Homeमनोरंजनमहाशिवरात्री उपवास टिपा सुरक्षितपणे उपवास कसा सोडावा हेल्दी आहार मार्गदर्शन आरोग्य टिप्स

महाशिवरात्री उपवास टिपा सुरक्षितपणे उपवास कसा सोडावा हेल्दी आहार मार्गदर्शन आरोग्य टिप्स


महाशिवरात्री व्रत: महाशिवरात्री जवळ आली की अनेक भक्त उपवास करतात. आपल्या संस्कृतीत उपवासाला आध्यात्मिक शुद्धीचे स्थान दिले गेले आहे. देवपूजा, जप आणि संयम यांसोबत शरीरालाही विश्रांती देण्याचा हा एक मार्ग मानला जातो. अनेक लोक केवळ धार्मिक कारणांसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही उपवास पाळतात. योग्य पद्धतीने उपवास केल्यास शरीर स्वस्थ होते, पचन सुधारते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. पण दिवसभर काही न खाल्ल्यानंतर उपवास सोडताना जर चुकीची पद्धत अवलंबली, तर उलट त्रास वाढू शकतो. म्हणून उपवास जितका महत्त्वाचा, तितकेच त्याचे पारण कसे करावे हे जाणून घेणेही आवश्यक आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

उपवासानंतर लगेच तिखट-तेलकट खाणे टाळा
दिवसभर पोट रिकामे असल्यामुळे पचनसंस्था संवेदनशील बनते. अशावेळी लगेच तळलेले, मसालेदार किंवा जास्त तेलकट पदार्थ खाल्ले तर ऍसिडिटी, अपचन आणि पोटदुखीची समस्या होऊ शकते. त्यामुळे उपवास संपल्यावर हलक्या आहाराने सुरुवात करणे योग्य ठरते.

आंबट फळे खाण्याची घाई करू नका
रिकाम्या पोटी आंबट फळे खाल्ल्यास पोटातील आम्ल वाढते. त्यामुळे जळजळ, गॅस आणि पचन बिघडण्याची शक्यता असते. म्हणून पारण करताना सुरुवातीलाच संत्री, मोसंबी किंवा इतर आंबट पदार्थ खाणे टाळावे.

ज्यांना डायबेटिज आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय उपवास करू नये. दीर्घकाळ अन्न न घेतल्यावर अचानक जास्त खाल्ल्यास ब्लड शुगर लेव्हल अस्थिर होऊ शकते. यामुळे चक्कर, अशक्तपणा किंवा इतर त्रास संभवतात.

अनेकांना उपवासानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. मात्र रिकाम्या पोटी कॅफिन घेतल्यास ऍसिडिटी वाढू शकते आणि मेटाबॉलिज्मवर परिणाम होतो. त्यामुळे पारण करताना प्रथम सौम्य पेय घेणे अधिक सुरक्षित ठरते.

उपवास सोडताना सर्वात आधी करा ‘हे’ काम
दिवसभर उपवासामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते. त्यामुळे सर्वप्रथम 1 मोठा ग्लास पाणी प्यावे. त्यानंतर दही, ताजे फळांचा ज्यूस, नारळ पाणी किंवा लिंबू सरबत घेतल्यास शरीराला ऊर्जा मिळते.

उपवासानंतर शरीराला ताकद देणारा आहार आवश्यक असतो. त्यामुळे कडधान्य, उकडलेल्या भाज्या, हलकी खिचडी किंवा साधे घरगुती अन्न खाणे फायदेशीर ठरते. थोड्या प्रमाणात खाण्यापासून सुरुवात करून नंतर नियमित आहार घ्यावा.

हे ही वाचा: Bel Patra Ayurvedic Use: पुजेत अर्पण होणारे बेलपत्र ‘या’ आजारांवर रामबाण उपाय

योग्य पद्धतीने पारण केल्यास उपवासाचे खरे फायदे मिळतात. पचन व्यवस्थित राहते, थकवा कमी होतो आणि शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे महाशिवरात्रीसह कोणताही उपवास करताना केवळ श्रद्धाच नव्हे तर योग्य आहारशिस्त पाळणेही तितकेच आवश्यक आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

7 वर्षांच्या चिमुकलीवर सुरक्षारक्षकाचा लैंगिक अत्याचार:मुंबईतील संतापजनक घटना, संतप्त नागरिकांचा पोलिस ठाण्याला घेराव

0
मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ७ वर्षीय निष्पाप चिमुकलीवर इमारतीच्याच सुरक्षारक्षकाने बाथरूममध्ये घुसून...

बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले:लुधियानामध्ये बहिणीला रडतानाचा व्हिडिओ पाठवला, म्हणाली- मला घेऊन जा; इंस्टाग्रामवरून...

0
लुधियानामध्ये बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले आहे. त्याने गर्लफ्रेंडला आपल्या ताब्यात ठेवले आहे. अल्पवयीन मुलगी वारंवार आपल्या बहिणीला व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ आणि ऑडिओ मेसेज...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांचा ताण कमी होईल, तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल

0
रविवार, 12 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांच्या घरी पाहुणे आल्याने लगबग राहील. वृषभ राशीच्या लोकांना जुन्या मतभेदातून दिलासा मिळू शकतो. मिथुन राशीचे लोक...

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...
spot_img

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...
error: Content is protected !!