Homeदेश-विदेशयूपीमध्ये 75 वर्षांच्या वराच्या मृत्यूनंतर काय घडले हे वधू प्रकट करते

यूपीमध्ये 75 वर्षांच्या वराच्या मृत्यूनंतर काय घडले हे वधू प्रकट करते


उत्तर प्रदेशच्या जौनपूर गावात 75 वर्षीय संगरु राम आणि 35 वर्षीय महिलेच्या लग्नाची चर्चा रंगली होती. पण लग्नानंतर दुसऱ्या दिवशी नवरदेवाच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान मृत्यूच्या रात्री नेमकं काय झालं होता याचा खुलासा महिलेने केला आहे. महिलेने सांगितलेलं सत्य ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

मनभावती यांनी सांगितलं की, मधुचंद्राच्या रात्री ते फक्त माझ्याशी गप्पा मारत होते. लग्न आणि मुलांच्या भविष्याच्या योजनांबद्दल ते माझ्याशी बोलत होते. पण सकाळी अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच सर्व काही संपलं होतं. गौराबादशाहपूर स्टेशनचे प्रभारी प्रवीण यादव यांनी सांगितलं की, शवविच्छेदन अहवालातून संगरु राम यांचा मृत्यू धक्क्याने/कोमा झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. हा नैसर्गिक मृत्यू आहे. कोणतीही संशयित बाब समोर आलेली नाही. कोणतंही औषध किंवा कोणताही ओव्हरडोस झालेला नाही.

एकटेपणाचा सामना करत होते संगरु राम

कुछमुछ गावातील रहिवासी असणारे संगरु राम यांच्या पत्नीचं एक वर्षापूर्वी निधन झालं होतं. त्यांना मूल नव्हतं. मागील अनेक काळापासून ते एकटे होते आणि शेती करत होते. कुटुंब आणि मुलांचा आधार नसल्याने आपण दुसरं लग्न करायला हवं असं ते वारंवार म्हणत होते. गावातील लोकांना हा त्यांचा हट्ट वाटत होता. पण संगरु यांना खरोखर एक जोडीदार हवा होता.

दुसर्‍या लग्नाचे उदाहरण

गेल्या सोमवारी त्यांनी जलालपूर पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी मानभावतीशी लग्न केले. मानभावती यांचं हे दुसरे लग्न होतं. त्यांना पहिल्या लग्नापासून दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांनी म्हटलं की, “मी लग्नासाठी तयार नव्हते. पण मला खात्री होती की संगरु राम माझ्या मुलांची जबाबदारी घेईल. या आश्वासनाने मी होकार दिला.” सोमवारी कोर्ट मॅरेज झाल्यानंतर मंदिरातील विधीनुसार लग्न झाले. हे लग्न संपूर्ण गावात चर्चेचा विषय बनले. लोक म्हणत होते, “वृद्धापकाळातही नवरा असणे सोपे नाही,” पण संगरुने सर्वांना दाखवून दिले की त्याचा उत्साह अजूनही तितकाच आहे.

मधुचंद्राची ती रात्र

लग्नानंतर पहिली रात्र दोघांनी एकत्र घालवली. ते फार आनंदी होते असं मनभावतीने सांगितलं. ते म्हणाले, आता पुन्हा घरात हालचाली वाढतील. ते वारंवार माझी मुलं आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याबद्दल बोलत होते. रात्री उशिरापर्यंत ते गप्पा मारत होते आणि नंतर झोपून गेले. त्यांचं वागणं अत्यंत सामान्य होतं. पण सकाळी जेव्हा ते उठले तेव्हा त्यांची तब्येत बिघडली. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी मृत जाहीर केलं.

विकली होती जमीन

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लग्नाआधी संगरु यांनी त्यांची जमीन विकली. या जमिनीतून त्यांना पाच लाख रुपये मिळाले. त्यांनी लग्नाच्या तयारीसाठी मनभावती यांना 20 हजार रुपयेही दिले. हे पैसे कपडे, दागिने आणि इतर लग्नाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी वापरले गेले. गावकरी म्हणतात की संगरु लग्नाबद्दल खूप उत्साहित होते. तो वारंवार सांगत होते की आता त्यांचा संसार नव्याने सुरु होईल आणि एकटेपणा दूर होईल. पण कोणाला माहित होते की लग्नाच्या 24 तासांपूर्वीच सर्व काही संपेल.

संगरु राम यांच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मनभावती यांच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्टपणे दिसून येत आहेत. “त्यांनी माझ्या मुलांची जबाबदारी घेण्याचं वचन दिलं होतं. मला वाटलं होतं की आता आयुष्य ठीक होईल. पण ते निघून गेले आणि मला पुन्हा एकटे सोडले,” असा शोक त्यांनी व्यक्त केला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

आग्रा येथे पतीची हत्या करून बाथरूममध्ये पुरले:मिस्त्रीला बोलावून टाईल्स लावल्या, 45 दिवस लोकांना सांगत...

0
आग्रा येथे पत्नीने पतीची हत्या करून मृतदेह घरातील बाथरूममध्येच पुरला. कोणालाही याची माहिती मिळू नये म्हणून बाथरूममध्ये फरशा बसवल्या. 45 दिवस तिने लोकांना...

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेसाठी शनिवारी मतदान:12 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात, शुक्रवारी भेटीगाठींवर भर

0
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (KDCC) अत्यंत चुरशीची निवडणूक शनिवारी पार पडत आहे. जिल्ह्याच्या राजकीय आणि आर्थिक सत्ताकेंद्राचे महत्त्व असलेल्या या निवडणुकीत...

भारतीय सैन्याचे हाय-टेक अपग्रेड: आकाश ट्रँगो, कामिकाझे ड्रोन समावेश

0
मराठी बातम्याराष्ट्रीयभारतीय लष्कर हायटेक अपग्रेड: आकाश ट्रांगो, कामिकाझे ड्रोन समावेश | ₹५२००० कोटी डीलनवी दिल्ली6 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करासंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली...

तुलसीदास मंत्र जप भाव जीवन प्रभाव, हिंदीमध्ये मंत्रजपाचे फायदे, भक्तीबद्दल प्रेरक कथा

0
6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआयुष्यात कधीकधी आपले मन कोणत्याही कामात लागत नाही. कधी थकवा, कधी ताण, कधी निराशा आणि कधी मनातील गुंतागुंत आपल्याला पूजा-पाठ,...
spot_img

भारत वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर:कोल्सला पहिल्यांदा संधी, जोफ्रा आर्चरचे पुनरागमन; हॅरी ब्रूक कर्णधारपद...

0
भारताविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंडने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ससेक्सचा अष्टपैलू खेळाडू जेम्स कोल्सला पहिल्यांदाच वनडे संघात स्थान मिळाले...

सगळ्यांच्या ‘हो ला हो’ करतो:मी सगळ्यांना खूश करतो, माझे स्वतःचे असे व्यक्तिमत्व नाही, मला...

0
प्रश्न– मी २७ वर्षांचा आहे आणि गेल्या काही काळापासून एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात येत आहे. जेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत असतो, तेव्हा एका...

कॉमेडियन म्हणाला- डॉक्टर बनून महिलांचे अवयव बघेन:पोलिसवाला बनायचं नाही, बाबू गप्पीने पोस्ट केला आक्षेपार्ह...

0
प्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर बाबू गप्पी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यामध्ये ते महिलांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलत...

ई-रिक्षाला रस्त्यात थांबवणारे मोबाईल ॲप बॅन:चीनी कंपनीच्या ॲपचा गैरवापर होत होता, ब्लूटूथद्वारे कनेक्ट होत...

0
दिल्लीतील ई-रिक्षा चालकांना सध्या एका विचित्र समस्येचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर चालत असताना अचानक ई-रिक्षा बंद पडतात आणि पुन्हा सुरू होत नाहीत....
error: Content is protected !!