Homeदेश-विदेशबिलावल भुट्टो यांना मिथुन चक्रवर्ती विचित्र प्रतिसाद एक धरण तयार करेल जिथे...

बिलावल भुट्टो यांना मिथुन चक्रवर्ती विचित्र प्रतिसाद एक धरण तयार करेल जिथे 140 कोटी जोडले जातील


बिलावल भुट्टो यांना मिथुन चक्रवर्ती विचित्र प्रतिसादः पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अमेरिकेच्या भूमीमवरुन मागील काही दिवसांमध्ये भारताविरुद्ध अनेकदा गरळ ओकल्याचं पाहायला मिळालं. असं असतानाच आता पाकिस्तानमधील नेत्यांनाही भारताविरुद्ध विधानं करण्याची खुमखुमी आल्याचं पाहायला मिळत आहे. अशाच नेत्यांपैकी एक म्हणजे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी! त्यांनी एका जाहीर भाषणामधून भारताला हल्ल्याची धमकी दिली. या धमकीवरुन बिलावल यांची खिल्ली उडवली जात असतानाच ज्येष्ठ अभिनेते आणि भारतीय जनता पार्टीचे नेते मिथुन चक्रवर्ती यांनी मंगळवारी बिलावल यांची लाजच काढली.

बिलावल काय म्हणाले?

सिंध सरकारच्या संस्कृती विभागाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बिलावल भुट्टो यांनी भारताला इशारा दिला होता. त्यांनी “सिंधू नदीचे पाणी वळवणे हा पाकिस्तानच्या इतिहास, संस्कृती आणि सभ्यतेवर”, विशेषतः सिंधवर हल्ला आहे,” असं म्हटले होते. बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून विचाराधीन असलेला सिंधू नदीवरील पाणी प्रकल्प हा पाकिस्तानच्या जल सुरक्षेसाठी थेट धोका असल्याचा आरोप करत भारतावर हल्ल्याचा इशारा दिला. तसेच भुट्टोंनी मे महिन्यात झालेल्या लष्करी संघर्षात भारताचा पराभव झाल्याचा दावाही केला होता. यावरुनच मिथुन चक्रवर्तींनी आपल्या खास शैलीत टोला लगावला.

आधी केला ब्रम्होसचा उल्लेख

बिलावल भुट्टो झरदारी यांनी सिंधू जल कराराच्या स्थगितीवरून भारताला दिलेल्या इशाऱ्याबद्दल पत्रकारांनी मिथुन चक्रवर्तींना प्रश्न विचारला. यावेळेस बोलताना मिथुन चक्रवर्तींनी पाकिस्तानी जनतेला युद्ध नकोय पण तेथील राजकारणी वाचाळवीर असून वाटेल ती विधानं करत असल्याचं म्हटलं. पुढे बोलातना मिथुन यांनी पाकिस्तानी नेते अशीच बडबड करत राहिले तर भारत त्यांच्यावर ब्रम्होस क्षेपणास्रांचा मार करेल असं म्हटलं. मात्र त्यानंतरही हे सुरु राहिलं तर काय करता येईल याबद्दल बोलताना मिथुन यांनी अगदीच खोचक विधान करत बिलावल यांची खिल्ली उडवली.

धरणात 140 कोटी भारतीय लघवी करतील अन्…

पाकिस्तानचे बिलावल भुट्टो म्हणत आहेत की भारताविरुद्ध युद्ध करु, असं म्हणत मिथुन यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, “पाकिस्तानच्या जनतेबद्दल आमचं काही म्हणणं नाहीये. त्यांना युद्ध नकोय. पण अशा गोष्टी ते बरळत राहिले तर डोकं फिरल्यास एकामागून एक ब्रम्होस क्षेपणास्रं डागली जातील. आणि काहीच नाही झालं तर आपण एक धरण बांधू, तिथे 140 कोटी भारतीय लघवी करतील. त्यानंतर त्या धरणाचे दरवाजे उघडू. असं केलं तर एकही गोळी न झाडता त्सुनामी येईल आणि त्यात ते वाहून जातील,” असं विधान मिथुन चक्रवर्तींनी केलं.

“मी हे सर्व त्यांच्यासाठी (बिलावल भुट्टो) सांगतोय,” असंही सांगायला मिथुन विसरले नाहीत.

FAQ

मिथुन चक्रवर्ती यांनी पाकिस्तानी जनतेबद्दल काय म्हटले?
मिथुन चक्रवर्ती यांनी स्पष्ट केले की, त्यांचे पाकिस्तानी जनतेबद्दल कोणतेही वाईट मत नाही आणि त्यांना युद्ध नको आहे. त्यांनी पाकिस्तानी नेत्यांच्या वाचाळवीरपणावर आणि त्यांच्या बेजबाबदार विधानांवर टीका केली.

मिथुन चक्रवर्ती यांचे विधान चर्चेत का?
मिथुन चक्रवर्ती यांचे विधान प्रामुख्याने विनोदी आणि खोचक आहे, ज्याचा उद्देश बिलावल भुट्टो यांच्या धमकीला हलक्या भाषेत प्रत्युत्तर देणे आणि त्यांची खिल्ली उडवणे हा होता. त्यांनी युद्धाच्या गंभीर परिणामांऐवजी अतिशयोक्तीपूर्ण आणि विनोदी भाषा वापरली.

सिंधू जल कराराचा या प्रकरणाशी काय संबंध आहे?
बिलावल भुट्टो यांनी भारताने विचाराधीन असलेल्या सिंधू नदीवरील पाणी प्रकल्पावरून सिंधू जल कराराच्या स्थगितीचा मुद्दा उपस्थित केला, ज्याला त्यांनी पाकिस्तानच्या जल सुरक्षेसाठी धोका ठरवले. यावरूनच त्यांनी भारताला हल्ल्याची धमकी दिली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!