व्हायरल वर्ल्ड न्यूज: जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथं गेलं असता या अशा गोष्टीसुद्धा आहेत? असाच प्रश्न मनात घर करून जातो. अशाच एका अतिशय दूरवरच्या ठिकाणी नुकतंच सूर्यानं यंदाच्या वर्षातील शेवटचं दर्शन देत निरोर घेतला आहे. ज्यामुळं तिथं यंदाच्या वर्षातील हे अखेरचं सूर्यदर्शन ठरलं आहे. आता इथं सूर्यकिरणं थेट जानेवारी महिन्या डोकावणार असून, तोपर्यंत या संपूर्ण भागावर अंधाराचं साम्राज्य असेल.
कुठं आहे हे अद्भूत ठिकाण?
अमेरिकेच्या अतीव उत्तरेला असणाऱ्या अलास्का (Alaska) इथं उटकियागविक(Utqiagvik) नावाच्या ठिकाणी ही किमया पाहायला मिळाली आहे. जिथं 2025 या वर्षातील अखेरचा सूर्यास्त नागरिकांनी अनुभवला आणि आगीचा हा तप्त गोळा एका मोठ्या सुट्टीवर गेला. हा संपूर्ण भाग आता एका प्रचंड मोठ्या रात्र पर्वामध्ये गेला असून, शास्त्री भाषेत या प्रक्रियेला ‘ध्रुवीय रात्र’ (Polar Night) असं म्हणतात. म्हणजेच इथं पुढचे 64 दिवस सूर्यकिरणांचा वावर नसेल. थोडक्यात सूर्य क्षितीजावर येणार नाही. ज्यामुळं आता थेट 22 जानेवारी 2026 रोजी इथं पुन्हा एकदा सूर्यकिरणं डोकावताना दिसतील असं सांगण्यात येत आहे.
इतके दिवस सूर्यदर्शन नाही? असं का?
पृथ्वी ही तिच्या अक्षावर एका बाजुला झुकलेली असल्यामुळं हे ठिकाण बरोबर आर्क्टिक वृत्ताच्या (Arctic Circle)वर येतं. ज्यामुळं इथं हे पर्व पाहायला मिळेल, अर्थात सूर्यकिरणांअभावी इथं पूर्णत: काळोख नसला तरीही इथं असणारा उजेड हा जवळपास रात्रीसारखाच असेल, ज्याला Twilight असंही म्हटलं जातं. सोप्या भाषेत पहाटेच्या वेळी असणारा काहीसा अंधार आणि हलका उजेड.
उटकियागविक नावाच्या या शहरात 4400 लोकसंथ्या असून, फेअरबँक्सपासून हे शहर साधारण 800 किमी उत्तर पश्चिमेस आहे, जिथं पोलर नाईटमुळं अर्थात दीर्घकालीन रात्रीमुळं तापमानात लक्षणीय घट नोंदवली जाते. ही प्रक्रिया Polar Vortexसह संबंधित असून, हे पृथ्वीच्या हा पृथ्वीच्या वातावरणाचा दुसरा-सर्वात खालचा थर म्हणजेच स्थितांबरात (Stratosphere) दाब आणि प्रचंड थंड हवेचं एक ठिकाण आहे. यामुळं अमेरिकेच्याखालच्या बाजूस असणाऱ्या 48 राज्यांमध्ये हवामानाचं चक्र बदलतं आणि तिथं थंडीचा कडाका असह्य होतो. Utqiagvik मध्ये 2 महिन्यांच्या हिवाळ्यात रात्रीचा प्रहर असतो तिथंच इथल्या उन्हाळ्याचा कालावधी 3 महिन्यांचा असतो जिथं सूर्यकिरणं या भागात पोहोचतात.
Utqiagvik भागात राहणाऱ्या नागरिकांना येथील वातावरणीय बदलांशी कायमच समतोल राखावा लागतो. येथील नागरिक Northern Lights वर अवलंबून असतात आणि जानेवारीच्या अखेरच्याच दिवसांची वाट पाहत असतात. आहे की नाही हे पृथ्वीवरचं कमाल रहस्यमयी ठिकाण!!!!
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
हे रहस्यमयी ठिकाण नेमकं कुठं आहे?
अमेरिकेच्या अलास्का राज्यातील सर्वात उत्तरेकडील शहर – उटकियागविक (Utqiagvik) (पूर्वी नाव Barrow). हे आर्क्टिक वर्तुळाच्या (Arctic Circle) बरोबर वर आहे.
2025 मधील शेवटचा सूर्यास्त कधी झाला?
18 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे 1.38 वाजता (स्थानिक वेळ) शेवटचा सूर्यास्त झाला. त्यानंतर सूर्य क्षितीजाच्या खाली राहील.
पुढचा सूर्योदय कधी होईल?
थेट 22 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 1.23 वाजता पहिला सूर्योदय होईल. म्हणजे पूर्ण 64-65 दिवस सूर्य क्षितीजावर दिसणार नाही!





















