Homeपुणे / पिंपरी-चिंचवडभारती विद्यापीठ पूना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

भारती विद्यापीठ पूना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

मेळाव्यात गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मदतीचा धनादेश

पुणे  : भारती विद्यापीठाच्या कोथरूड शैक्षणिक संकुलातील भारती विद्यापीठ पूना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये माजी विद्यार्थी स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. यावेळी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, प्राचार्य डॉ. आत्माराम पवार, ॲल्युमिनाय असोशीएशनचे अध्यक्ष श्रीधर जोशी, उपप्राचार्या डॉ. वर्षा पोखरकर, डॉ. सत्यनारायणन, सचिव डॉ. शर्विल पाटील उपस्थित होते. या स्नेह मेळाव्यासाठी देश विदेशातून माजी विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित राहिले होते.

भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांच्या नेतृत्वाखाली १९८१ साली पूना कॉलेज ऑफ फार्मनीची स्थापना झाली. तेव्हापासून महाविद्यालयाच्या यशाचा आलेख सतत उंचावत राहिला आहे. या वर्षी NIRF कडून महाविद्यालयास ३४ या क्रमांक प्राप्त झाला असून एन.बी.ए व नॅक कडून A++ दर्जा मिळाला आहे. तसेच १८०० शोध निबंध प्रसिध्द झाले असून व २१ पेटेन्ट मंजूर झालेली आहेत. महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी नामांकित औषध कंपन्यामध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत.

यावेळी निवृत शिक्षक डॉ. अजित पुरोहित व डॉ. किशोर गुजर यांचा पीसीपी गुरु म्हणून तर महाविद्यालयाचे प्रथम प्रबंधक वसंतराव माने यांचा सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

माजी विद्यार्थ्यांकडून गुणवंत विद्यार्थी व आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी २,२४,६१२/-रुपयांचा धनादेश महाविद्यालयाकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थ्यांना स्मृती चिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले.

संयोजक डॉ. दिपाली बनसोडे व डॉ. वैभव शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर खजिनदार डॉ. प्रविण जावळे यांनी आभार मानले.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!