HomeमनोरंजनJasprit Bumrah gets angry, snatches phone away from fan Video Viral |...

Jasprit Bumrah gets angry, snatches phone away from fan Video Viral | आधी दिली वॉर्निग अन् मग… जसप्रीत बुमराहचा संयम सुटला! चाहत्यांसोबतच्या वादावादीचा Video Viral


जसप्रीत बुमराह व्हायरल व्हिडिओ: भारतीय संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या मैदानावरील कामगिरीपेक्षा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. यामध्ये बुमराहचा भडकलेला अवतार बघायला मिळाला. चला नेमकं काय झालाय ते जाणून घेऊयात. धर्मशाला टी20 सामन्यानंतर विश्रांती घेतल्यानंतर तो लखनऊ टी20 सामन्यासाठी संघात परतला होता. मात्र चौथा टी20 सामना दाट धुक्यामुळे रद्द झाल्याने बुमराहला खेळण्याची संधी मिळाली नाही. तरीही त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

नेमकं घडलं तरी काय?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बुमराह एखाद्या विमानतळावर एस्केलेटरवरून खाली उतरत असल्याचे दिसते. त्याचवेळी एक चाहता संधी साधत त्याचा सेल्फी व्हिडीओ शूट करू लागतो. सुरुवातीला बुमराहने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्या चाहत्याने थांबविण्याची विनंती करूनही मोबाईल कॅमेऱ्याने शूटिंग सुरूच ठेवल्याने बुमराह चिडलेला दिसला.

वॉर्निग देऊनही चाहता ऐकेना

बुमराहने त्या चाहत्याला स्पष्टपणे सांगितले की अशा प्रकारे व्हिडीओ काढल्यास त्याचा मोबाईल पडून खराब होऊ शकतो. मात्र चाहत्याने “काही हरकत नाही” असे उत्तर देत शूटिंग थांबवले नाही. इतकंच नव्हे तर तो “आम्हीही तुमच्यासोबतच चाललो आहोत” असे म्हणताना दिसतो.

अखेर बुमराहचा संयम सुटला

चाहत्याने सतत व्हिडीओ काढत राहिल्यामुळे अखेर बुमराहने त्याच्या मोबाईलवर हात मारत त्याला दूर ढकलले. व्हिडीओमध्ये मोबाईल खाली पडला की नाही, हे स्पष्ट दिसत नसले तरी हा प्रकार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

सोशल मीडियावर मिक्स प्रतिक्रिया

या घटनेनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण बुमराहच्या वागण्याचे समर्थन करत “सेलिब्रिटींची खासगी जागा जपली पाहिजे” असे म्हणत आहेत, तर काही जण त्याच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जिजाऊ चौक ते बळीराम पाटील रस्त्यावरील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा:स्थानिकांचा विरोध झुगारून 24 हातगाड्या जप्त,...

0
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जिजाऊ चौक ते बळीराम पाटील रस्त्यावरील अतिक्रमणांवर शुक्रवारी (१७ जुलै) मोठी कारवाई केली. या मोहिमेत २४ हातगाड्या जप्त करण्यात आल्या...

राहुल गांधींची डेहराडूनमध्ये 8 हजार विद्यार्थ्यांशी चर्चा:म्हणाले- 1% लोक पेपरफुटीच्या मार्गावर चालतात, यामुळे 99%...

0
डेहराडूनमधील बन्नू स्कूल ग्राउंडवर आयोजित काँग्रेसच्या 'विद्यार्थ्यांची गर्जना' कार्यक्रमात, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पेपरफुटी, भरती व्यवस्था आणि तरुणांचे भविष्य हे सर्वात...

17 जुलैचे राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न सुरू होऊ शकते, कुंभ राशीच्या लोकांना नोकरीत...

0
शुक्रवार, 17 जुलै रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न पुन्हा सुरू होऊ शकते आणि व्यवसायात महत्त्वाचे ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या नोकरदार...

सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन:वेस्ट इंडिजसाठी 93 कसोटी सामने खेळले, प्रथम...

0
वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन झाले आहे. एका षटकातील सर्व 6 चेंडूंवर 6 षटकार मारण्याचा पहिला...
spot_img

सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन:वेस्ट इंडिजसाठी 93 कसोटी सामने खेळले, प्रथम...

0
वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन झाले आहे. एका षटकातील सर्व 6 चेंडूंवर 6 षटकार मारण्याचा पहिला...

मेंटल हेल्थ- पती खूप पझेसिव्ह:प्रत्येक सेकंदाला विचारतो– ‘कुठे आहेस’; खूप श्वास गुदमरतो, वाटते हे...

0
प्रश्न– माझा पार्टनर (पती) माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खूप पझेसिव्ह (अधिकार गाजवणारा) देखील आहे. प्रत्येक वेळी त्याला हे जाणून घ्यायचे असते...

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

चायना मूनशॉट AI किमी K3 लाँच

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराचीनी कंपनी मूनशॉट एआयने (AI ने) आपले नवीन एआय मॉडेल किमी K3 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे...
error: Content is protected !!