Homeमुळशीमुळशीतील ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक प्रणाली व सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी

मुळशीतील ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक प्रणाली व सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी

मुळशी (पौड,दि.23) : मुळशी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची वेळेवर उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करण्यात यावी, तसेच कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता यावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे (ऑडिओ व व्हिडिओसहित) बसवावेत, अशी मागणी ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचालित माहिती अधिकारी नागरी समूहाने केली आहे.

या संदर्भात तालुका अध्यक्ष मधुकर थोरवे, पुणे शहर प्रचारप्रमुख संदीप जोरी आणि तालुका संघटक अनिल सपकाळ यांनी गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांना निवेदन दिले. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी वेळेवर गैरहजर राहत असल्याने नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. यामुळे शासकीय कारभारात अकार्यक्षमता आणि नागरिकांच्या मनात नाराजी निर्माण होते.

ग्रामपंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक प्रणाली अनिवार्य केली जावी, तसेच ये-जा वेळेचे अचूक पंचिंग व्हावे, अशी या संस्थेची भूमिका आहे. याशिवाय अनेकवेळा कर्मचारी व नागरिकांमध्ये गैरवर्तणुकीचे प्रकार घडत असून, दोन्ही बाजूंनी असभ्य भाषेचा वापर होत असल्याने कार्यालयीन वातावरण बिघडते. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद आहे.

काही ग्रामपंचायतींनी शासनाच्या परिपत्रकाला धाब्यावर बसवून कार्यालयांमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवल्या असून, त्या देखभालीसाठी येणारा अतिरिक्त वीजबिलाचा भार करदात्यांच्या खिशातून वाया जात असल्याची टीकाही संस्थेने केली आहे. या प्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी स्पष्ट मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!