Homeदेश-विदेशIndia will become the world's food provider, farmers' interests come first -...

India will become the world’s food provider, farmers’ interests come first – Shivraj | भास्कर इंटरव्ह्यू: भारत बनेल जगाचा अन्नदाता, शेतकऱ्यांचे हित सर्वप्रथम- शिवराज


  • मराठी बातम्या
  • राष्ट्रीय
  • भारत जगातील अन्न प्रदाता होईल, शेतकर्‍यांचे हित प्रथम शिवराज येतील

धर्मेंद्रसिंह भदोरिया | नवी दिल्ली35 मिनिटांपूर्वी

  • कॉपी दुवा

केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, मोदी सरकारचे ध्येय भारताला जगाचा अन्नदाता बनवणे आहे. या दिशेने सतत काम केले जात आहे. शास्त्रज्ञांचे संशोधन व तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण लवकरच उत्पादन वाढवून इतर देशांना अन्न पुरवू शकू. केंद्रीय मंत्री चौहान यांनी दिल्लीत दैनिक भास्करशी विशेष संभाषणात शेती, ग्रामीण विकास आणि राजकारण यावर सविस्तर चर्चा केली. भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत नावाबाबत ते म्हणतात की, सध्या माझ्या मनात फक्त शेतकरी आणि गावे आहेत आणि मी वर्तमानात जगतो. या संभाषणातील ठळक मुद्दे…

कृषी २०४७ मध्ये विकसित भारतात शेती व ग्रामीण विकासाची भूमिका काय असेल?

शेती भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतकरी हा त्याचा आत्मा. ७०% लोक खेड्यांमध्ये राहतात. शेतीशिवाय भारताचा विकास होऊ शकत नाही. पंतप्रधान मोदींचे स्वप्न आपल्यासाठी वरदान आहे. गेल्या ११ वर्षांत शेतीत क्रांती झाली आहे. बुधवारीच मंत्रिमंडळाने धन-धान्य योजनेला मंजुरी दिली. दहा वर्षांत कृषी उत्पादनात ४०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. १९६६-८० मध्ये दुग्ध उत्पादनात वार्षिक वाढ ०.९ दशलक्ष टन होती, जी २०१४-२४ मध्ये १०.२ दशलक्ष टन झाली. २०२४-२५ मध्ये अन्नधान्याचे उत्पादन ३,३०९ लाख टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. गावांचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. पंतप्रधानांना हे चांगले माहिती आहे. आम्ही याच दिशेने काम करताेय.

आपण धन-धान्य योजनेचा उल्लेख केला?

या चर्चेपूर्वी (बुधवारी) मंत्रिमंडळाने ‘प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना’ मंजूर केली, जी २०२५-२६ पासून ६ वर्षे १०० जिल्ह्यांमध्ये राबविली जाईल. उत्पादन वाढेल, सिंचन चांगले होईल, साठवण क्षमता वाढेल. शेतकऱ्यांना सुलभ कर्ज मिळेल.

तुम्ही नैसर्गिक शेतीला कसे प्रोत्साहन देता?

खते आणि कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे मातीचे आरोग्य बिघडत आहे. त्यासाठी नैसर्गिक शेती अभियान सुरू करण्यात आले आहे. आम्ही एक कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू. नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण व अनुदान देऊ. १८ लाख शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करायला लावण्याचे लक्ष्य आहे.

शेतीवरील ट्रम्प करांबद्दल काय सांगाल?

शेतकऱ्यांचे हित, त्यांची आर्थिक सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. यावर कोणतीही तडजोड नाही.

कृषी उत्पादनात भारताचे लक्ष्य काय आहे?

एकेकाळी अमेरिकेचा पीएल-४८० हा लाल गहू खावा लागला. आज आमच्याकडे अतिरिक्त गहू आहे. ५० हजार कोटी रुपयांचा बासमती निर्यात करत आहोत. आम्ही ताे वाढवू. शास्त्रज्ञांचे संशोधन व तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही उत्पादन वाढवू,इतर देशांना अन्न पुरवू. जगाचे अन्नदाते बनू.

नकली बियाणे आणि कीटकनाशके ही मोठी समस्या आहे का?

हा कायदा ६० च्या दशकातील आहे. निकृष्ट खते, कीटकनाशके, बियाण्यांसाठी फक्त दंड हाेताे. आम्ही नवीन कायदा आणत आहोत. त्यात आर्थिक दंडासह कठोर शिक्षेची तरतूद असेल.

पक्षाध्यक्षपदासाठी तुम्हीही चर्चेत आहात?

कसे मथळे बनतात हे माहीत नाही. कृषी व ग्रामीण विकास मंत्री म्हणून, शेतकरी माझ्या नसानसात आहे. ग्रामीण विकास मंत्री म्हणून ग्रामविकास हे ध्येय आहे. मी वर्तमानातच जगताे. सांगितलेल्या कोणत्याही कामात मी सर्वोत्तम याेगदान देईन.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!