Homeसांस्कृतिक'हातात झाडू, घरात लक्ष्मी'- पुरुषांनी घरात केली स्वच्छता तर मिळतो श्रीमंतीचा आशीर्वाद;...

‘हातात झाडू, घरात लक्ष्मी’- पुरुषांनी घरात केली स्वच्छता तर मिळतो श्रीमंतीचा आशीर्वाद; जाणून घ्या ज्योतिषशास्त्राचे रहस्य


संपत्तीसाठी अ‍ॅस्ट्रो टिप्स: आपण अनेकदा स्वच्छतेला केवळ आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानतो. पण ज्योतिषशास्त्रानुसार स्वच्छतेचा थेट संबंध आर्थिक समृद्धीशी आणि घरातील सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्याशीही आहे. विशेष म्हणजे, जर घरातील पुरुष स्वतः झाडू घेऊन घरातली साफसफाई केली, तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या आर्थिक प्रगतीवर होतो, असे मत अनेक ज्योतिषतज्ज्ञ व्यक्त करतात.

केर काढण्याचा आर्थिक समृद्धीशी काय संबंध?
आजही अनेक घरांमध्ये घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मुख्यत्वे महिलांकडेच असते. परंतु, जर घरातील कर्ते पुरुष हे काम प्रेमाने आणि स्वाभाविकपणे करत असतील, तर ते केवळ घराला नव्हे तर मनालाही स्वच्छ करत असतात आणि यामुळे दैनंदिन जीवनात सौख्य, शांती आणि समृद्धी वाढते. कारण ज्योतिषशास्त्रानुसार झाडूने केर काढणे म्हणजे अहंकाराचे निर्मूलन करणे.

पुरुषांनी झाडू घेतल्याने लक्ष्मी प्रसन्न होते
ज्या पुरुषांमध्ये घरकाम करण्याबद्दल तुच्छता नसते, जे झाडू घेऊन घरी धूळ साफ करतात, केर काढतात अशा व्यक्तींचे सौख्यदायक आणि मंगलमय जीवन असते. हे फक्त बाह्य स्वच्छतेचे लक्षण नाही, तर त्यातून दिसतो एक अंतर्मुख आणि नम्र दृष्टिकोन, जो आर्थिक समृद्धीचे दार उघडतो.

हे ही वाचा: ‘या’ दिवशी नखे कापल्यास लक्ष्मीची होते कृपा; जाणून घ्या कोणता दिवस सर्वोत्तम

स्वच्छतेने निर्माण होते सकारात्मक ऊर्जा
ज्येष्ठ ज्योतिष अभ्यासकांचे म्हणणे आहे की, झाडूने साफसफाई करताना घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्यामुळे त्या घरात लक्ष्मीचे वास्तव्य होते. अशा घरामध्ये पैशाची चणचण नसते. आरोग्य उत्तम राहते आणि नातेसंबंधही चांगले राहतात.

हे फक्त काम नाही, ही आहे साधना
झाडू हातात घेणे म्हणजे एक प्रकारची मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीची प्रक्रिया आहे. हे काम पुरुषांनी स्वतःहून केल्याने त्यांच्यात विनयशीलता, नम्रता आणि समतेची भावना वाढते. ही मानसिकता आर्थिक स्थैर्य आणि घरातील सौख्य मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक मानली जाते.

जर तुम्हाला तुमच्या घरात शांती, आनंद आणि पैशांची भरभराट हवी असेल, तर घरातील पुरुषांनी स्वतःहून झाडू घ्या आणि स्वच्छतेच्या कार्यात भाग घ्या. कारण स्वच्छता ही लक्ष्मीचा मार्ग आहे आणि अहंकाराच्या साफसफाईनेच खऱ्या अर्थाने श्रीमंती मिळते. हे फक्त ज्योतिषाचा भाग नाही, तर एक सामाजिक आणि मानसिक परिवर्तनही आहे, जे तुमच्या आयुष्यात अमूल्य बदल घडवू शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!