Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात एप्रिलमध्येच जनतेच्या घशाला कोरड, कोणत्या जिल्ह्यात किती पाणीसाठा? ऐकून बसेल धक्का!

महाराष्ट्रात एप्रिलमध्येच जनतेच्या घशाला कोरड, कोणत्या जिल्ह्यात किती पाणीसाठा? ऐकून बसेल धक्का!

महाराष्ट्र जल संकट: यंदा एप्रिल महिन्यातच महाराष्ट्रात पाणीसंकट निर्माण झालंय. राज्यातील धरणांमधील पाणीसाठा 38 टक्क्यांवर आलाय. अजून उन्हाला संपायला अनेक दिवस बाकी आहेत. त्याआधीच पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने सर्वांचीच चिंता वाढलीये.

पाणीसंकट दिवसेंदिवस आणखीनच गडद

महाराष्ट्रावरील पाणीसंकट दिवसेंदिवस आणखीनच गडद होत चाललंय. जागतिक तापमानवाढीमुळे सर्वोत मोठा फटका पाणीसाठ्याला बसतोय. उन्हामुळे बाष्पीभवन आणि वाढत्या मागणीमुळे पाणीसाठी दिवसेंदिवस कमी होत चाललाय.  गेल्यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस होऊनही यंदा मात्र एप्रिल महिन्यातच जनतेच्या घशाला कोरड पडलीये. राज्यात एकूण 2 हजार 997 धरणं आहेत. त्यांची एकत्रित साठवण क्षमता 40 हजार 498 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. या घडीला या धरणांमध्ये केवळ  38 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. गेल्या 15 दिवसांत जलसाठ्यात 5 टक्क्यांनी घट झालीये.  विदर्भ आणि मराठवाड्यात तर अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण झालीये.

कोणत्या जिल्ह्यात किती पाणीसाठा?

कोकणामध्ये 44.37 %, पुण्यामध्ये 30%, नाशिकमध्ये 40%, मराठवाड्यामध्ये 35.82%, अमरावतीमध्ये 46%, नागपूरमध्ये 37.55% पाणीसाठी शिल्लक आहे. पुणे विभागात सर्वात कमी म्हणजेच केवळ 30 टक्के पाणीसाठा आहे. सध्या राज्यातील 17 जिल्ह्यांमधील 447 गावं आणि 1327 पाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या टँकरच्या मागणीतही वाढ होतेय. अनेक भागांमध्ये घोटभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागतेय. तहान भागवण्यासोबतच शेती जगवण्याचंही मोठं आव्हान शेतक-यांसमोर उभं ठाकलंय.

धरणांमधील पाणीसाठ्याचं योग्य नियोजन नाही

धरणांमधील पाणीसाठ्याचं योग्य नियोजन न झाल्याने एप्रिल महिन्यातच जलसाठा आटल्याचा आरोप होतोय. मात्र पाण्याचं नियोजन करण्यात आल्याचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

पाणी जपून वापरण्याचं आवाहन

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल महिन्यातील पाणीसाठ्याची परिस्थिती चांगली आहे. मात्र वाढत्या तापमानामुळे पाणीसाठयात होणारी घट ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...

ब्रिटनच्या ‘पहिल्या गे वडिलांवर’ बाल लैंगिक गुन्ह्यांचे आरोप:’पती’सह 18 नवीन प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल

0
ब्रिटनमध्ये 'पहिले गे वडील' म्हणून प्रसिद्ध असलेले व्यावसायिक बॅरी ड्रुइट-बार्लो आणि त्यांचे 'पती' स्कॉट ड्रुइट-बार्लो यांच्यावर बाल लैंगिक गुन्हे आणि बलात्कार यासह 18...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...
spot_img

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...

Mbappe पहिला खेळाडू 6 वेळा 2+ गोल; फ्रान्स, नॉर्वे अंतिम ३२ मध्ये पोहोचले

0
16 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराफ्रान्सचा स्टार फॉरवर्ड किलियन एमबाप्पे वर्ल्ड कपच्या इतिहासात एका सामन्यात दोन किंवा अधिक गोल सर्वाधिक वेळा करणारा खेळाडू बनला आहे....
error: Content is protected !!