Homeदेश-विदेशदिल्लीचा लाल किल्ला ह्युंदाई i20 कारचा स्फोट तपासात धक्कादायक तपशील डॉ उमर...

दिल्लीचा लाल किल्ला ह्युंदाई i20 कारचा स्फोट तपासात धक्कादायक तपशील डॉ उमर हा शू बॉम्बर होता


दिल्ली लाल किल्ला Hyundai i20 कार स्फोट धक्कादायक तपशील: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या कारमधील स्फोटाच्या तपासात सुरक्षा यंत्रणांच्या हाती एक धक्कादायक गोष्ट लागली आहे. सुरक्षा यंत्रणांमधील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 जणांनी प्राण गमावलेल्या दिल्लीतील या स्फोटात जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मदने ‘शू बॉम्ब’ वापरल्याचे पुरावे सापडले आहेत. मागील आठवडाभरापासून सुरु असलेल्या तपासात उमर हा ‘शू बॉम्बर’ असल्याचं सूचित करणारे अनेक पुरावे हाती लागले आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

बूटामुळे गमावले प्राण

ज्या ठिकाणी हा स्फोट झाला तेथून तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलेल्या आणि डॉक्टर उमर मोहम्मदने आत्मघातकी पद्धतीने उडवून दिलेल्या आय-20 कारच्या सांगड्यामध्ये हादरवून सोडणाऱ्या काही गोष्टी आढळल्याचं ‘न्यूज18 इंडिया’ने म्हटलं आहे. ड्रायव्हरच्या सीटखाली, उजव्या पुढच्या टायरजवळ तपास यंत्रणांना एक बूट सापडला आहे. तपासादरम्यान या बुटात धातूसारखा स्फोटक पदार्थ आढळला असून हाच पदार्थ सदर स्फोट घडवून आणण्यासाठी वापरला गेला होता. आतापर्यंतच्या तपासातून हेच ​​अधोरेखित करणारे अनेक पुरावे समोर आलेत, असं सूत्रांचं म्हणणं आहे. म्हणजेच या बुटाच्या माध्यमातून घडवलेल्या स्फोटात 9 जणांनी आपले प्राण गमावले असून 30 हून अधिकजण जखमी झालेत.

‘TATP’ कनेक्शन

तपास पथकाला टायर आणि बुटात ‘टीएटीपी’चे (TATP) अंश आढळून आलेत. ‘टीएटीपी’ किंवा ट्रायएसीटोन ट्रायपेरोक्साइड हा जगभरातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये वापरला जाणारा धोकादायक घटक आहे. त्याला ‘डेव्हिल्स मदर’ म्हणूनही ओळखले जाते. सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी मोठ्या हल्ल्यासाठी मोठ्या प्रमाणात ‘टीएटीपी’ गोळा करत होते. या दाव्याला आता पुराव्यांच्या आधारे बळ मिळत आहे.

कारमध्ये अनेक ठिकाणी लपवलेली स्फोटके

फॉरेन्सिक टीमच्या अहवालांनुसार, लाल किल्ल्यावरील स्फोटात अमोनियम नायट्रेटसह ‘टीएटीपी’ स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. या दोन्ही रसायनांचे मिश्रण स्फोटाची क्षमता अनेक पटींनी वाढवते, असं सांगितलं जातं. तपास यंत्रणांना गाडीच्या मागील सीटखाली स्फोटक पदार्थांचे अंशही आढळले आहेत. यावरून स्पष्ट होते की स्फोटके एकाच ठिकाणी नव्हे तर कारच्या अनेक भागांमध्ये लपवण्यात आली होती.

20 लाख कुठून मिळाले?

तपासात असंही समोर आलं आहे की स्फोटाच्या कटासाठी 20 लाख रुपयांचं आर्थिक पाठबळ अटक केलेल्या लेडी डॉक्टर शाहीनच्या माध्यमातून मिळालं होतं. दहशतवादी मॉड्यूलला शाहीननेच हे 20 लाख रुपये पोहोचवले होते.

विमानातील बॉम्बस्फोट टळला

डिसेंबर 2001 मध्ये अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात डॉक्टर उमर मोहम्मदने वापरलेल्या स्फोट घडवण्याच्या पद्धतीचाच वापर केला होता. त्यावेळी रिचर्ड रीड नावाच्या ‘शू बॉम्बर’ने ‘टीएटीपी’ भरलेला शूज वापरून बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो वेळीच पकडला गेला अन् विमानात होणारा हा बॉम्बस्फोट टळला होता. उमर मोहम्मदनेही शू बॉम्बर वापरून असाच बॉम्बस्फोट घडवल्याचं सांगितलं जात आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

28 नोव्हेंबरचे टॅरो राशिभविष्य: कुंभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या पदोन्नतीला मंजुरी मिळेल, कन्या राशीच्या लोकांसाठी...

0
11 तासांपूर्वीकॉपी लिंकशनिवार, 28 नोव्हेंबर रोजी कुंभ राशीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना रखडलेल्या बढती आणि थकीत भत्त्यांना मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मकर राशीच्या ज्या...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना उच्च पद मिळण्याचे योग, तर कन्या राशीच्या लोकांना प्रमोशन...

0
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना उच्च पद किंवा मोठी प्रशासकीय जबाबदारी मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. सरकारी कंत्राटे आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित...

एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! – श्री. शॉन क्लार्क

0
‘कॉप-३१’ जागतिक हवामान परिषदेत भारतीय शिष्टमंडळातर्फे भारताचा आध्यात्मिक संशोधन दृष्टिकोन सादर ‘पर्यावरण जाणीव चळवळ’ : एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! - श्री. शॉन...

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!