व्हायरल लग्न बातम्या: प्रेम… ही एक अशी भावना आहे जी प्रत्येकालाच वेगळे अनुभव देऊन जाते. मुळात ही भावना अनेकांसाठी अव्यक्त अशी असते. काहींसाठी मात्र हेच प्रेम आयुष्यभराचा धडा शिकवून जातं बरं! ज्या प्रेमाची इतकी छान बाजू कायम समोर येते, तेच प्रेम धक्कासुद्धा देऊन जातं. इथं प्रेमाची चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे एक अनपेक्षित घटना जी काशीही सिनेमाची कहाणी वाटते. प्रत्यक्षात ही घटना घडल्यानं ऐकणाऱ्यांचेही कान टवकारत आहेत.
4 तासांचं लग्न आणि…
चीनमध्ये घडलेल्या या घटनेची सध्या बरीच चर्चा सुरू असून SCMP पोस्टच्या वृत्तानुसार हुआंग झोंगचेंग (वय 40) हा चीनच्या हेंगयांग शहरातील एक इसम. स्वभावानं साधाभोळा. ऑगस्ट महिन्यात त्यानं ब्लाईंड डेटवर जाण्याचा बेत आखला, वाटेत त्याला आठ मॅचमेकर भेटले आणि त्यांनी एकाच महिलेचा पर्याय त्याला ‘परफेक्ट मॅच’ म्हणून दाखवला. हे काहीसं अनपेक्षित होतं. मात्र त्यानं इथं नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.
खरा पेच तर पुढं होता. ज्या दिवशी ते दोघं भेटले, तेव्हात महिलेनं लग्नाचा तगादा लावला. हुआंगनं फार विचार केला आणि अखेर सायंकाळी 5 वाजता लग्नाची नोंदणी केली. आयुष्य त्याला जणू एका स्वप्नाप्रमाणं भासू लागलं आणि ही आनंदाची भावना मनात घर करतानात तारे फिरले कारण, तो एका जाळ्यात सापडला होता…
काय आहे मॅचमेकिंग स्कॅम?
चीनमध्ये सध्या मॅचमेकिंग स्कॅम सुरू असून, त्याला हा 40 वर्षीय हुआंगही बळी पडला. लग्नानंतर पहिल्या रात्री हॉटेलवर पोहोचताच त्याच्या कथित पत्नीचं वागणं बदललं. जवळीक सोडा, पण आपुलकीसुद्धा त्या नात्यात नव्हती. होती तर ती फक्त पैशांची मागणी. सण येतोय पैसे हवेत, मुलीसाठी कंप्युटर हवा, घरखर्च वाढलाय…. वगैरे वगैरे. हुआंगनं शक्य त्या प्रत्येक वेळी मदत केली. WeChat मध्ये दिसल्यानुसार त्यानं तिला 1,314 युआनचं पाकिटही पाठवलं. ज्यावर महिलेचं उत्तर होतं, ‘Thank you, hubby’, पण हा सर्व दिखावा होता. अवघ्या 18 दिवसांमध्ये हुआंगनं साठवलेले सर्व पैसे 240,000 युआन (साधारण 34,000 USD) हवेत जणू विरले.
सोशल मीडियावर या विचित्र लग्नानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. चीनमधील या इसमाला गंडा घालणाऱ्या नवरीबाईवनर अनेकांनीच आगपाखड केली. विस्तारित माहितीनुसार चीनमध्ये सध्या अशी अनेक प्रकरणं दिसत असून, ‘मॅचमेकिंग स्कॅम’ म्हणून या घोटाळ्याला नाव देण्यात आलं आहे. ही महिला एकटी नसून फसवणूक करणारी ही टोळीच सध्या तिथं सक्रिय असल्याचं म्हटलं जात असून अनेक तरुणांची यामध्ये फसवणूक केली जात आहे ही धक्कादायक बाब प्राथमिक तपासातून समोर आली.





















