Homeमनोरंजनजेव्हा अक्षय खन्ना यांना विद्या बालनने चित्रपट नाकारल्याबद्दल रागावला

जेव्हा अक्षय खन्ना यांना विद्या बालनने चित्रपट नाकारल्याबद्दल रागावला


बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना (Akshaye Khanna) सलाम-ए-इश्कच्या सेटवर अभिनेत्री विद्या बालनवर संतापला होता. विद्या बालनने (Vidya Balan) स्वत:च हा खुलासा केला आहे. यावेळी जॉन अब्राहमने तिची सुटका केली होती. विद्या बालनने नुकतीच Bollywood Hungama Style Icons Summit ला हजेरी लावली. यादरम्यान तिने सेटवर नेमकं काय घडलं होतं याबद्दल सांगितलं. विद्या बालनने अक्षय खन्ना, जॉन अब्राहम यांच्यासह सलाम-ए-इश्क चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात त्यांच्यासह सलमान, प्रियांका, अनिल कपूर, गोविंदा, जुही चावला अशी अभिनेत्यांची फौजच होती.

अक्षय खन्नासोबतचा चित्रपट नाकारला असल्याने जेव्हा तो समोर आला, तेव्हा आपण कशाप्रकारे जॉन अब्राहमची मदत मागितली याबद्दल विद्या बालनने सांगितलं आहे. सोबत चित्रपट नाकारला असल्याने विद्या बालनला अक्षय खन्नासमोर जाताना भीती वाटत होती. तिने सांगितलं की, “मला अक्षय खन्नासोबत एका चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. काही कारणास्तव मला ती स्क्रिप्ट आवडली नव्हती. पण मी फोन उचलून सांगण्याची हिंमत केली नाही. मी माझ्या मॅनेजरला फोन करुन दिग्दर्शकाला निरोप देण्यास सांगितलं”.

पुढे तिने सांगितलं की, “यानंतर मी सलाम-ए-इश्कच्या सेटवर अक्षय खन्नाला भेटले. त्यावेळी त्याने मला सुनावलं. तो म्हणाला, तुला जर चित्रपट करायचा नव्हता तर मला का सांगितलं नाहीस? त्यानंतर मी जॉन अब्राहमकडे गेले आणि म्हटलं ‘कृपया मला वाचवशील का?’ कारण मी तेव्हा नवीन होते. मला कोणताही वाद घालायचा नव्हता. मला कोणालाही दुखवायचं नव्हतं किंवा वाईट वाटावं असं वाटत नव्हतं. पण नंतर लक्षात आलं की, तो माझी मस्करी करत होता”.

सलाम-ए-इश्क चित्रपटाचं दिग्दर्शन निखील अडवाणीने केलं होतं. चित्रपटात सहा प्रेमकथांचं मिश्रण दाखवण्यात आलं होतं. चित्रपटाबद्दल बोलायचं गेल्यास विद्या बालन ‘भूल भूलैय्या 3’ चित्रपटात अखेरची दिसली होती. या चित्रपटात तिच्यासह कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी होती.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवीन मतदाराला द्यावा लागेल पालकांच्या SIR चा तपशील:आतापर्यंत फक्त जुन्या मतदारांना लागू होते; EC...

0
निवडणूक आयोगाने मतदार यादीत नाव नोंदवू इच्छिणाऱ्या नवीन अर्जदारांसाठीही नवीन नियम लागू केला आहे. आता फॉर्म-6 भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करू इच्छिणाऱ्या...

7 वर्षांच्या चिमुकलीवर सुरक्षारक्षकाचा लैंगिक अत्याचार:मुंबईतील संतापजनक घटना, संतप्त नागरिकांचा पोलिस ठाण्याला घेराव

0
मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ७ वर्षीय निष्पाप चिमुकलीवर इमारतीच्याच सुरक्षारक्षकाने बाथरूममध्ये घुसून...

बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले:लुधियानामध्ये बहिणीला रडतानाचा व्हिडिओ पाठवला, म्हणाली- मला घेऊन जा; इंस्टाग्रामवरून...

0
लुधियानामध्ये बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले आहे. त्याने गर्लफ्रेंडला आपल्या ताब्यात ठेवले आहे. अल्पवयीन मुलगी वारंवार आपल्या बहिणीला व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ आणि ऑडिओ मेसेज...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांचा ताण कमी होईल, तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल

0
रविवार, 12 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांच्या घरी पाहुणे आल्याने लगबग राहील. वृषभ राशीच्या लोकांना जुन्या मतभेदातून दिलासा मिळू शकतो. मिथुन राशीचे लोक...
spot_img

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...
error: Content is protected !!