Homeमनोरंजनअंडर 19 आशिया चषक 2025 फायनल भारत विरुद्ध पाक टीम भारताने मोशीन...

अंडर 19 आशिया चषक 2025 फायनल भारत विरुद्ध पाक टीम भारताने मोशीन नकवीकडून पुरस्कार घेण्यास नकार दिला


U19 आशिया कप 2025 फायनल: रविवार 21 डिसेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यात अंडर 19 आशिया कप 2025 या (U19 Asia Cup 2025) स्पर्धेचा फायनल सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 191 धावांनी दारुण पराभव केला. सामन्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशन सेरेमनीने पुन्हा एकदा क्रिकेट जगतात वाद निर्माण झाला आहे. आशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नकवीने (Moshin Naqvi) विजेत्या संघाला ट्रॉफी आणि मेडल दिले. मात्र या सेरेमनी दरम्यान भारतीय क्रिकेट संघातील कोणताही सदस्य तिथे उपस्थित नव्हता. ही स्थिती असामान्य आहे कारण साधारणपणे उपविजेत्या संघाचे खेळाडू सुद्धा या सेरेमनीचा भाग असतात. भारतीय संघाचा कोणताही सदस्य किंवा प्रतिनिधी येथे उपस्थित नसल्याने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मीरवाइस अशरफ उपविजेत्या संघाला दिला जाणारा चेक स्वीकारला.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

मोहसिन नकवीची दुहेरी भूमिका :

मोहसिन नकवीकडून भारतीय क्रिकेट संघाने पुरस्कार न स्वीकारण्याची घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. यापूर्वी सिनियर आशिया कप 2025 दरम्यान भारताने पाकिस्तानला फायनलमध्ये पराभूत केले. त्यानंतर विजेतेपदाची ट्रॉफी आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री असलेल्या मोहसिन नकवीकडून स्वीकारणार नाही असा निर्णय टीम इंडियाने घेतला होता. एवढंच नाही तर या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तान संघाच्या खेळाडूंशी हॅन्डशेक सुद्धा केला नाही. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाने हा निर्णय घेतला होता. यावेळी मोहसिन नकवीने आडमुठेपणा करून भारतीय संघाला त्यांनी जिंकलेली विजेतेपदाची ट्रॉफी दिली नाही. अद्याप सुद्धा ही ट्रॉफी मोहसिन नकवीने टीम इंडियाला किंवा बीसीसीआयला सुपूर्द केलेली नाही. आयसीसी बैठकांमध्ये या मुद्द्यावर चर्चा झाली मात्र दोन्ही पक्षांमध्ये याबाबत ठोस सहमती झालेली नाही.

हेही वाचा : ‘या’ घटनेनंतर रोहित शर्मा घेणार होता निवृत्ती, हिटमॅनने स्वतः केला खळबळजनक खुलासा

रविवारी भारत – पाक फायनलमध्ये काय घडलं?

भारत विरुद्ध पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यात अंडर 19 आशिया कप 2025 चा फायनल सामना दुबईत खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तानने तब्बल 191 धावांनी भारताचा पराभव केला आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशविरुद्धच्या सेमी फायनल सामन्यात आठ विकेट्सनी शानदार विजय मिळवून अंतिम फेरीत पोहोचलेल्या पाकिस्तानने भारतीय गोलंदाजांना वर्चस्व गाजवू दिले नाही. समीर मिन्हास वगळता पाकिस्तानकडून उस्मान खानने 35, अहमद हुसेन 56, फरहान युसूफ 19, हमजा जहूरने 18 धावा केल्या. तर भारतीय गोलंदाज दीपेश देवेंद्रनने 3 विकेट्स, खिलम पटेल आणि हेनिल पटेलने प्रत्येकी 2 विकेट, कनिष्क चौहानने 1 विकेट घेतल्या. तर भारताकडून फलंदाजीत दीपेश देवेंद्रन (36) वगळता इतर कोणताही फलंदाज समाधानकारक कामगिरी करू शकला नाही.

पाकिस्तानचा गोलंदाज अली राझाने 4 विकेट, मोहम्मद सय्यम, अब्दुल सुभान, हुजैफा अहसानने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. पाकिस्तानने फायनलमध्ये 347 धावांचा मोठा स्कोअर उभा केला, टीम इंडियाला विजयासाठी 348 धावांचं आव्हान मिळालं होतं. हे आव्हान पूर्ण करण्यात  वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेच्या ओपनिंग जोडीने भारताला वेगवान सुरुवात करून दिली. मात्र दोघे बाद झाल्यावर टीम इंडियाची मिडल ऑर्डर कोलमडली आणि संपूर्ण संघ 26.2 ओव्हरमध्ये 156 धावांवर ऑलआउट झाला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सावरकर मानहानी प्रकरण; पणतू म्हणाले- नेहरू ब्रिटिश समर्थक होते:सावरकरांनी इंग्रजांशी समझोता केला असता तर...

0
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी यांनी मंगळवारी पुणे येथील विशेष न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात जबाब दिला....

पैठणमध्ये स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन:साखर कारखान्याच्या 19 कोटी 50 लाखांच्या एफआरपीसाठी टाकीवर चढून आंदोलन

0
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने 2025-26 च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 19 कोटी 50 लाख रुपयांची एफआरपी (FRP) थकविल्याच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये...

17 ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत:वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल, प्रवासात लाभ होईल, कन्या राशीसाठी...

0
सूर्य मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत आला आहे. सूर्याच्या राशी बदलाला संक्रांती म्हणतात. काही हिंदी पंचांगानुसार कर्क संक्रांतीची तारीख 16 जुलै तर...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...
spot_img

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...
error: Content is protected !!