आज श्रीलंकेचा सामना स्कॉटलंडशी होईल. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी श्रीलंकेला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. हा सामना मँचेस्टरमध्ये...

राम मंदिर देणगीवरून संजय राऊत आक्रमक:मंदिरासाठी दिलेली चांदीची वीट कुठे? पावतीही नाही, चौकशीची मागणी

0
अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या ४ किलो चांदीच्या विटेचा ठावठिकाणा अद्याप समोर न आल्याचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब...
spot_img

उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी श्रीलंकेला विजय आवश्यक:आज स्कॉटलंडविरुद्ध सामना; महिला टी-20 विश्वचषकात दोघांची पहिली लढत

0
महिला टी-20 विश्वचषकात आज श्रीलंकेचा सामना स्कॉटलंडशी होईल. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी श्रीलंकेला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. हा सामना मँचेस्टरमध्ये...

साई सुदर्शनने श्रीलंका-ए विरुद्ध शतक झळकावले:पहिल्या अनऑफिशियल कसोटीत इंडिया-ए चा स्कोअर 333/4, ध्रुव जुरेल-शेख...

0
श्रीलंका 'ए' संघाविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटीच्या पहिल्या दिवशी भारत 'ए' संघाने ४ गडी गमावून ३३३ धावा केल्या. भारतीय सलामीवीर साई सुदर्शनने आपल्या प्रथम-श्रेणी...

ग्रे-डिवोर्स; अमेरिकेत 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये 40% घटस्फोट:कारण- नात्यांपेक्षा अस्तित्वाला जास्त महत्त्व देत...

0
30 वर्षांपेक्षा जास्त काळ एकत्र राहिल्यानंतर ऍलन हिकेनबॉटम आणि त्यांच्या पत्नीने घटस्फोट घेतला. सुरुवातीला दोघांमध्ये पुस्तके आणि कलेबद्दल खूप ओढ होती. दोघांनी मिळून...

'वेलकम टू द जंगल' चे 56 हजार तिकीट विकले:आगाऊ बुकिंगमध्ये ₹1.34 कोटींची कमाई, नवीन...

0
‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातील नवीन गाणे ‘ओ मेरे बलम’ आज प्रदर्शित झाले आहे. ट्रेलरमध्ये ऐकू आलेल्या त्याच्या धुनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून...
error: Content is protected !!