Homeदेश-विदेशगन असलेल्या पुरुषांनी पाटणा येथील रुग्णालयात मृत रुग्णांना गोळ्या घातल्या

गन असलेल्या पुरुषांनी पाटणा येथील रुग्णालयात मृत रुग्णांना गोळ्या घातल्या


बिहारमध्ये एखाद्या चित्रपटातील सीनप्रमाणे रुग्णालयात घुसून पाच जणांनी एका रुग्णाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पाच हल्लेखोर रुग्णालयात शिरले, नंतर सहजपणे रुग्णाच्या रुममध्ये गेले आणि गोळ्या घालून पळ काढला. या घटनेनंतर बिहारमधील कायदा सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा संपूर्ण घटनाक्रम रुग्णालयातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्हीत पाचही आरोपी गोळ्या घातल्यानंतर पळून जाताना दिसत आहेत. पीडित चंद्रन मिश्राचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मिश्रा हा एक कट्टर गुन्हेगार असून त्याच्यावर डझनभर खूनाचे गुन्हे दाखल आहेत. वैद्यकीय कारणास्तव त्याला पॅरोल मिळाला होता. त्याला पाटण्याच्या पारस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे आज सकाळी गोळीबार झाला. या भयानक हल्ल्यामागे प्रतिस्पर्धी टोळीचा हात असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

वरिष्ठ पोलिस अधीक्षक कार्तिकय शर्मा यांनी गोळीबारानंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, “बक्सर जिल्ह्यातील रहिवासी चंदन मिश्रा नावाचा एक गुन्हेगार, ज्याच्याविरुद्ध खूनाचे डझनभर गुन्हे दाखल आहेत, त्याला बक्सरहून भागलपूर तुरुंगात हलवण्यात आलं. चंदन पॅरोलवर होता आणि त्याला उपचारासाठी पारस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रतिस्पर्धी टोळीने त्याच्यावर गोळीबार केला. बक्सर पोलिसांच्या मदतीने आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत. चंदन शेरू टोळीच्या सदस्यांची ओळख पटवली जात आहे”.  या घटनेत रुग्णालयाचे सुरक्षारक्षक सहभागी होते का? याचाही तपास पोलीस करत आहेत.

गेल्या काही आठवड्यात हत्येच्या अनेक घटना घडल्याने बिहारची राजधानी चर्चेत आली आहे. रुग्णालयातील गोळीबारामुळे पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्या आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये व्यापारी गोपाळ खेमका, भाजपा नेते सुरेंद्र केवट आणि वकील जितेंद्र महातो यांचा समावेश आहे.

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू-भाजप सरकारवर टीका करण्यासाठी विरोधकांना आयती संधी मिळाली आहे. रुग्णालयात झालेल्या गोळीबारानंतर, आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी बिहार सरकारला राज्यात कोणीही कुठेही सुरक्षित आहे का? असा प्रश्न विचारला आहे. “सरकार समर्थित गुन्हेगारांनी आयसीयूमध्ये घुसून रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णावर गोळीबार केला. बिहारमध्ये कुठेही कोणी सुरक्षित आहे का? 2005 पूर्वी हे घडले आहे का?”, असंही त्यांनी विचारलं आहे.

उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी गुन्हेगारांना पकडलं जाईल असं आश्वासन दिलं आहे. “ही घटना दुर्दैवी आहे. त्याची सखोल चौकशी केली जाईल आणि गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगाराला पकडले जाईल आणि कडक शिक्षा केली जाईल असं म्हटलं आहे,” असं त्यांनी सांगितलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

तिसऱ्या पत्नीच्या मनधरणीसाठी टॉवरवर चढला युवक:गार्ड रील बघत राहिले, तुरुंगातून बलात्कारी पळाला; मांजरीला अमर...

0
मध्य प्रदेशात दोन पत्नी असतानाही तिसऱ्या पत्नीला मनवण्यासाठी एक व्यक्ती टॉवरवर चढला. तर, बरेलीच्या सेंट्रल जेलमध्ये गार्ड रील पाहण्यात व्यस्त असताना बलात्काराचा आरोपी...

शनिवारचे टॅरो राशिभविष्य:मिथुन आणि कुंभ राशीच्या लोकांचे जुने वाद मिटतील, मकर राशीच्या लोकांना पदोन्नती...

0
शनिवार, २७ जून रोजी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण होऊ शकतो. मिथुन राशीच्या लोकांचे जुने वाद...

मेस्सी आणि रोनाल्डो समोरासमोर; अर्जेंटिना विरुद्ध जॉर्डन, पोर्तुगाल विरुद्ध कोलंबिया

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: मेस्सी आणि रोनाल्डो आमनेसामने; अर्जेंटिना विरुद्ध जॉर्डन, पोर्तुगाल विरुद्ध कोलंबियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज...

खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे मैदानात:यवतमाळातून आज विदर्भ दौऱ्याची सुरुवात; बंडखोरांना काय उत्तर देणार? राज्याचे...

0
ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज थेट मैदानात उतरले आहेत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात आजपासून उद्धव ठाकरेंच्या तोफ धडाडणार असून, त्यांच्या...
spot_img

मेस्सी आणि रोनाल्डो समोरासमोर; अर्जेंटिना विरुद्ध जॉर्डन, पोर्तुगाल विरुद्ध कोलंबिया

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: मेस्सी आणि रोनाल्डो आमनेसामने; अर्जेंटिना विरुद्ध जॉर्डन, पोर्तुगाल विरुद्ध कोलंबियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज...

अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...

0
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...

व्यायामानंतरही वजन कमी होत नाही:कॅलरी ट्रॅक करणे पुरेसे नाही, हार्मोन टेस्ट करा, तज्ञांकडून वजन...

0
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी तक्रार हीच असते- "मी रोज चालतो, जिममध्ये जातो, डाएटही कंट्रोल करतो, तरीही वजन कमी होत...

लग्नासाठी गोव्यात पोहोचले साऊथ आणि बॉलिवूड स्टार्स:अनिल कपूर-जॅकी श्रॉफ, चिरंजीवी आणि नागार्जुन पारंपरिक लूकमध्ये...

0
अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर आणि चित्रपट निर्माता सुंदर सी यांची मोठी मुलगी अवंतिका सुंदर विवाहबंधनात अडकली आहे. तिने 25 जून रोजी गोव्यातील...
error: Content is protected !!