Homeमहाराष्ट्रलेक अधिकारी झाली हो ss, लाडक्या मुलीच्या यशाचे पेढे वाटतानाच वडिलांचा मृत्यू,...

लेक अधिकारी झाली हो ss, लाडक्या मुलीच्या यशाचे पेढे वाटतानाच वडिलांचा मृत्यू, संपूर्ण घरावर दुःखाचे सावट


यवॅटमल बातम्या: लाडकी लेक युपीएससी उत्तीर्ण झाली मात्र मुलीच्या यशाचा आनंद साजरा करत असतानाच कुटुंबावर मात्र दुखाचा डोंगर कोसळला आहे. यवतमाळ च्या महागाव तालुक्यातील वागद (इजारा) येथे ही दुःखद घटना घडली आहे. मुलीच्या यशाचे कौतुक करत असतानाच वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांनी प्राण गमावले. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्रल्हाद खंदारे असं निधन झालेल्या वडिलांचे नाव आहे. युपीएससीमध्ये मुलीला चांगली रँक मिळाली म्हणून संपूर्ण कुटुंब आनंदोत्सव साजरा करत होते. त्याचवेळी वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे. मुलीच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी जमलेल्या नातेवाईकांनाही या घटनेने मोठा धक्का बसला आहे.

प्रल्हाद खंदारे हे पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी असून त्यांची मुलगी मोहिनी खंदारे हिला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत चांगली रँक मिळाली आहे. हा आनंदोत्सव साजरा करताना प्रल्दाह खंदारे हे ग्रामस्थांना पेढ्यांचे वाटप करत होते. ग्रामस्थांना पेढे वाटप करत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि काहीच वेळात ते खाली कोसळले. खंदारे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. त्यामुळं खंदारे परिवारावर आनंदाच्या क्षणी दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

यूपीएससीच्या निकालात महाराष्ट्राच्या मुलांची मुसंडी

युपीएससीच्या निकालात यंदाही महाराष्ट्राच्या मुलांनी जोरदार मुसंडी मारलीये. पहिल्या शंभरात पहिल्यांदाच 5 मुलं ही महाराष्ट्रातली असून एकूण यादीतला हा मराठी मुलांचा आकडा 80 च्यावर गेला आहे. यूपीएससीतला मराठी टक्का वाढावा म्हणून तेलंगानातले वरिष्ठ पोलीस अधिकारी महेशजी भागवत या मुलांना खास दिल्लीत जाऊन मार्गदर्शन करत असतात. पुण्यातही यूपीएससीचा निकाल लागताच मुलांनी ज्ञानप्रबोधनी शाळेसमोर जल्लोष साजरा केला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बनावट चलन सादर करून सातारा जिल्हा परिषदेची 28.50 लाखांची फसवणूक:सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात...

0
सातारा जिल्हा परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या विविध विकासकामांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा ठेव आणि अतिरिक्त सुरक्षा ठेव भरल्याचे बनावट चलन सादर करून...

उदयनिधींचा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पत्नीवरून टोमणा:विरोधी पक्षनेते म्हणाले- चेंगलपट्टू न्यायालयात पतीचा शोध घेतेय पत्नी

0
तमिळनाडूच्या राजकारणात वैयक्तिक टिप्पणींवरून नवा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यावर अप्रत्यक्षपणे वैयक्तिक टिप्पणी करत...

ऋषी दुर्वासा आणि देवराज इंद्र कथा: भेट मूल्य आणि भावना

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक पौराणिक कथा आहे. फार पूर्वीच्या काळी दुर्वासा ऋषी नेहमी ज्ञानाच्या शोधात आणि धर्माचा संदेश पसरवण्यासाठी प्रवास करत असत. दुर्वासा...

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...
spot_img

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...
error: Content is protected !!