अक्षर पटेल: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 वर्ल्डकप सामन्यात टीम इंडियाचे एकहाती वर्चस्व पाहायला मिळाले. सुरुवातीपासूनच पाकिस्तानची टीम गडगडायला लागली होती. अशावेळी प्रमुख फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझमकडून टीमला मोठ्या धावांची अपेक्षा होती. पण त्याने फक्त 7 चेंडू खेळून 5 धावा केल्या. अक्षर पटेलने आपल्या बॉलिंगने बाबरची शाळा घेत त्याला पव्हेलियनमध्ये पाठवले. काय घडलं नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
भारताने प्रथम फलंदाजी करून पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले होते. यात ईशान किशन आणि शिवम दुबे यांनी चांगली कामगिरी केली. पाकिस्तानच्या फलंदाजीला सुरुवात करताना बाबरची विकेट लवकर पडणे हा टीमसाठी मोठा धक्का ठरला. सामन्यात भारतीय खेळाडूं स्ट्रॅटर्जीने खेळले तर पाकिस्तानी खेळाडू सुरुवातीपासूनच दबावात दिसले.
अक्षर पटेलची जादुई बॉलिंग
भारतीय फिरकीपटू अक्षर पटेलने बाबर आजमला एका सोप्या पण प्रभावी बॉलवर बाद केले. कर्णधार सूर्यकुमार यादवने पॉवरप्लेमध्येच फिरकीचा वापर केला. अक्षरने एक उंच आणि फिरकी बॉल टाकला. ज्याला बाबरने स्लॉग स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. पण बॉल आतल्या बाजूने फिरला आणि थेट स्टंप्सवर आदळला. बाबर पूर्णपणे गोंधळलेला दिसला. एखाद्या लहान मुलांना टाकावा तसा हा बॉल अगदी साधा वाटला. पण त्याचा परिणाम जबरदस्त झाला. स्टेडियममध्ये भारतीय चाहत्यांनी जल्लोष केला तर पाकिस्तानी खेळाडू आणि चाहते स्तब्ध झाले.
बाबर आझमची विकेट घेतल्यावर अक्षर पटेलची संतप्त प्रतिक्रिया #T20WorldCup2026 #INDvsPAK pic.twitter.com/
– सोमेश जांगरा (सेलिब्रिटी गॅलॅक्स) १५ फेब्रुवारी २०२६
पाकिस्तानी चाहत्यांमध्ये शांतता
बाबरची विकेट लवकर पडल्याने पाकिस्तानी संघात एक प्रकारचा सन्नाटा पसरला. त्याच्या धावांच्या आधारावर संघाची फलंदाजी मजबूत होईल अशी आशा होती, पण त्याच्या अपयशाने इतर फलंदाजांवर अतिरिक्त जबाबदारी आली. पाकिस्तानला भारताविरुद्ध नेहमीच बाबरकडून मोठ्या खेळीची गरज असते, पण यावेळी ते शक्य झाले नाही. सामन्यात सईम अयूबसारख्या इतर खेळाडूंच्या विकेट्सही लवकर पडल्या. जसप्रीत बुमराहने सईमला बाद केले. यामुळे पाकिस्तानची सुरुवातच कमकुवत झाली आणि सामन्यातील दबाव वाढला.
राजा बाबरच्या जागी अक्षर पटेल यांनी डाबरला स्थान दिले
भारताचे अभिनंदन #INDvsPAK #इशानकिशन #जसप्रीतबुमराह pic.twitter.com/Xo4PHckJp2– अमजद मन्सुरी (अमजदमंसुरी) १५ फेब्रुवारी २०२६
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सुरुवातीपासूनच आक्रमक स्ट्रॅटर्जी अवलंबली. पॉवरप्लेमध्ये फिरकी बॉलर्सचा वापर करणे हे धाडसी पाऊल होते. अक्षर पटेलने या निर्णयाला न्याय दिला आणि बाबरला बाद करून सामन्याचे चित्र बदलले. भारतीय टीमने मैदानाच्या परिस्थितीचा फायदा घेतला, ज्यात बॉल फिरण्याची शक्यता होती. इतर खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्याची विकेटही चर्चेची ठरली, पण एकूणच भारताची फलंदाजी आणि बॉलिंग संतुलित दिसली. या रणनीतीमुळे पाकिस्तानला रोखणे शक्य झाले.
बाबर आजमचा सध्याचा फॉर्म
बाबर आजमचा टी-20 फॉर्म सध्या चिंताजनक आहे. विश्वकपपूर्वी ऑस्ट्रेलिया मालिकेत त्याने चांगला खेळ केला नव्हता. अमेरिकेविरुद्ध 46 धावा वगळता इतर सामन्यांत तो अपयशी ठरला, विशेषतः भारताविरुद्ध. या सामन्यातही त्याची विकेट ही पाकिस्तानसाठी मोठी हानी ठरली. सामन्यात भारताने 176 धावा केल्या पण पाकिस्तानवर 61 धावांनी विजय मिळवला.






























