Homeमहाराष्ट्रTake action against Vijay Vadettiwar for making anti-national statements | देशविरोधी वक्तव्य...

Take action against Vijay Vadettiwar for making anti-national statements | देशविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी विजय वडेट्टीवार यांच्यावर कारवाई करा: केंद्रीय मंत्र्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, भाजप आक्रमक – Mumbai News

पहलगाम हल्ल्यावर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करण्यास सुरू केली आहेच, त्यात आता केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी विजय वड

?

विजय वडेट्टीवार यांनी देशविरोधी आणि दहशतवाद्यांना समर्थन मिळेल असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी एक पत्र देखील पाठवले आहे. त्यामुळे आता विजय वडेट्टीवार यांच्यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार?

दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलतात का? त्यांच्या धर्माची चौकशी करत बसतात का?. काही पर्यटक म्हणत आहेत की हल्लेखोरांनी धर्म विचारला, तर काहींचे म्हणणे आहे की असे काही घडलेच नाही, असे विजय वडेट्टीावर यांनी म्हटले. त्यांच्या या विधानवरून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

मुळात ही काँग्रेसचीच मानसिकता

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांच्यावर भाजप नेते व माजी आमदार राम सातपुते यांनी देखील टीका केली आहे. राम सातपुते म्हणाले, मुळात ही काँग्रेसचीच मानसिकता आहे. जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी इस्लामिक आतंकवाद्यांनी हिंदूंच्या हत्या केल्या, त्यावेळेस अशा पद्धतीने संभ्रम करणारे वक्तव्य काँग्रेस नेते करतात, वडेट्टीवारांच्या तोंडून त्या ठिकाणी राहुल गांधी बोलले आहेत.

पुढे बोलताना राम सातपुते म्हणाले, अशा पद्धतीची मानसिकता ही हिंदू विरोधी मानसिकता आहे. त्या ठिकाणी अनेकांचे बळी गेले आहेत. मारताना हिंदूंना धर्म विचारून, नाव विचारून पॅन्ट काढून अतिरेक्यांनी मारले आहे, याचे उत्तर मोदी सरकार येणाऱ्या काळात देईल. मात्र, दहशतवाद्यांना खतपाणी घालायचे काम अशा प्रवृत्ती करतात, मी याचा जाहीर निषेध नोंदवतो. अशा पद्धतीने बोलणे म्हणजे त्या ठिकाणी ज्यांचा जीव गेला आहे, त्यांचा अपमान करणारे आहे.

अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा- चित्रा वाघ

कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे डोके ठिकाणावर आहे की नाही? पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात कुणी आपला पती, भाऊ तर कुणी आपला बाप गमावला आहे. संपूर्ण देशच नाही तर जगाला याचे दुःख वाटत आहे. ज्यांनी आपले आप्तेष्ट गमावले ते रडून आपबिती सांगत आहेत. हा दहशतवादी हल्ला हिंदूंचा नरसंहार होता हे स्पष्ट होत आहे. काँग्रेससह महाविकास आघाडीचे नेते हे सत्य नाकारत आहेत. काँग्रेसमधून रोज कुणी ना कुणी प्रसारमाध्यमांवर येऊन हल्ल्यातील मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना खोटं ठरविण्याची क्रुरचेष्टा करत आहेत. अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. दहशतवाद्यांना पाठीशी घालून तुम्हाला काय साध्य करायचे आहे हे जनतेला देखील चांगलंच समजले आहे. राहुल गांधींपासून ते आज वडेट्टीवारांपर्यंत सगळ्यांना त्या दहशतवाद्यांचा इतका का पुळका आलाय? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. हेही वाचा



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बनावट चलन सादर करून सातारा जिल्हा परिषदेची 28.50 लाखांची फसवणूक:सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात...

0
सातारा जिल्हा परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या विविध विकासकामांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा ठेव आणि अतिरिक्त सुरक्षा ठेव भरल्याचे बनावट चलन सादर करून...

उदयनिधींचा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पत्नीवरून टोमणा:विरोधी पक्षनेते म्हणाले- चेंगलपट्टू न्यायालयात पतीचा शोध घेतेय पत्नी

0
तमिळनाडूच्या राजकारणात वैयक्तिक टिप्पणींवरून नवा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यावर अप्रत्यक्षपणे वैयक्तिक टिप्पणी करत...

ऋषी दुर्वासा आणि देवराज इंद्र कथा: भेट मूल्य आणि भावना

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक पौराणिक कथा आहे. फार पूर्वीच्या काळी दुर्वासा ऋषी नेहमी ज्ञानाच्या शोधात आणि धर्माचा संदेश पसरवण्यासाठी प्रवास करत असत. दुर्वासा...

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...
spot_img

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...
error: Content is protected !!