Homeदेश-विदेशviral news 4 तासात लग्न आणि लुटले चायना वाइल्डेस्ट वेडिंग स्कॅम

viral news 4 तासात लग्न आणि लुटले चायना वाइल्डेस्ट वेडिंग स्कॅम

व्हायरल लग्न बातम्या: प्रेम… ही एक अशी भावना आहे जी प्रत्येकालाच वेगळे अनुभव देऊन जाते. मुळात ही भावना अनेकांसाठी अव्यक्त अशी असते. काहींसाठी मात्र हेच प्रेम आयुष्यभराचा धडा शिकवून जातं बरं! ज्या प्रेमाची इतकी छान बाजू कायम समोर येते, तेच प्रेम धक्कासुद्धा देऊन जातं. इथं प्रेमाची चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे एक अनपेक्षित घटना जी काशीही सिनेमाची कहाणी वाटते. प्रत्यक्षात ही घटना घडल्यानं ऐकणाऱ्यांचेही कान टवकारत आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

4 तासांचं लग्न आणि…

चीनमध्ये घडलेल्या या घटनेची सध्या बरीच चर्चा सुरू असून SCMP पोस्टच्या वृत्तानुसार हुआंग झोंगचेंग (वय 40) हा चीनच्या हेंगयांग शहरातील एक इसम. स्वभावानं साधाभोळा. ऑगस्ट महिन्यात त्यानं ब्लाईंड डेटवर जाण्याचा बेत आखला, वाटेत त्याला आठ मॅचमेकर भेटले आणि त्यांनी एकाच महिलेचा पर्याय त्याला ‘परफेक्ट मॅच’ म्हणून दाखवला. हे काहीसं अनपेक्षित होतं. मात्र त्यानं इथं नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.

खरा पेच तर पुढं होता. ज्या दिवशी ते दोघं भेटले, तेव्हात महिलेनं लग्नाचा तगादा लावला. हुआंगनं फार विचार केला आणि अखेर सायंकाळी 5 वाजता लग्नाची नोंदणी केली. आयुष्य त्याला जणू एका स्वप्नाप्रमाणं भासू लागलं आणि ही आनंदाची भावना मनात घर करतानात तारे फिरले कारण, तो एका जाळ्यात सापडला होता…

काय आहे मॅचमेकिंग स्कॅम?

चीनमध्ये सध्या मॅचमेकिंग स्कॅम सुरू असून, त्याला हा 40 वर्षीय हुआंगही बळी पडला. लग्नानंतर पहिल्या रात्री हॉटेलवर पोहोचताच त्याच्या कथित पत्नीचं वागणं बदललं. जवळीक सोडा, पण आपुलकीसुद्धा त्या नात्यात नव्हती. होती तर ती फक्त पैशांची मागणी. सण येतोय पैसे हवेत, मुलीसाठी कंप्युटर हवा, घरखर्च वाढलाय…. वगैरे वगैरे. हुआंगनं शक्य त्या प्रत्येक वेळी मदत केली. WeChat मध्ये दिसल्यानुसार त्यानं तिला 1,314 युआनचं पाकिटही पाठवलं. ज्यावर महिलेचं उत्तर होतं, ‘Thank you, hubby’, पण हा सर्व दिखावा होता. अवघ्या 18 दिवसांमध्ये हुआंगनं  साठवलेले सर्व पैसे 240,000 युआन (साधारण 34,000 USD) हवेत जणू विरले.

सोशल मीडियावर या विचित्र लग्नानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. चीनमधील या इसमाला गंडा घालणाऱ्या नवरीबाईवनर अनेकांनीच आगपाखड केली. विस्तारित माहितीनुसार चीनमध्ये सध्या अशी अनेक प्रकरणं दिसत असून, ‘मॅचमेकिंग स्कॅम’ म्हणून या घोटाळ्याला नाव देण्यात आलं आहे. ही महिला एकटी नसून फसवणूक करणारी ही टोळीच सध्या तिथं सक्रिय असल्याचं म्हटलं जात असून अनेक तरुणांची यामध्ये फसवणूक केली जात आहे ही धक्कादायक बाब प्राथमिक तपासातून समोर आली.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!