T20 विश्वचषक 2026 गुण सारणी : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारत विरुद्ध नामिबिया (IND VS NAM) यांच्यात गुरुवार 12 फेब्रुवारी रोजी सामना खेळवण्यात आला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करून नामिबियाला 210 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान पूर्ण करण्यात नामिबियाला अपयश आलं आणि टीम इंडियाचा 93 धावांनी विजय झाला. यासह टीम इंडियाने यंदाच्या वर्ल्ड कपमधील सलग दुसरा सामना जिंकला आणि ग्रुप पॉईंट्स टेबलमध्ये नंबर 1 चं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे ग्रुप ए च्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानी पोहोचली आहे.
कसा आहे ग्रुप ए चा पॉईंट्स टेबल?
भारत विरुद्ध नामिबिया सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या संघाने ग्रुप स्टेजमधील दोन्ही सामने जिंकले होते आणि तो संघ अव्वल स्थानी होता. तर टीम इंडिया यूएसए विरुद्ध एक सामना खेळून त्यात विजय मिळवल्याने नंबर २ वर होती. मात्र नामिबियावर टीम इंडियाने 93 धावांनी मोठा विजय मिळवला आणि नेट रन रेटने टीम इंडियाने ग्रुप ए च्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवलं. ग्रुप ए पाहिला तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 सामने खेळले असून यातील दोन्ही सामन्यात विजय मिळवलाय. तर पाकिस्तानचा नेट रन रेट हा +0.932 असा असल्याने ते दुसऱ्या स्थानी आहेत. तर भारताचा नेट रन रेट हा +3050 असा आहे. पॉईंट्स टेबलमध्ये आतापर्यंत 2 पैकी 1 सामना जिंकेलला नेदरलँड संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर यूएसए आणि नामिबिया या संघांनी दोनपैकी दोन सामने गमावले आहेत त्यामुळे ते चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.
नामिबियाला दिलेलं 210 धावांचं आव्हान :
नामिबियाने टॉस जिंकल्याने टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात यावं लागले. टीम इंडियाचे फलंदाज ईशान किशनने सर्वाधिक 61, संजू सॅमसनने 22, तिलक वर्माने 25, सूर्यकुमार यादवने 12, हार्दिक पंड्याने 52 तर शिवम दुबेने 23 धावा केल्या. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करून नामिबियाला 210 धावांचं आव्हान दिलं होतं. दरम्यान टीम इंडियाने ९ विकेट्स गमावल्या.
नामिबियाचा संघ विजयाचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरला खरा मात्र भारतीय गोलंदाजांनी त्यांना घाम फोडला. टीम इंडियाने नामिबियाला 116 धावांवर ऑलआउट केलं. यात भारतासाठी सर्वाधिक 3 विकेट्स वरुण चक्रवर्तीने घेतल्या. हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 तर अर्शदीप सिंह, शिवम दुबे, जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या. टीम इंडियाचा 93 धावांनी विजय झाला.
हेही वाचा : IND VS NAM : 1 रन साठी टीम इंडियाने गमावल्या 4 विकेट, त्याही नामिबियाविरुद्ध… शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये…
भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने:
टीम इंडियाचा पुढील ग्रुप स्टेज सामना हा 15 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. श्रीलंकेच्या कोलंबो येथे हा सामना खेळवला जाणार असून या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असेल. तर 18 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध नेदरलँड यांच्यात सामना होणार आहे.






























