लातूर शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या नळांना गेल्या काही दिवसांपासून पिवळ्या रंगाचे पाणी येत आहे. यावर तातडीने उपाययोजना करून शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी दिल्या. लातूर महानगरपालिकेच्या हरं
?
धरणातून पुरवठा होणाऱ्या पाण्याचा रंग पिवळा असून, जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया झाल्यानंतरही काही प्रमाणात पिवळेपणा कायम राहतो. परिणामी, नळाद्वारे पुरवठा होणारे पाणी पिवळे दिसते. नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याला महानगरपालिकेने प्राधान्य द्यावे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांचे तांत्रिक मार्गदर्शन घेऊन तातडीने आवश्यक उपाययोजना हाती घ्याव्यात. गरज भासल्यास जिल्हा वार्षिक योजना आणि राज्य शासनामार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री भोसले यांनी दिली.
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून तेथील कामकाजाची माहिती घेतली. स्वच्छ पाणी पुरवठ्याला प्राधान्य द्यावे आणि आगामी काळात पाणी पुरवठ्याचा कालावधी कमी करण्यासाठी नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.
बांबूपासून बनवलेल्या अभिनव कक्षात नागरिकांसाठी विविध सुविधा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या 100 दिवसीय कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात बांबूपासून आगळावेगळा अभ्यागत कक्ष तयार करण्यात आला आहे. या अभ्यागत कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाले. जिल्ह्यातील विविध भागातून आपल्या कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यागत कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. बांबूपासून बनविलेल्या विविध वस्तूंचा वापर या कक्षात करण्यात आला आहे. याठिकाणी नागरिकांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, बसण्यासाठी खुर्ची, टेबल ठेवण्यात आले आहेत. तसेच शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी एलसीडी स्क्रीन लावण्यात आली आहे.
































