Homeदेश-विदेशअलास्कातील 2025 चा शेवटचा सूर्यास्त झाल्याची व्हायरल बातमी जानेवारी 2026 उत्कियाग्विकला पुढील...

अलास्कातील 2025 चा शेवटचा सूर्यास्त झाल्याची व्हायरल बातमी जानेवारी 2026 उत्कियाग्विकला पुढील सूर्योदय दिसेल


व्हायरल वर्ल्ड न्यूज: जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथं गेलं असता या अशा गोष्टीसुद्धा आहेत? असाच प्रश्न मनात घर करून जातो. अशाच एका अतिशय दूरवरच्या ठिकाणी नुकतंच सूर्यानं यंदाच्या वर्षातील शेवटचं दर्शन देत निरोर घेतला आहे. ज्यामुळं तिथं यंदाच्या वर्षातील हे अखेरचं सूर्यदर्शन ठरलं आहे. आता इथं सूर्यकिरणं थेट जानेवारी महिन्या डोकावणार असून, तोपर्यंत या संपूर्ण भागावर अंधाराचं साम्राज्य असेल.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कुठं आहे हे अद्भूत ठिकाण?

अमेरिकेच्या अतीव उत्तरेला असणाऱ्या अलास्का (Alaska) इथं उटकियागविक(Utqiagvik) नावाच्या ठिकाणी ही किमया पाहायला मिळाली आहे. जिथं 2025 या वर्षातील अखेरचा सूर्यास्त नागरिकांनी अनुभवला आणि आगीचा हा तप्त गोळा एका मोठ्या सुट्टीवर गेला. हा संपूर्ण भाग आता एका प्रचंड मोठ्या रात्र पर्वामध्ये गेला असून, शास्त्री भाषेत या प्रक्रियेला ‘ध्रुवीय रात्र’ (Polar Night) असं म्हणतात. म्हणजेच इथं पुढचे 64 दिवस सूर्यकिरणांचा वावर नसेल. थोडक्यात सूर्य क्षितीजावर येणार नाही. ज्यामुळं आता थेट 22 जानेवारी 2026 रोजी इथं पुन्हा एकदा सूर्यकिरणं डोकावताना दिसतील असं सांगण्यात येत आहे.

इतके दिवस सूर्यदर्शन नाही? असं का?

पृथ्वी ही तिच्या अक्षावर एका बाजुला झुकलेली असल्यामुळं हे ठिकाण बरोबर आर्क्टिक वृत्ताच्या (Arctic Circle)वर येतं. ज्यामुळं इथं हे पर्व पाहायला मिळेल, अर्थात सूर्यकिरणांअभावी इथं पूर्णत: काळोख नसला तरीही इथं असणारा उजेड हा जवळपास रात्रीसारखाच असेल, ज्याला Twilight  असंही म्हटलं जातं. सोप्या भाषेत पहाटेच्या वेळी असणारा काहीसा अंधार आणि हलका उजेड.

उटकियागविक नावाच्या या शहरात 4400 लोकसंथ्या असून, फेअरबँक्सपासून हे शहर साधारण 800 किमी उत्तर पश्चिमेस आहे, जिथं पोलर नाईटमुळं अर्थात दीर्घकालीन रात्रीमुळं तापमानात लक्षणीय घट नोंदवली जाते. ही प्रक्रिया Polar Vortexसह संबंधित असून, हे पृथ्वीच्या हा पृथ्वीच्या वातावरणाचा दुसरा-सर्वात खालचा थर म्हणजेच स्थितांबरात (Stratosphere) दाब आणि प्रचंड थंड हवेचं एक ठिकाण आहे. यामुळं अमेरिकेच्याखालच्या बाजूस असणाऱ्या 48 राज्यांमध्ये हवामानाचं चक्र बदलतं आणि तिथं थंडीचा कडाका असह्य होतो. Utqiagvik मध्ये 2 महिन्यांच्या हिवाळ्यात रात्रीचा प्रहर असतो तिथंच इथल्या उन्हाळ्याचा कालावधी 3 महिन्यांचा असतो जिथं सूर्यकिरणं या भागात पोहोचतात.

Utqiagvik भागात राहणाऱ्या नागरिकांना येथील वातावरणीय बदलांशी कायमच समतोल राखावा लागतो. येथील नागरिक Northern Lights वर अवलंबून असतात आणि जानेवारीच्या अखेरच्याच दिवसांची वाट पाहत असतात. आहे की नाही हे पृथ्वीवरचं कमाल रहस्यमयी ठिकाण!!!!

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

हे रहस्यमयी ठिकाण नेमकं कुठं आहे?
अमेरिकेच्या अलास्का राज्यातील सर्वात उत्तरेकडील शहर – उटकियागविक (Utqiagvik) (पूर्वी नाव Barrow). हे आर्क्टिक वर्तुळाच्या (Arctic Circle) बरोबर वर आहे.

2025 मधील शेवटचा सूर्यास्त कधी झाला?
18 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे 1.38 वाजता (स्थानिक वेळ) शेवटचा सूर्यास्त झाला. त्यानंतर सूर्य क्षितीजाच्या खाली राहील.

पुढचा सूर्योदय कधी होईल?
थेट 22 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 1.23 वाजता पहिला सूर्योदय होईल. म्हणजे पूर्ण 64-65 दिवस सूर्य क्षितीजावर दिसणार नाही!





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!