दिल्ली बॉम्बस्फोट अपडेट: दिल्लीतील लाल किल्ला येथे 10 नोव्हेंबर रोजी स्फोट घडवून आणण्यात आला होता. या स्फोटामुळं देशभरात एकच खळबळ उडाली असून या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला होता. दिल्लीतील बॉम्ब स्फोटाचा आणखी एक सीसीटिव्ही व्हिडिओ समोर आला आहे. यात स्पष्टपणे दिसतंय की स्फोटामुळं 40 फूट खोलपर्यंत हादरले जाणवले आहेत.
दिल्ली स्फोटाचं आणखी एक सीसीटीव्ही समोर आलंय. हा स्फोट इतका भीषण होता की जणू पृथ्वी हादरली. स्फोटांमुळे 40 फूट खोलवर जमीन हादरली. दिल्लीतील मेट्रो स्टेशनचं सीसीटीव्ही फुटेज झी 24 तासच्या हाती लागलंय.
स्फोट होताच लाल किल्ला मेट्रो स्टेशनमध्ये एकच गोंधळ उडाला. भूमिगत मेट्रो स्टेशनचं फ्लोरिंग आणि फूड कार्नर स्फोटानं हादरले. मेट्रोतून प्रवास करणा-या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि ते इकडे तिकडे पळू लागले. स्फोटांमुळे खड्डा पडला असता तर तो भूमिगत मेट्रोवरच कोसळला असता. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली असंच म्हटलं जातंय.
दिल्ली स्फोटाच्या तपासात मोठा खुलासा
दिल्ली स्फोटाच्या तपासात मोठा खुलासा करण्यात आला आहे. स्फोटात 2 किलोहून अधिक अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आला. आरोपी डॉक्टर उमर बॉम्ब बनवण्यात एक्सपर्ट होता त्याने स्फोटासाठी डेटोनेटेरसह पेट्रोलचाही वापर केला होता, अशी धक्कादायक माहिती फॉरेन्सिक चाचणीतून समोर आली आहे. तसंच, दिल्ली स्फोटासाठी वापरण्यात आलेली i-20कारही अवघ्या दोन लाख रुपयांत खरेदी करण्यात आली होती. फरीदाबादमधील एका कार डीलरकडून ही कार खरेदी करण्यात आली होती आणि त्यासाठी त्याला रोख रक्कम देण्यात आली होती. गाडी खरेदी करण्यासाठी कागदपत्र म्हणून जम्मू-काश्मीरचा ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात आला होता अशी माहिती तपासातून उघडकीस आलीये.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न १: दिल्लीतील लाल किल्ला परिसरात स्फोट कधी झाला?
उत्तर: दिल्लीतील लाल किल्ला येथे हा स्फोट १० नोव्हेंबर रोजी घडवून आणण्यात आला होता.
प्रश्न २: या स्फोटात किती जणांचा मृत्यू झाला?
उत्तर: या भीषण स्फोटात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला होता.
प्रश्न ३: स्फोटाबाबत समोर आलेल्या नवीन सीसीटीव्ही फुटेजमधून काय उघड झाले आहे?
उत्तर: नवीन सीसीटीव्ही व्हिडिओनुसार, हा स्फोट इतका भीषण होता की स्फोटामुळे ४० फूट खोलपर्यंत जमीन हादरल्याचे जाणवले.





















